Pune Ward 9 - पुणे प्रभाग ९

Pune Ward 9 - पुणे प्रभाग ९ बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी सुस-महाळुंगे.

14/01/2026

प्रिय अमोल, स. न. वि. वि. पत्रास कारण की...
आज हे पत्र लिहिताना मन थोडं भरून आलंय आणि डोळ्यांसमोर उभा राहिलाय तो तुझा गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष. ज्या पक्षासाठी तू आयुष्याची उमेदीची वर्षे झिजवलीस, ज्यांच्या निष्ठेसाठी तू दिवस-रात्र एक केलास, त्यांनीच आज ऐनवेळी तुला बाजूला सारलं. तुला तिकीट नाकारणं, इथपर्यंत ठीक होतं रे, पण तुझ्यासारख्या प्रामाणिक, निस्वार्थी, स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्यावर जेव्हा त्यांनी वैयक्तिक आणि हीन दर्जाची टीका केली, तेव्हा मात्र माझं काळीज तीळ-तीळ तुटलं. सत्तेच्या हव्यासापायी त्यांनी तुझ्या कुटुंबावरही शिंतोडे उडवले. ज्या हातांनी तू अनेकांचे डोळे पुसले, त्याच हातांवर चिखलफेक करण्याचं पाप त्यांनी केलं.
लोक म्हणतात राजकारण ही सत्तेची स्पर्धा आहे, पण माझ्यासाठी तू राजकारणापलीकडचं एक 'हक्काचं माणूस' आहेस. तू फक्त युवा नेतृत्व झाला नाहीस, तर तू इथल्या लेकी-सुनांचा भाऊ झालास, मोठ्यांचा मुलगा झालास आणि तरुणांचा आधार झालास. कोणतंही सत्तेचं पद नसताना रस्ते, पाणी वीज, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा... तू प्रत्येक प्रश्न आपलासा करून सोडवला. कोरोनासारख्या भीषण संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून माझी काळजी घेतलीस. अन्नधान्य, औषधं, लसीकरण, मदत... कशा कशाची तू कमी पडू दिली नाहीस.
अमोल, एक गोष्ट लक्षात ठेव... सूर्य ढगांआड गेला म्हणून त्याचं अस्तित्व संपत नाही. त्यांनी तुला गमावलंय, पण मला तुला गमवायचं नाहीये. संकटात साथ देणारा, सुख-दुःखात साथ देणारा हाकेला धावून येणारा आणि दरवर्षी न चुकता सरंजाम कीट देऊन आमची दिवाळी गोड करणारा तू, संकटात असताना आम्ही तुला कसं काय एकटं सोडू?
तू राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेलास, चांगलंचं केलंस. राजकारणातली ही नवी वाट, तुला नवी ऊर्जा देईलच, पण तुझी सर्वात मोठी ताकद तुझा हा प्रभाग क्र. 9 आहे. तू फक्त लढ, मी सर्व ताकदीनिशी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी या प्रभागातल्या प्रत्येक घराचा आशीर्वाद आहे.
अमोल, तू नावाप्रमाणेच 'अमोल' आहेस. म्हणूनच आमचं अनमोल मत फक्त तुलाच. तू निर्धास्त राहा, विजय तुझाच आहे.
तुझा खंबीर पाठीराखा
प्रभाग क्र. 9

Address

Nigdi

Telephone

+919767169222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Ward 9 - पुणे प्रभाग ९ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pune Ward 9 - पुणे प्रभाग ९:

Share