Municipal Council Omerga

Municipal Council Omerga Regarding Swachh Bharat Swachh Omerga Mission

उमरग्यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन; खोल नालीत अडकलेल्या गोमातेला जीवदानउमरगा:शहरातील एकोंडी रोड परिसरातील...
12/03/2026

उमरग्यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन; खोल नालीत अडकलेल्या गोमातेला जीवदान

उमरगा:

शहरातील एकोंडी रोड परिसरातील एका खोल नालीत अडकलेल्या गायीला उमरगा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. विशेष म्हणजे, कोणतेही आधुनिक यंत्र किंवा 'जेसीबी'चा वापर न करता, केवळ दोरीच्या मदतीने आणि सामूहिक मनुष्यबळाच्या जोरावर ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एकोंडी रोड परिसरात एका खोल असलेल्या गटारात एक गाय चुकून पडली होती. गटाराची खोली जास्त आणि जागा अरुंद असल्याने गायीला स्वतःहून बाहेर पडणे अशक्य झाले होते आणि कुठल्या दिशेला जावे कळेनासे झाल्याने गाय कासावीस झाली होती. ही बाब परिसरातील नागरिकांनी तातडीने कार्यालयीन अधीक्षक श्री. भैरवनाथ काळे यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी श्री. रामकृष्ण जाधवर यांनी स्वच्छता विभागाला तातडीने बचाव कार्याचे आदेश दिले.

यंत्राविना राबवली बचाव मोहीम
मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक विकास दनाने आणि मुकादम उद्धव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यंत्राची किंवा जेसीबीची वाट न पाहता, कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने गायीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. गटारातील चिखल, दुर्गंधी आणि अरुंद जागा अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी जिद्दीने या मुक्या जीवाची सुरक्षित सुटका केली. या बचाव मोहिमेत स्वच्छता विभागाच्या पुढील कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली शंकर सोनकांबळे, विकास बनसोडे,लक्ष्मण सुरवसे, धनराज सुरवसे, शाहूराज कांबळे, अनिल खंडागळे, आनंद सुरवसे, रोहित दुनगे तुळशीदास कटके

शहरवासियांकडून कौतुकाचा वर्षाव
कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय, केवळ कौशल्य आणि शारीरिक श्रमाच्या जोरावर गायीचे प्राण वाचवल्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि उमरगा नगरपरिषदेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एका गोमातेला जीवदान मिळाले, अशी कृतज्ञता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत उमरगा नगरपरिषद येथे भूमी, वायु, जल, अग्नी आणि आकाश ह्या पंचतत्वावर  जनजागृती मोहिम,पर्या...
05/03/2026

माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत उमरगा नगरपरिषद येथे भूमी, वायु, जल, अग्नी आणि आकाश ह्या पंचतत्वावर जनजागृती मोहिम,पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग,वातावरणीय बदलाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आले आहे.तसेच विद्यार्थी शिक्षक यांचे कडुन व E-Pledge नोंदणी करण्यात आली.





माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत उमरगा नगर परिषद येथे  येथे भूमी, वायु, जल, अग्नी आणि आकाश ह्या पंचतत्वावर  जनजागृती मोहि...
05/03/2026

माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत उमरगा नगर परिषद येथे येथे भूमी, वायु, जल, अग्नी आणि आकाश ह्या पंचतत्वावर जनजागृती मोहिम,पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग,उपक्रमाद्वारे वातावरणीय बदलाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आले आहे.तसेच विद्यार्थी शिक्षक यांचे कडुन व E-Pledge नोंदणी करण्यात आली.





omerganp7mस्वच्छ सर्वेक्षण 2026🧹🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳majhivasundharaClean Omerga , Green OmergaSwachh survekshan 202...
03/03/2026

omerganp
7m
स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹
🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
majhivasundhara
Clean Omerga , Green Omerga
Swachh survekshan 2026
Majhi Vasundhara Abhiyaan 6.0
MunicipalCouncil Omerga Municipal Council
ULB CODE ८०२८५२

स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳  Clean Omerga , Green Omerga Swachh survekshan 2026 Majhi Vasundhara Abh...
03/03/2026

स्वच्छ सर्वेक्षण 2026🧹
🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳

Clean Omerga , Green Omerga
Swachh survekshan 2026
Majhi Vasundhara Abhiyaan 6.0
MunicipalCouncil Omerga Municipal Council
ULB CODE ८०२८५२

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उमरगा नगरपरिषदेकडून कार्यालयाची करण्यात आलेली सजावट.
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उमरगा नगरपरिषदेकडून कार्यालयाची करण्यात आलेली सजावट.

भारतीय स्वातंत्राच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्य उमरगा नगरपरिषदेकडून दि.१४/०८/२०२५ रोजी बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक र...
15/08/2025

भारतीय स्वातंत्राच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्य उमरगा नगरपरिषदेकडून दि.१४/०८/२०२५ रोजी बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला श्री. रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या बाईक रॅलीत शहरातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील ठिकठिकाणी या बाईक रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

14/01/2025

- जाहीर निवेदन -
उमरगा नगरपरिषद क्षेत्रातील अनधिकृत बॅनर/पोस्टर बाबत तक्रार टोल फ्री क्र 18002331156 नोंदवता येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच याबाबतची विस्तृत सूचना कार्यालयाच्या सूचनाफलकावर लावण्यात आलेली आहे.

🔆 *उमरगा नगरपरिषद कार्यालय उमरगा*🔆 ♻️ स्वच्छ भारत अभियान 2.0 ♻️🔎 स्वच्छ सर्वेक्षण 2024 🔎🌳 माझी वसुंधरा अभियान 5.0🌳आज दिन...
02/10/2024

🔆 *उमरगा नगरपरिषद कार्यालय उमरगा*🔆
♻️ स्वच्छ भारत अभियान 2.0 ♻️
🔎 स्वच्छ सर्वेक्षण 2024 🔎
🌳 माझी वसुंधरा अभियान 5.0🌳

आज दिनांक- 27/09/2024 रोजी केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत "स्वच्छ्ता ही सेवा अभियान" 14/09/2024 ते 02/10/2024 व "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता 17/09/2024 ते 02/10/2024 राबविण्याचे कळविलेले आहे. त्याअंतर्गत दि. 02/10/2024 रोजी उमरगा नगर परिषदेच्या वतीने मा. मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील हुतात्मा स्मारक येथे श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपण उपक्रम घेऊन स्वच्छता दिन साजरा करण्यात आला यावेळी अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

#स्वच्छ भारत अभियान २.०
#स्वच्छ सर्वेक्षण २०२४
#माझी वसुंधरा अभियान ५.०
#सफाई मित्र अभियान

नगर परिषद उमरगा, जि.धाराशिवULB CODE - 802852 ☘️स्वच्छता ही सेवा🍀🌳 माझी वसुंधरा अभियान 5.0 🌳 🔴 स्वच्छ सर्वेक्षण 2024 🔴स्व...
23/09/2024

नगर परिषद उमरगा, जि.धाराशिव

ULB CODE - 802852

☘️स्वच्छता ही सेवा🍀
🌳 माझी वसुंधरा अभियान 5.0 🌳
🔴 स्वच्छ सर्वेक्षण 2024 🔴

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA), भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत “स्वछता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) ही मोहीम सर्व कर्मचारी, सफाई कामगार व शहरातील नागरिकांना मैन रस्ताची स्वच्छता करण्यात आली, तरी शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नगर परिषदेला सहकार्य करुया













own Handle (U)2.0,

19/06/2024

🧹स्वच्छ सर्वेक्षण 2024 🧹
🌏🌱माझी वसुंधरा अभियान ५.० 🌏🌱
MunicipalCouncil Omerga Municipal Council, Municipal Council Omerga
ULB CODE - 802852
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य रस्ता येथे माझी वसुंधरा अभियानातील भूमी, वायू, जल, अग्नी, आकाश हे पंचतत्व दर्शविणाऱ्या प्रतिरूप सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहेत.
🌳 स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरित उमरगा 🌳
🌲भूमी वाचवा 🌲
💧पाण्याचे कराल संरक्षण, वसुधंरेचे होईल रक्षण
🚗💨एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण
🚫🚮आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
🧹मिळून सारे वचन घेऊ, वातावरण आपलं स्वच्छ करु.
💡आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा.
🎇 हरित सण साजरे करा!
🌧️ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा!
🏞️ पर्यावरण दूत बना
🎇 अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करा.
🌲Think before you trash it.
🌳Waste isn't waste until we waste it.
♻️Recycling waste is upcycling your life.
🌳Do not litter, make life better.





















स्वच्छ सर्वेक्षण 2023🧹🌳माझी वसुंधरा अभियान 3.0🌳उमरगा नगरपरिषद उमरगा आयोजित शहर व वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 20...
06/10/2022

स्वच्छ सर्वेक्षण 2023🧹
🌳माझी वसुंधरा अभियान 3.0🌳
उमरगा नगरपरिषद उमरगा आयोजित शहर व वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 दिनांक 2 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत उमरगा शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये आपले अमूल्य योगदान द्यावे.
Clean Omerga , Green Omerga
Swachh survekshan 2023
Majhi Vasundhara Abhiyaan 3.0
MunicipalCouncil Omerga Municipal Council
ULB CODE ८०२८५२










#स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

Address

Municipal Council Omerga
Omerga
413606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal Council Omerga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Municipal Council Omerga:

Share