Mps Mission 2020

Mps Mission 2020 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mps Mission 2020, Government Organization, umbare(page), Pandharpur.

पुणे पदवीधर मतदार संघ 2020 उमेदवार मा. ऍड. सुजित कुमार थिटे... #आपला माणूस... आपला आमदार...
07/11/2020

पुणे पदवीधर मतदार संघ 2020 उमेदवार मा. ऍड. सुजित कुमार थिटे... #आपला माणूस... आपला आमदार...

03/11/2020

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुजित भाऊ थिटे....Fix....Amadar

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांना भेटणारे...पुणे पदवीधर मतदारसंघातील  पहिलेच उमेदवार Adv. सुजितकुमार थिटेम...
13/10/2020

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोशारी यांना भेटणारे...पुणे पदवीधर मतदारसंघातील पहिलेच उमेदवार Adv. सुजितकुमार थिटे

मी काल मा. भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली. भेटीदरम्यान महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्या मागण्या संक्षिप्त स्वरूपात मांडण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यात covid-19 या संसर्गजन्य महामारीमुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणावर खूप मोठे संकट आले आहे. या काळात या परिस्थितीचा गंभीर सर्वाधिक फटका पदवीधर युवक-युवती, नोकरदार, लघु उद्योजक यांना बसला आहे. हे घटक खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. महाराष्ट्राच्या विकासात पदवीधरांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र हे राज्य तरुण वर्गाच्या संख्येबाबत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मग असा युवक वर्ग गंभीर आर्थिक, शैक्षणिक, रोजगार विषयक संकटाचा सामना करत असताना हा घटक आत्महत्या सारख्या चुकीच्या निर्णयाकडे वळत आहे. या काळात पदवीधर युवक-युवतींना राज्य सरकारने खंबीर आधार तसेच प्रोत्साहन देणे ही‌ काळाची गरज आहे म्हणूनच सरकारने या तरुणाईच्या बाबतीत स्थिर व शाश्वत उपाय योजना राबवून या घटकाला आर्थिक व रोजगार विषयक आधार द्यावा. याबाबत राज्यपाल महोदयांसोबत चर्चा केली.

*महाराष्ट्र पदवीधर संघटनेच्या मागण्या संक्षिप्त स्वरूपात*

१) बेरोजगार भत्ता योजनेच्या धरतीवर पदवीधर सन्मान योजना राबवावी.
2) covid-19 मुळे बेरोजगार झालेल्या नोकरदारांचे रोजगार विषयक पुनर्वसन.
३) स्टार्ट अप लघुउद्योगांना आधार
४) विविध शासकीय भरती प्रक्रिया पारदर्शक-न्याय्य रीतीने पार पडाव्यात
अ) आरोग्य विभाग भरती
आ) गृह विभाग भरती
क) महसूल विभाग भरती
ड) जलसंधारण विभाग भरती
इ) स्थानिक स्वराज्य संस्था भरती
5) कौशल्य विकास कार्यक्रमासाठी प्रोत्साहनपर योजना राबवा त्यात राज्य सरकारचा पुढाकार आवश्यक.

या सगळ्या प्रश्नांसाठी...पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून माझं Vision काय असणार आहे याबद्दल राज्यपाल महोदय यांच्यासोबत चर्चा केली..व राज्यपालांनी या सगळ्या मुद्द्यावर सरकारसोबत चर्चा करावी व मला सहकार्य करावे यासाठी विनंती केली.

पदवीधरांच्या काही उर्वरित मागण्या खालीलप्रमाणे:-

1. कोरोना साथ सुरू झाल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा प्रश्न आणखी तीव्र झाला आहे. यापार्श्वभूमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावेत. त्याबाबतचे एक निश्चित धोरण ठरवावे.

2. महाविद्यालयांमध्ये सेट/नेट, पीएचडी झालेले शेकडो उच्चशिक्षित पदवीधर तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांना अत्यंत अल्प मानधन मिळते आहे. शोषणाची ही सीएचबी पद्धत बंद करावी.
3. कोरोना साथीमुळे थांबविण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. यामुळे खेड्यापाड्यातील मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू होऊ शकेल. यासाठी यावर्षीसाठी केवळ 17 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, त्यामुळे शासनावर ताण पडणार नाही.
4. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निश्चित वेळापत्रक ठरवावे, त्यानुसार त्या वेळेवर पार पाडाव्यात.
5. गट क व गट ड च्या भरतीची सरळ सेवा भरती प्रक्रिया खाजगी कंपनीकडे न सोपविता राज्य लोकसेवा आयोगामार्फत पार पाडावी.
6. महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती देखील राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी.
7. शहरी भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शहरी रोजगार हमी योजना सूरु करण्याचा विचार करावा.
8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ते महाविद्यालय स्तरातील सर्वच विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी.

सगळ्या विषयांवर राज्यपालांसोबत विस्तृत आणि सकारात्मक चर्चा करून त्यांना शाश्वत आणि प्रभावी उपाययोजनांची मागणी देखील केली.

राज्यपाल महोदयांनी मला इतका वेळ दिला... माझे प्रश्न समजून घेतले व सध्या पुणे पदवीधर मतदारसंघात एकमेव उमेदवार आहे... जो सुशिक्षित आहे आणि आतापासूनच पदवीधरांचे प्रश्न मांडून त्यावर उपाययोजना शोधून काढत आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. राज्यपाल महोदयांच हे शब्द आपणा सर्वांसाठीच प्रेरणादायी व दिशादर्शक आहेत.

अशा व्यक्तींच्या सहकार्यामुळे मला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभरात विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघात असेच जोमाने कार्य करत राहुयात आणि पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या माध्यमातून आपला आवाज थेट विधानपरिषदेपर्यंत नेवुयात. सर्वांचे असेच सहकार्य, पाठींबा, आणि आशीर्वाद राहुद्यात...🙏🏻🙏🏻

Address

Umbare(page)
Pandharpur
413302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mps Mission 2020 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share