भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद

  • Home
  • India
  • Osmanabad
  • भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद

भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद, Political organisation, osmanabad, Osmanabad.

प्रा. कॉम्रेड रणजित परदेशी सर काल अनंतात विलीन झाले.आज त्यांचा जन्मदिवस आज ८० वय पूर्ण केले.कालच्या प्रसंगी महाराष्ट्रात...
06/03/2024

प्रा. कॉम्रेड रणजित परदेशी सर काल अनंतात विलीन झाले.आज त्यांचा जन्मदिवस आज ८० वय पूर्ण केले.कालच्या प्रसंगी महाराष्ट्रातून रातोरात प्रवास करून कार्यकर्ते आले त्यात कार्यकर्त्या पेक्षा आपला बाप,भाऊ गेल्याची भावना होती.महिला कार्यकर्त्या नी हंबरडा फोडला.त्यात दिशा पिंकी शेख पासून सगळ्याच होत्या.रक्ताच्या नात्या पेक्षा ही नाती खरी खुरी असतात.खर म्हणजे पारंपरिक संसार करण्याचा सरांचा पिंड नव्हता.हा भला मोठा संसार त्यांनी उभा केला.काही लोक व्यक्तिगत आयुष्यात नीट घडी बसवन म्हणजेच आयुष्याची इतिकर्तव्य मानतात किंवा पूर्णत्व आल अस मानणारे भेटतात.पण ज्यांनी हा भला मोठा परिवार उभा केला,म्हंजे तो फक्त मित्र परिवार नाही तर महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात ज्या बुध्द,मार्क्स,फुले,आंबेडकर ह्यांचे विचाराचा जागर करणारी एक पिढी घडवली तीच पिढी आज जात,धर्म,भांडवलदारी विचारसरणीशी सांस्कृतिक संघर्ष करीत आहे,नवीन कार्यकर्ते घडवीत आहे.रणजित सरांनी हा फुलवलेला मळा आज राज्याच्या सांस्कृतिक,वैचारिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करीत आहेत. स्वतंत्रता सैनिकाचा जो जजबा आहे तो मी सरांच्या मध्ये १९७७ पासून पहात आलो. माझ्या त्यावेळेच्या मतावर आजही मी कायम आहे. सरांनी अनेक कार्यकर्ते तयार करताना अनेकांचे पोषण केलं.घर बसवून दिले.अर्थात सगळ्याच लाभार्थींची ती लायकी असतेच असे नाही.त्यातील अनेक जण वेगवेगल्या क्षेत्रात गेले ते हा संस्कार घेऊन गेले तर काहींनी नमाक हरामी केली,काही किंचित कौटोंबिक परीस्थीतीच चूकच मूल्यमापन करतात.काहींनी तर सरांच्या वारस्याच्या नावावर चांगभल करून भाजप संघाशी चुंबाचुबी केली.काहींनी फसवणूक केली पण सरांनी सर्वांना सारखेच प्रेम दिलं,त्याचं पहिलं प्रेम हे चळवळच राहील. माझी शेवटची भेट मालेगावला १४ जानेवारीला झाली. सर तेच बोलत होते आपल्याला बसून लिहावं लागेल,आपल्या सगळ्या युनिटला सोबत घेऊन करू इ.त्यांना बोलायला त्रास होत होता तरी त्यांना बोलायचे होते,सांगायचे होते,हा आपल आयुष्याचं दान चळवळी साठी अर्पण करणारा मी पाहिलेला शेवटचा माणूस म्हणजेच रणजित परदेशीसर! खर म्हणजे दरवर्षी मी फोन करून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असे! आता फक्त क्रांतिकारी अभिवादन करू शकतो!

- Jaywant Khadtale ,नाशिक

किर्तन, प्रवचनातून समाजात प्रबोधन करणारे समाज बदलाचे विद्यापीठ संत गाडगेबाबा यांच्या जन्मदिनी 2 वाचनीय पुस्तके सवलतीच्या...
23/02/2024

किर्तन, प्रवचनातून समाजात प्रबोधन करणारे समाज बदलाचे विद्यापीठ संत गाडगेबाबा यांच्या जन्मदिनी 2 वाचनीय पुस्तके सवलतीच्या दरात

मुळ किंमत: 400₹
सवलत किंमत: 350₹
कुरियर चार्जेस: 50₹
एकूण रक्कम: 400₹

१. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा

लेखक : संतोष अरसोड
किंमत : 250₹

संत गाडगेबाबा ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार आहे. हा विचार विवेकवादी आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे. समाजाला धार्मिक, आर्थिक, मानसिक भ्रमातून मुक्ती देणारा हा विचार आहे. माणसाला केंद्रबिंदू ठरवत इथल्या पाखंडी व्यवस्थेचे बुरूज उद्ध्वस्त करण्याची ताकद संत गाडगेबाबांनी कीर्तनामधून समाजमनात पेरली.
त्यांनी कधीही शाळेची पायरी चढली नव्हती.
रस्त्याच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलेला
हा खरा लोकशिक्षक होता या महानायकाने देशभरात प्रबोधनाचा प्रकाश वाटला अनेक विद्यापीठांना जे शक्य नाही ते या लोकविद्यापीठाने करून दाखवले त्यांनी निर्माण केलेल्या प्रकाश पर्वात प्रत्येकाने उजळून निघावे म्हणून
शब्दफुले वाहन्याचा हा प्रयत्न आहे. प्रबोधनाच्या चळवळीत काम करीत असताना कार्यकत्यांची जडणघडण कशी व्हावी यासाठी हे पुस्तक कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देईल. ज्ञान वंचिताना ज्ञानाभिमुख करण्याचा संत गाडगेबाबांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड आहे. समाजातील प्रबोधनाचे विझलेले निखारे पुन्हा प्रज्वलित होतील, हीच भावना या लिखाणामागे आहे.

२. श्री संत गाडगेबाबा

लेखक : प्रबोधनकार ठाकरे
किंमत : 150₹

गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. ते दरवर्षी पंढरपूरला जात असत पण त्यांनी गाभाऱ्यात जाऊन देवदर्शन केले नाही. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानभूती, वर्गविहीत जातीमुक्त समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरावर श्रद्धा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही बाबांची देवकल्पना होती. म्हणूनच दीनदलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकरांना किंवा परदास्यातून मुक्ती देणाऱ्या गांधीजीला देव माना, त्यांच्यातील माणुसकीची पूजा करा असे लोकांना बाबा सांगत.

पुस्तक मिळण्याचे ठिकाण

'पुस्तकवाला भाई',
२०४, ६३१/६३२ शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स,
फरासखाना पोलिस स्टेशन समोर,
अप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२

पैसे भरण्यासाठी बँकेचे तपशील:-

Google pay, Phonepe, Paytm, Bhim number
9822551911

Bhai Avinash Ingle Book Shop
Ac no.:- 60418909390
Ifsc Code:- MAHB0000154
Bank of Maharashtra Narayan Peth, Pune

संपर्क-
भाई अविनाश इंगळे - 9822551911 / 9503031699

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानातील मुलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे या विषयावरील महत्वपूर्ण दिवाळी अंक... '...
26/01/2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानातील मुलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे या विषयावरील महत्वपूर्ण दिवाळी अंक...

'आंतरभारती'
दिवाली विशेषांक २०२३

अंकाची मुळ किंमत - 350₹
सवलत किंमत - 300₹
कुरिअर चार्जेस - 50₹
एकुण किंमत - 350₹

'आंतरभारती'च्या संविधान जागर आणि प्रबोधन मालिकेतला 'सेक्युलरिझम' (२०२०), 'न्याय' (२०२१) आणि 'स्वातंत्र्य-समता-बंधुता' (२०२३) या तीन विशेषांकांनंतरचा चौथा अंक म्हणजे 'मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे' विषयाला वाहिलेला दिवाळी अंक २०२३! हा अंक सुजाण व रसिक मराठी वाचकांना सादर करताना समाधान जरूर आहे, पण त्यापेक्षा असमाधान अधिक आहे. कारण संविधानाने नागरिकांना बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचा सांविधानिक संस्था- खास करून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कायद्यांचा गैरवापर करून संकोच करीत आहे. नागरिकांच्या अभिव्यक्ती व असहमती, जगण्याचा व समतेच्या अधिकारावर गदा आणत आहे. मार्गदर्शक तत्त्वे 'जस्टिसिएबल' (कोर्टात दाद मागता येण्याजोगी) नसली तरी ती राज्यकारभारासाठी मूलभूत (fundamental to the state governance) आहेत, पण त्याकडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे आर्थिक समता, सामाजिक प्रतिष्ठा आणि जगण्याचा अधिकार हे भारताच्या एक तृतीयांशाहून अधिक नागरिकांसाठी आज तरी केवळ साकार न होणारे स्वप्न आहे... मूलभूत अधिकाराचा संकोच आणि मार्गदर्शक तत्त्वांचा
राज्यकारभारात अवलंब न करणे या प्रचलित सरकारच्या दुहेरी 'नीती' आणि 'नियमा'मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक व आर्थिक लोकशाही व न्यायापासून आपण अजूनही शेकडो मैल दूर आहोत. अन्याय तर आहे, पण आवाज उठवता येत नाही. प्रत्येक असहमतीचा व टीकेचा शब्द प्रतिबंधात्मक आणि दहशतवाद विरोधी कायद्यांचा मनमानी व असांविधानिक, कायद्यास अभिप्रेत नसलेला अर्थ लावून दडपून टाकण्याचा, बंद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतो. त्यामुळे वेळ आली आहे की, आम्ही भारतीय लोकांनी, ज्यांच्यासाठी हे संविधान आहे व ज्यांनी ते निर्माण करून स्वतःप्रत अर्पित केले आहे, त्या भारतीय नागरिकांनी संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. हा विचार (संदेश नव्हे) देण्यासाठी 'आंतरभारती'चा प्रस्तुतचा दिवाळी अंक आहे. त्याच्या आधारे आपण सारे 'अत्त दीप भव' - स्वयंप्रकाशी होत दृढ निश्चयाने संविधान रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. कारण 'माझे संविधान ही माझी शान आणि माझ्या अस्तित्वाचा आधार आहे. तो माझ्यापासून कुणालाही हिरावून घेता येणार नाही,' असा विश्वास मनामनांत पेरण्यासाठी हा दिवाळी अंक काही प्रमाणात का होईना सहाय्यक ठरेल, ही आशा व अपेक्षा आहे.

- लक्ष्मीकांत देशमुख

पुस्तक मिळण्याचे ठिकाण-

'पुस्तकवाला भाई',
२०४, ६३१/६३२ शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स,
फरासखाना पोलिस स्टेशन समोर,
अप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२

पैसे भरण्यासाठी बँकेचे तपशील:-

Google pay, Phonepe, Paytm, Bhim number

9822551911

Bhai Avinash Ingle Book Shop
Ac no.:- 60418909390
Ifsc Code:- MAHB0000154
Bank of Maharashtra Narayan Peth, Pune

संपर्क-
अविनाश इंगळे- 9822551911
9503031699

लढाऊ पँथर, आवडते वक्ते भाई संगारे यांचे पुतने अविनाश संगारे जेंव्हा पुस्तकवाला भाई पुस्तकांचे प्रशस्त दालनास भेट देतात आ...
25/01/2024

लढाऊ पँथर, आवडते वक्ते भाई संगारे यांचे पुतने अविनाश संगारे जेंव्हा पुस्तकवाला भाई पुस्तकांचे प्रशस्त दालनास भेट देतात आणि कौतुक करतात तेंव्हा भारी वाटत. ते भटक्या विमुक्त मुलांसाठी आळेफाटाच्या जवळील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात शाळा चालवतात. त्यांची भटक्या विमुक्त, दलित आदिवासी मुलांच्या शिक्षणाबाबतीतली तळमळ पाहून खूप आशादायी वाटतं. खूप चांगल्या गप्पा झाल्या. पँथर भाई संगारेंविषयीच्या बर्‍याच आठवणी त्यांनी सांगितल्या. दोघांनीही एकमेकांच्या क्षेत्रात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी खारीचा वाटा उचलत काम करण्याचे एकमेकास आश्वस्त केले...

छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व लेखक:- जदुनाथ सरकार अनुवाद:- मीना शेटे-संभूपुस्तकाची किंमत:- 500₹ (घरपोच)अनुक्रमण...
20/01/2024

छत्रपती शिवाजी महाराज
काळ आणि कर्तृत्व

लेखक:- जदुनाथ सरकार
अनुवाद:- मीना शेटे-संभू
पुस्तकाची किंमत:- 500₹ (घरपोच)

अनुक्रमणिका

प्रस्तावना
छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रं

१) भूमी आणि लोक

२) बालपण आणि तारुण्य, १६२७-१६५६

३) सीमांचा झपाट्यानं विस्तार

४) युद्धाची धुमश्चक्री

५) शिवाजीराजे आणि जयसिंग, १६६५

६) औरंगजेबाची भेट, १६६६

७) सन १६६७-१६७० मधील धामधूम

८) मुघल आणि विजापूर यांच्याशी संघर्ष, १६७१-१६७४

९) शिवाजीराजांचा राज्याभिषेक... आणि त्यानंतर

१०) दक्षिण कोकण आणि कानडी मुलुख

११) राजांचा आरमारी उपक्रम

१२) कर्नाटकावर स्वारी, १६७७-१६७८

१३) राजांच्या जीवनातील अंतिम वर्षे

१४) शिवाजीराजांचे इंग्रजांशी आणि पोर्तुगीजांशी संबंध

१५) राज्यव्यवस्था आणि धोरण

१६) शिवाजीराजांची कामगिरी, चारित्र्य आणि इतिहासातील स्थान

ग्रंथसूची
कालानुक्रम

पुस्तक मिळण्याचे ठिकाण-

'पुस्तकवाला भाई',
२०४, ६३१/६३२ शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स,
फरासखाना पोलिस स्टेशन समोर,
अप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२

पैसे भरण्यासाठी बँकेचे तपशील:-

Google pay, Phonepe, Paytm, Bhim number

9822551911

Bhai Avinash Ingle Book Shop
Ac no.:- 60418909390
Ifsc Code:- MAHB0000154
Bank of Maharashtra Narayan Peth, Pune

संपर्क-
अविनाश इंगळे- 9822551911
9503031699

आठवणी व संस्मरणे जनाक्का शिंदे संपादक:- रणधीर शिंदे पुस्तकाची किंमत:- 380₹ (घरपोच)जनाक्का शिंदे (१८७०८-१९५६)विसाव्या शतक...
18/01/2024

आठवणी व संस्मरणे
जनाक्का शिंदे

संपादक:- रणधीर शिंदे
पुस्तकाची किंमत:- 380₹ (घरपोच)

जनाक्का शिंदे (१८७०८-१९५६)

विसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या तळमळीच्या समाजसेविका अशी जनावका शिंदे यांची ओळख आहे. जमखंडी येथे त्यांचा जन्म झाला, जमखंडी व पुणे येथे जनाक्का शिंदे यांचे शालेय शिक्षण झाले. प्रार्थना समाजाच्या निष्ठावान शिक्षिका व समाजसेविका म्हणून प्रसिद्ध. जनाक्का शिंदे यांनी भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ व अहल्याश्रमात केलेले समाजकार्य मौलिक स्वरूपाचे आहे, याबरोबरच त्यांनी मुंबई व पुणे प्रार्थना समाजात हिरीरीने कार्य केले. मुंबईच्या निराश्रित सेवासदानाचे सेक्रेटरी व वाई ब्राह्म समाजातही जनावका शिंदे यांनी त्यांच्या कामाचा उल्लेखनीय ठसा उमटविला. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील समाजकार्य करणाऱ्या अपवादभूत स्त्रियांपैकी त्या होत. थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी अशी जनाक्का शिंदे यांची ओळख आहे. त्यांनी महर्षी शिंदे यांच्याबरोबर व्रतस्थपणे समाजसेवेचे कार्य केले. शिंदे कुटुंबाच्या त्या आधारवड ठरल्या.

जनाक्का शिंदे याचे कार्य आणि कर्तृत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा...

पुस्तक मिळण्याचे ठिकाण-

'पुस्तकवाला भाई',
२०४, ६३१/६३२ शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स,
फरासखाना पोलिस स्टेशन समोर,
अप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२

पैसे भरण्यासाठी बँकेचे तपशील:-

Google pay, Phonepe, Paytm, Bhim number

9822551911

Bhai Avinash Ingle Book Shop
Ac no.:- 60418909390
Ifsc Code:- MAHB0000154
Bank of Maharashtra Narayan Peth, Pune

संपर्क-
अविनाश इंगळे- 9822551911
9503031699

छत्रपती संभाजी महाराज लेखक:- इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे पुस्तकाची किंमत:- 1200₹ (घरपोच)संभाजी महाराजांची प्रतिमा सांप्...
17/01/2024

छत्रपती संभाजी महाराज

लेखक:- इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे
पुस्तकाची किंमत:- 1200₹ (घरपोच)

संभाजी महाराजांची प्रतिमा सांप्रतच्या इतिहासात जी फक्त दुराचारी व दुर्व्यसनी म्हणून जमा केली गेली आहे ती संपूर्णतः काल्पनिक किंवा अवास्तव आहे. या समजाच्या अगदी उलट अशी तत्कालीन वस्तुतिथी असल्याचे निदर्शनास येते, संभाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीचा, कदाचित आयुष्याचाही, क्षण नि क्षण 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या मनोवृत्तीनेच वेचला, आणि राजभोग तर राहोच पण सामान्य ग्रहसुखाच्याही लोभास विन्मुख राहून मोगली परचक्राला तोंड देण्यासाठी कर्तव्यनिष्ठेने म्हणा किंवा स्वराज्यनिष्ठेने म्हणा, त्यांना सतत झगडावे लागले. तसेच आपल्या भीषण मृत्यूसमयीच्या कालात धारण केलेल्या स्थितप्रज्ञतेने संभाजी महाराजांनी 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' या गीतावचनाची अति तेजस्वी अशी जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या प्रतिकारातील चैतन्य जागृत राखले. या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांची व त्यांची 'सखी' आणि राज्ञि येसूबाईसाहेब यांची नऊ वर्षांची कारकीर्द अत्यंत महत्वपूर्ण प्रसंगांनी आणि अनेक विविधप्रकारच्या हालचालींनी भरलेली आहे. या सर्व प्रसंगांचा आणि विशेषतः एकट्या संभाजी महाराजांनी अखिल हिंदुस्थानातील शक्तीसामर्थ्यांशी हिंदवी स्वराज्यासाठी सुसंघटितपणे दीर्घकाल दिलेल्या झगड्याचा विचार केल्यास महाराष्ट्राची अखिल हिंदुस्थानात व परदेशात गाजलेली खरी कर्तबगारी, उज्वल संस्कृती व तेजस्वी राष्ट्रीय संघटना यांच्या खऱ्या कसोटीचा आदर्श संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत दिसून येत आहे. हा आदर्श महाराष्ट्रास आणि हिंदवी स्वराज्यास सदोदित राष्ट्रीय संघटनेच्या व संस्कृतीच्या उच्च पातळीवर राखो, हीच सर्वेश्वराजवळ अनन्यभावाने प्रार्थना.

- इतिहासाचार्य वा. सी बेंद्रे

पुस्तक मिळण्याचे ठिकाण-

'पुस्तकवाला भाई',
२०४, ६३१/६३२ शान-ब्रम्हा कॉम्प्लेक्स,
फरासखाना पोलिस स्टेशन समोर,
अप्पा बळवंत चौक, पुणे- ४११००२

पैसे भरण्यासाठी बँकेचे तपशील:-

Google pay, Phonepe, Paytm, Bhim number

9822551911

Bhai Avinash Ingle Book Shop
Ac no.:- 60418909390
Ifsc Code:- MAHB0000154
Bank of Maharashtra Narayan Peth, Pune

संपर्क-
अविनाश इंगळे- 9822551911
9503031699

01/01/2024

दगडूशेठ गणपतीला आजच्या दिवशी लोकांनी एवढी गर्दी केलीय की, जणूकाही दगडूशेठ गणपती सर्वांची नोंद करून यांच्या आयुष्याची काही कल्याणकारी योजनाच आखणार आहे...

अशी आपल्या कामाची घेतली जाणारी दखल उत्साह वाढवणारी असते...Business इंजिनिअरिंग सोडली अन् आज 35 देशात पोहोचलं नाव, धाराशि...
10/11/2023

अशी आपल्या कामाची घेतली जाणारी दखल उत्साह वाढवणारी असते...

Business इंजिनिअरिंग सोडली अन् आज 35 देशात पोहोचलं नाव, धाराशिवच्या तरुणाची कहाणी

https://youtu.be/dNOK3s66qTQ

https://fb.watch/n-3nztbAHI/

https://www.instagram.com/reel/CzA2v9uuiX6/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

19/09/2023

प्रिय पुस्तकवाला भाई,

आज तुझ्या पुस्तकाच्या घराला चार वर्षे पूर्ण होत आहेत.
एका रॅक मध्ये सुरु झालेलं स्वप्न
पाचव्या वर्षात प्रवेश करतेय.

तुला पुस्तकाने कधी पछाडले माहित नाही मला
पण पुस्तकं तुझ्या दुकानातल्या रॅकमध्ये नाही तर तुझ्या काळजात राहतात,
हे दिसतं तुझ्या डोळ्यांत थोडं डोकावून पाहिले की.

मराठवाड्यातून आलेल्या तुला नीट कळलं आहे मित्रा,
कधी, कुठं, कसं
कोण जाणे,
आपण हरवलं पुस्तकाचं बियाणं.
म्हणूनच वावर नको त्या सावकाराच्या घशात गेलं आपसूक.

काटेकुटे माजलेलं,
गहाण पडलेलं वावर
सोडवायचे असेल सावकाराच्या पाशातून
तर पुस्तकंच पेरली पाहिजेत वावरात.

तू तेच करतो आहेस कधीपासून.

तुझ्या या पुस्तकाच्या गॅलरीला
फुटाव्या असंख्य हिरव्यागार, सर्जक फांद्या
त्या पोहचाव्यात इथल्या
प्रत्येक घरांपर्यंत.
फांदीवरील पाखरांची गाणी
गुंजावीत भिंतीना भेदून
आणि
प्रत्येक अंगणात फुलून यावीत
रसरशीत माणसं...!

तुझ्या सोबत वाढत जावो
तुझी पुस्तकाची गॅलरी,
दर दिवशी
दर क्षणी.

आणि...
या पुस्तकांच्या
खनिजसमृध्द टेकड्यामधून
उगवू दे उद्याचा सूर्य
आमच्या आभाळात.

याच शुभेच्छा तुला, मला
आणि सगळ्यांना.

तुझा,

- Pradip Awate

( वर्धापनदिनानिमित्त लिहीलेली कविता )

Thank you so much sir.
तुम्ही सोबत असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Address

Osmanabad
Osmanabad
413501

Telephone

9503031699

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भारतीय शेतकरी कामगार पक्ष,उस्मानाबाद:

Share