जिल्हा परिषद उस्मानाबाद

जिल्हा परिषद उस्मानाबाद Zilla Parishad, Dharashiv जिल्हा परिषद धाराशिव

Hon. CEO visit to village Khudawadi Tq Tuljapur that is leading village in Maharashtra with this fat from cleanliness to...
26/11/2021

Hon. CEO visit to village Khudawadi Tq Tuljapur that is leading village in Maharashtra with this fat from cleanliness to prosperity

उमेद – अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या अस्सल उत्पादनांचे दालन उस्मानाबादकरांसाठी खुले, उस्मानाबादकरांनी लाभ घ्यावा ...
28/10/2021

उमेद – अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या अस्सल उत्पादनांचे दालन उस्मानाबादकरांसाठी खुले, उस्मानाबादकरांनी लाभ घ्यावा : जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे

दि.२७ ऑक्टोबर २०२१- उस्मानाबाद -जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद व उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आद्या हिरकणी जिल्हास्तरीय विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, पंचायत समिती सभापती हेमलता चांदणे, उप-सभापती प्रदीप शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, सहजिल्हा अभियान संचालक तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सौ.प्रांजल शिंदे, गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समिती कार्यालयानजीक असणाऱ्या गाळ्यामध्ये उमेद अभियानांतर्गत जिल्हयातील महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या अस्सल व गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनाला यावेळी सुरुवात करण्यात आली. जिल्हयात महिलांचे १४ हजार ५६३ स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात आले असुन गावस्तरावरावर विविध उपजीविकेचे उपक्रम सुरु आहेत. त्यामध्ये गटातील महिला खाद्यपदार्थ व इतर उपयोगी वस्तुंचे उत्पादन करतात. सदर गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणुन सदर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली असल्याचे तसेच महिला स्वयंसहाय्यता समुहांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने महिलांनी मोठया प्रमाणावर गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करावी व बाजारात असलेल्या अन्य उत्पादनांच्या सोबत स्पर्धा करत, उत्पादन व उत्पादन पद्धतीत बदल करत आपले व आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवावे, व उमेद अभियानाचा नावलौकिक वाढवावा असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सांगितले. पंचायत समिती सभापती, रत्नमाला टेकाळे, हेमलता चांदणे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व उपसभापती प्रदीप शिंदे यांनी आपल्या गटांनी तयार केलेली उत्पादने जास्तीत जास्त विकत घेण्याबाबत संपर्कातील सर्वांना आग्रह करणार असल्याचे यावेळी सांगितले. नियमित साजरे होणारे समारंभ, कार्यक्रम इ.मध्ये मोठया प्रमाणावर देण्यात येणारे बुके वापरानंतर वाया जातात व पैशांचादेखील अपव्यय होतो याला पर्याय म्हणुन महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उपयोगी वस्तुंची आकर्षक बास्केट तयार केली असुन जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपल्या आप्तस्वकीयांना भेटवस्तु म्हणुन देताना किंवा स्वागतासाठी हीच बास्केट द्यावी व स्वतःच्या कमाईचा पैसा वाया जाऊ देऊ नये याने भेटवस्तु देणाऱ्याला व घेणाऱ्याला दोघांनाही समाधान मिळेल असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी, व पदाधिकारी सदस्यांनी गटांच्या उत्पादनांची खरेदी केली व गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. सदर विक्री केंद्रामध्ये महिला गटांनी उत्पादित केलेल्या रुचकर चटण्या, पापड, लोणचे, मसाला, खवा, पेढा, कलाकुसरीच्या व शोभेच्या वस्तु,अत्तर,तेल,उटणे, अभ्यंगस्नानाची-पुजेची कीट, आवळा कँडी, शेवया, दिवाळीच्या फराळाचे चविष्ट पदार्थ, तसेच असंख्य खाद्यपदार्थ व इतर वस्तु उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा प्रोग्रामर मेघराज पवार, जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे,समाधान जोगदंड, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे, सर्व तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक , प्रभागसमन्वयक, उद्योगसखी, एमसीआरपी, स्वयंसहाय्यता समुहातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बलवीर मुंडे यांनी मानले तर आभार तालुका अभियान व्यवस्थापक पुजा घोगरे यांनी मानले.

22/10/2021

संत मीरा माध्यमिक शाळा, परांडा जि. उस्मानाबाद या शाळेतील विद्यार्थ्यांचा जर्मनीतील अनिवासी भारतीय अधिकारी यांचेशी साधला संवाद भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून जर्मनीत राहणाऱ्या मराठी नागरिकांनी हाती घेतलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमात महाराष्ट्रातील शाळा जोडणे व मार्गदर्शनपर उपक्रमात या शाळेतील श्री. शेरे एस. एन. सह शिक्षक आणि 8वी ते 10वी वर्गातील 11 विद्यार्थी सहभागी झाले होते. जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त जर्मनी येथील भारतीय वाणिज्य दुतावासाने सोमवारी दि.18/10/2021 रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग आयोजित करून हा उपक्रम राबविला. जर्मनीमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील मराठी अधिकारी डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे सहकारी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. या उपक्रमाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना एक संधी निर्माण होणार आहे. पुढील काळात पर्यावरण, पर्यटन, उद्योग या क्षेत्रातही हा उपक्रम राबविल्यास मोठा फायदा होईल. जर्मनीतील मराठी कुटुंब नेहमीच ऐकत येत सण व उत्सव साजरे करीत असल्याचे सांगून महाराष्ट्र मंडळातर्फे मराठी ग्रंथालय, जर्मनीत नव्याने येणाऱ्या मराठी व्यक्तीस मार्गदर्शन, स्थानिक लोकांसाठी दिवाळी अंक इत्यादी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. जर्मनीत सुरू करण्यात आलेल्या 'माय मराठी शाळा' या योजनेची माहिती मिळाली. जर्मनी देशाच्या शिक्षणातील नवीन विविध अनुभव सांगितले. तसेच जर्मन भाषा व शिक्षणातील नवीन संधीबद्दल माहिती देत यापुढील काळात जर्मनीत कुशल मनुष्यबळाची गरज असून उच्च शिक्षणासाठी मोफत व उत्तम दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच जर्मन भाषा शिकण्यासाठी Youtube व इतर माध्यमांचा वापर करता येऊ शकतो, असे सांगितले. एकंदरीत या उपक्रमामध्ये आम्हा शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांना सहभाग घेता आल्यामुळे आम्हाला चांगली प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले आहे. --------------------श्री.शेरे एस. एन. सहशिक्षक, संत मीरा माध्यमिक शाळा, परांडा जि. उस्मानाबाद

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किणी, ता. उस्मानाबाद या शाळेने जर्मनीमधील भारतीयांशी साधला संवाद भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमह...
20/10/2021

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किणी, ता. उस्मानाबाद या शाळेने जर्मनीमधील भारतीयांशी साधला संवाद

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने जर्मनी देशात कार्यरत असलेले भारतीय दूतावास डॉ. सुयश चव्हाण ( Indian Foreign Services Officer ) यांनी महाराष्ट्रातील 75 शाळा जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किणी तालुका व जिल्हा उस्मानाबाद या शाळेला संधी मिळाली. या शाळेचे नेतृत्व मंजुषा स्वामी सह शिक्षिका यांनी केले. यावेळी या शाळेतील अस्मिता दत्तात्रय कुंभार (इ.7वी ), हर्षवर्धन विजय हाजगुडे (7वी ), सुरज विश्वास दंडनाईक (6वी ) आणि समृद्धी तानाजी दंडनाईक (6वी) या 4 विद्यार्थ्यांनी संवादमध्ये सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक संधी भविष्यातील आव्हाने जर्मनीमध्ये असलेल्या शैक्षणिक करिअर संधी बद्दल जागरुकता निर्माण करणे, करिअर मार्गदर्शन व लागणारे गाईड याबाबतची माहितीसह आवश्यक त्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या आहेत. दि.15 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबर 2021 दरम्यान सदर उपक्रम चालू होता. यापुढे ही हा उपक्रम चालू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्र युनिक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात खूप छान माहिती मिळाली. आपल्या देशाचे विदेश मंत्रालय कसे काम करते उच्चशिक्षण व या त्यासाठी लागणारी सुविधा जर्मनीत कशा प्रकारे आहे. त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली.

जर्मनीत राहून मराठी माणूस संस्कृती कशाप्रकारे जपतो. याचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. भविष्यात कधी जर्मन भाषा शिकण्याची संधी मिळाल्यास ती नक्कीच शिकण्याचा मनोदय विद्यार्थ्यांनी या चर्चे दरम्यान व्यक्त केला. विदेशात जाऊन सुद्धा आपला मराठी बाणा जपण्याचा उत्तम प्रयत्न करत असलेले दिसून आले. या सुंदर उपक्रमात माझ्या शाळेला छान संधी मिळाली याबद्दल आनंद वाटतो. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास मा. राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. उस्मानाबाद आणि डॉ. अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी (प्रा.) जि. प. उस्मानाबाद यांनी प्रेरणा आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल मान्यवरांचे मनःपूर्वक धन्यवाद.

मंजुषा कमलाकर स्वामी सहशिक्षिका,
जि.प.प्रा.शा.किणी ता.जि. उस्मानाबाद.

12/10/2021
COVID Appropriate Behavior!
11/10/2021

COVID Appropriate Behavior!

Address

Zilla Parishad Dharashiv
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा परिषद उस्मानाबाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा परिषद उस्मानाबाद:

Share