Dhanashree Lad

Dhanashree Lad अध्यक्षा क्रांती महिला प्रतिष्ठान

पलूस नगरपरिषद, पलूसच्या भाजप पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सोनालीताई सागर नलवडे तसेच प्रभाग २चे नगरसेवक पदाचे उ...
27/11/2025

पलूस नगरपरिषद, पलूसच्या भाजप पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सोनालीताई सागर नलवडे तसेच प्रभाग २चे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. सुरज पोपट निकम आणि सौ. राजलक्ष्मी विजय सदामते व प्रभाग १०चे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. शाहूराज पांडुरंग पाटील आणि सौ. नीलम नितीन शितापे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभा व बैठकांच्या प्रसंगी जनतेशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सर्वांशी संवाद साधताना अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी स्थानिक प्रश्न, नगरपरिषद विकासाच्या दृष्टीने करावयाच्या कामाची दिशा आणि भाजपाच्या भूमिकेबाबत अनेक मुद्दे मांडले. नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड जनसमर्थन मिळत असून भक्कम विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करीत आहोत. दि. २ डिसेंबर रोजी आपले मतदानरुपी आशीर्वाद आम्हाला द्यावेत. विकासाभिमुख नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक धोरणे यामुळे या निवडणुकीत भाजपाला प्रचंड जनसमर्थन मिळेल हा विश्वास आहे.

आज पलूस शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. सोनालीताई सागर नलवडे, तसेच नगरसेवक पदाचे अधिकृत ...
26/11/2025

आज पलूस शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. सोनालीताई सागर नलवडे, तसेच नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ. मेघा वैभव सिसाळ आणि श्री. अजिंक्य तुकाराम पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
प्रभागामधील विकास कामे, पाणीपुरवठा, रस्ते-गटार व्यवस्था, स्वच्छता उपक्रम, महिलांसाठी सुरक्षित व सक्षम वातावरण, युवकांसाठी रोजगार संधी अशा विविध महत्त्वाच्या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली.
"विकासाच्या वाटचालीत प्रभाग क्र. ६ मागे राहणार नाही" असा ठाम विश्वास सौ. सोनालीताई नलवडे यांनी व्यक्त केला. भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी ताईंच्या नेतृत्वाखाली सुशासनाचा नवा अध्याय सुरू होईल याची ग्वाही सर्वांना दिली.

वर्ल्ड कप 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचा तिरंगा जगाच्या शिखरावर फडकवणाऱ्या आपल्या महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अ...
03/11/2025

वर्ल्ड कप 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचा तिरंगा जगाच्या शिखरावर फडकवणाऱ्या आपल्या महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन!

आपल्या महिला खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि आत्मविश्वास ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

हा विजय फक्त क्रिकेटचा नाही, तर नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा आणि एकतेचा विजय आहे.




वुमेन्स वनडे वर्ल्डकप २०२५' च्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये धडक ...
31/10/2025

वुमेन्स वनडे वर्ल्डकप २०२५' च्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली आहे. जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्या अविस्मरणीय खेळीने ३३९ धावांचा डोंगर भारताने सहज सर केला.

आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकासमोर देखील अशीच धडाकेबाज खेळी करत भारतमातेच्या सुकन्या वर्ल्ड कप पटकावतील, असा विश्वास आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन आणि फायनलसाठी शुभेच्छा!

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या विचारांचा वारसा जपत, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण...
29/10/2025

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या विचारांचा वारसा जपत, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे आमचे प्रेरणास्थान, माझे सासरे आणि मार्गदर्शक आमदार श्री. अरुण (अण्णा) लाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले नेतृत्व, कार्यतत्परता आणि जनसेवेतील निष्ठा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा प्रकाश आमच्या वाटचालीत असाच उजळत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आंख में भर लो पानीजो शहीद हुए हैं उनकीज़रा याद करो क़ुर्बानी...!स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्...
15/08/2025

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुर्बानी...!

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

"प्रतिसरकाराचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"
03/08/2025

"प्रतिसरकाराचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"

अभिमानाचा क्षण!नागपूरची सुपुत्री दिव्या देशमुख हिने फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून भारताचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला...
28/07/2025

अभिमानाचा क्षण!

नागपूरची सुपुत्री दिव्या देशमुख हिने फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून भारताचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. तिच्या मेहनत, चिकाटी आणि बुद्धिमत्तेचं हे श्रेष्ठ यश आहे.

दिव्या, तुझ्या या विजयाने संपूर्ण नागपूर, महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान वाढला आहे. तू तरुण पिढीची प्रेरणा आणि "चेस क्वीन" म्हणून चमकत आहेस. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

"आज फादर्स डे, बांबांनी विचार दिले, अन् त्या विचारांना धाडस देण्याचं काम अण्णांनी केलं. या दोघांमुळे जीवनाला खऱ्या अर्था...
15/06/2025

"आज फादर्स डे, बांबांनी विचार दिले, अन् त्या विचारांना धाडस देण्याचं काम अण्णांनी केलं. या दोघांमुळे जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. बाबांची माहेरची संस्कारांची शिदोरी घेऊन सासरी लाड कुटूंबात वावरत असताना अण्णांच्या कामाची व्याप्ती मला नेहमीच प्रेरीत ठरणारी राहिली आहे. मी स्वतःला खुप भाग्यवान समजते. हॅप्पी फादर्स डे बाबा, अण्णा।"

आज वटपौर्णिमेच्या पावन पर्वावर वडाच्या वृक्षाचे पूजन करून आयुष्यभरासाठी शुभाशीर्वाद घेतले. यानिमित्ताने उपस्थित सर्व मात...
10/06/2025

आज वटपौर्णिमेच्या पावन पर्वावर वडाच्या वृक्षाचे पूजन करून आयुष्यभरासाठी शुभाशीर्वाद घेतले. यानिमित्ताने उपस्थित सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक परंपरेला जपत, निसर्गप्रेम आणि नात्यांचा सन्मान यांचा साजरा केलेला हा पवित्र क्षण निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Address

Palus Kadegaon
Palus

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanashree Lad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhanashree Lad:

Share

Category