Pramod Kolhe - Social Worker

Pramod Kolhe - Social Worker Professional Social worker

27/11/2017

Respect and proud for Dr.kolhe Family.

नविन कावसान मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षांपासून नियमित पने छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शि...
14/10/2017

नविन कावसान मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षांपासून नियमित पने छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे केले जाते,या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल काल औरंगाबाद येथील IMA हॉल मधे शासकीय विभागीय रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे संयोजकांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी नविन कावसान मित्र मंडळाच्या वतीने सत्कार स्वीकारतांना.

तहसीलदार सहेबांना HIV बाधित रुगणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी संगीतल्या,त्यामधे मुख्यत्वे ...
05/10/2017

तहसीलदार सहेबांना HIV बाधित रुगणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी संगीतल्या,त्यामधे मुख्यत्वे करुण त्यासाठी आवश्यक असलेले 21000 रु चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत.त्यावर लगेच सर्व तलाठी कार्यालयांना तसे निर्देश देण्यात असे यावेळी त्यांनी आश्वासन दिल.निवेदन देतांना सोबत सहकारी सामाजिक कार्यकर्ते श्री.जावेद सर व श्री.सुभाष शेळके हे उपस्थित होते.

Change of mind plz.don't ignore
11/12/2016

Change of mind plz.don't ignore

03/12/2016

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

भाग - १ – मानसिकता व पूर्वतयारी.
लेख १. व्यवसाय की नोकरी?
---------------------------------------------
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो. कारण आईवडिलांवर अवलंबवून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते. पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे. १. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही. शिवाय भांडवल सुध्दा नाही. २. काही काळ नोकरी करणार मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर भांडवल उभारणी करता येईल. ३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.

आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करु या. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते. मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पनावर होते. मग पुढे त्या उत्पनात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतच आयुष्य पुढे सरकत असते. त्या फार उल्लेखनीय असे काही घडत नाही. पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत. ह्यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभा करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत. व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे ह्यांचे पण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभा करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभा करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम पण द्विधा असतात. ह्या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बाधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारे ही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.
मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात असा प्रश्न विचारला की मग त्यांच्या कडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्ग सुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी. मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.
नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसाय मध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरवातीची काही वर्षे संघर्ष केला की मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे बेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरी पेक्षा सरसच.

भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो. पण इथल्या तरुणाईला ह्या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. ह्या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो. पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे. पुढील लेखामध्ये ही जाणीव प्राप्त करुन घेऊ.

- अमोल चंद्रकांत कदम,
संपादक, नवी अर्थक्रांती
https://www.facebook.com/naviarthkranti/
#उद्योजक #व्यवसाय #बिजनेस #स्टार्टअप

'Little Think 'Guide on the technical study to 10th and 12th pass students.    Motivate towards the 'how to create your ...
01/12/2016

'Little Think '
Guide on the technical study to 10th and 12th pass students.
Motivate towards the 'how to create your path'.
on this way fill up ITI ( Industrial technical Institute) entrance form.
After that student was happy.

No waste of time discussion on how to prepare this,let's came together and join keep our area is green.              'Ke...
22/11/2016

No waste of time discussion on how to prepare this,let's came together and join keep our area is green.
'Keep your world clean and green.
Save trees,Save the environment!!
Clean city,Green city'!!
50 plantation done in New kawasan,Bhavani nagar and zp school.

21/11/2016
Blood donation camp organised in new kawasan ' feeling proud and great work together with the friends.  And thank you to...
20/11/2016

Blood donation camp organised in new kawasan ' feeling proud and great work together with the friends.
And thank you to all members participate in camp,
Unforgettable memories.

Refreshments,tea and biscuits for the tired people during 'Nath Shesti' festival
19/11/2016

Refreshments,tea and biscuits for the tired people during 'Nath Shesti' festival

Address

At. Post. New Kawasan, Behind Lohiya Hospital
Paithan
431107

Telephone

+919403330895

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pramod Kolhe - Social Worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pramod Kolhe - Social Worker:

Share