YuvaSena Palghar - युवासेना पालघर जिल्हा

  • Home
  • India
  • Palghar
  • YuvaSena Palghar - युवासेना पालघर जिल्हा

YuvaSena Palghar - युवासेना पालघर जिल्हा Official Page of Yuva Sena Palghar Jilha

Mission
तरुणांच्या हाकेला प्रतिसाद
युवा सेनेची हेल्पलाइन
शिक्षण, आरोग्य, रोजगाराबरोबरच तरुणांचे दैनंदिन प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या युवा सेनेला महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युवा सेनेकडे मोठ्या अपेक्षेने पाहणार्‍या तमाम तरुणांच्या हाकेला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी युवा सेनेने ०२२-२४३२८१८१ हेल्पलाइन सुरू केली आहे. Description
१९ जून १९६६ रोजी जन्म झाला एका

सेनेचा... शिवसेनेचा... शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन्‌ प्रखर भक्‍त. ’वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोध-चिन्ह वाघं असावं असं बाळासाहेबांच्या मनांत आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन्‌ आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्‍त होणार्‍या बोधचिन्हाला साकारले खुद्‍द बाळासाहेबांनीच! ३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला.


मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली. बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास...हीच आपली शिवसेना...एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच.


शिवसेनेनं आता `युवा सेना` स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेतले तरुण आमदार, स्थानिक प्रतिनिधी, संघटनाप्रमुख यांचा त्यात समावेश करण्यात आलाय.

दसरा मेळावा १७/१०/२०१० युवा सेना स्थापनेचा दिवस

युवा सेना .....
शिवसेनेच्या तरुणांची वायुसेना म्हणजेच युवा सेना..


तरुणांना अधिक सक्षमपणे राजकारणात , समाजकरणात सामावून घेण्यासाठी कटीबद्ध असणारी संघटना म्हणजेच युवा सेना.
गरज तेथे युवा सैनिक असतील व आवश्यक तेथे युवा सेवकही होतील.
आरोग्य , रोजगार , शिक्षण आणि युवकांचे प्रश्न सोडविणारी सामाजिक चळवळ म्हणजे युवा सेना.
युवकांनी युवकांसाठी युवकांचे तयार केलेले व्यासपीठ म्हणजे युवा सेना.
सामाजिक , राजकीय ध्येयवादाशी निगडीत असणारे नेते घडविण्याची चळवळ म्हणजे युवा सेना.
युवा सेनेद्वारे तरुण आमदार , हृदयाने तरुण असलेले सर्व महिला-पुरुष एकत्रितपणे सामाजिक ध्येयाने पछाडून कार्य करणार्‍या शिवसैनिकांची संघटना म्हणजे युवा सेना.
नव्या विचाराने प्रेरित होऊन धडपडणार्‍या युवकांची संघटना म्हणजे युवा सेना.

Address

Palghar

Alerts

Be the first to know and let us send you an email when YuvaSena Palghar - युवासेना पालघर जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to YuvaSena Palghar - युवासेना पालघर जिल्हा:

Share