Engineer Vinayak Anna Bagdure Supporter

Engineer Vinayak Anna Bagdure Supporter इंजि. विनायक (अण्णा) बगदुरे समर्थक

19/09/2024

घटत्या मताधिक्याची संभाजी पाटील निलंगेकरांना चिंता ; निलंग्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी लढत होण्याची शक्यता

साईनाथ घोणे
निलंगा : गेल्या दहा वर्षांपासून निलंगा हा भाजपाचा गड राखणाऱ्या आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात त्यांचे विरोधक आता एकवटले आहेत, ही भाजपची चिंता या निवडणुकीत कायम आहे. २००४, २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर निवडून येत आहेत.
२००९ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथून विजय मिळवला होता. तेव्हापासून काँग्रेसला या मतदारसंघात सूर गवसलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. परंतु मागील कांही काळापासून सातत्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे पराभव पत्करावा लागत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने या जागेवर दावा केला असून राष्ट्रवादीचे इंजि.विनायक बगदुरे हे उमेदवारीसाठी दावेदार मानले जात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटातील इंजि.विनायक बगदुरे यांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव निलंगेकरांसाठी अडचणीचा ठरू शकतो.

काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ देणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआचे डॉ.शिवाजी काळगे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. या मतदारसंघावरील मविआचे वर्चस्व या निमित्ताने अधोरेखित झाले. मविआतील काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ही मविआच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. डॉ.शिवाजी काळगे यांच्या विजयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थान अधिक बळकट झाले आहे. निलंगा मतदारसंघात आ.संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ देण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

बहुजातीय व बहुभाषिक मतदारसंघ

मराठा-कुणबी, दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली, तरी धनगर आणि लिंगायत, रेड्डी/येलम, गुरव, कोळी समाजाची मतेही भरपूर असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे. कोणत्याही एका जातीय घटकाचे वर्चस्व या ठिकाणी नाही. तीन तालुक्यांमध्ये विभागल्या गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ मोठया प्रमाणात ग्रामीण आहे.

राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपली स्थिती मजबूत केली असून इंजि. विनायक बगदुरे यांना मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. इंजि.बगदुरे हे मागील कांही वर्षांपासून निलंगा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्याचा लाभ त्यांना आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

01/08/2024

Address

निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी
Nilanga

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Engineer Vinayak Anna Bagdure Supporter posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category