12/04/2021
लसीकरण हे एक शस्त्र आहे जे आपल्याला करोना आजारावर विजय मिळवून देणार आहे पालघर नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्वला केदार काळे
पालघर दिनांक 12 एप्रिल 2021
आज पासून पालघर नगरपरिषदे तर्फे ,जिल्हा आरोग्य विभागाच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली पालघर नगरपालिका क्षेत्रात लसीकरण सुरू झाले आहे .
आज सकाळी अंबा माता मंदिर पालघर व नंतर जिल्हा परिषद शाळा आनंद आश्रम येथे लसीकरण सुरू झाले ,त्यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर उज्वला काळे बोलत होत्या .
लसीकरण सतत एक ते दीड महिना सुरू राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊन 45 वर्षावरील सर्वांना लसीकरण मोफत देण्यात येणार आहे .
प्रत्येक केंद्रावर रोज 100 व्यक्ती ना लसीकरण देण्यात येणार आहे मंगळवार दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा वेवुर पालघर पूर्व येथे लसीकरण केंद्र सुरू होणार आहे, या आठ दिवसात अजून पाच लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष डॉक्टर उज्वला केदार काळे यांनी दिली त्याच प्रमाणे रुलर हॉस्पिटलला पालघर येथे करोना चाचणीसाठी गर्दी होत असते हे बघता पालघर येथील भगिनी समाज शाळेत करोना चाचणी सुरू केली आहे, तसेच पुनम पार्क पालघर पुर्व येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे अशी माहिती यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर उज्वला काळे यांनी जनतेला दिली .
लस घेतली तरीही मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, हात सतत धूत राहणे ही काळजी सर्व जनतेने घेतली पाहिजेत .
यावेळी शिवसेना गटनेते कैलास म्हात्रे ,भाजपा गटनेते भावानंद संखे ,आरोग्य सभापती अमोल पाटील ,बांधकाम सभापती रविंद्र म्हात्रे ,शिक्षण सभापती अनिता किणी ,नगरसेविका अनुजा तरे, नगरसेवक चंद्रशेखर वडे, नगरसेविका चेतना गायकवाड, नगरसेविका अलका रजपूत, नगरसेविका प्रियांका म्हात्रे, नगरसेवक दिनेश बाबर, नगरसेविका शेरबानू मेमन , डॉक्टर उमेश दुम्पलवाड हे उपस्थित होते , माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक मोहन कामत यांना लस देऊन नगरपरिषदेच्या लसीकरण केंद्राची सुरुवात झाली