02/06/2025
"वैचारिक राज्याभिषेक सोहळा आणि माझी भूमिका!"
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक शिव राज्याभिषेक सोहळा विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे ,६ जून रोजी संपन्न होत आहे.राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यामागील समन्वय समिती अध्यक्ष म्हणून माझी भूमिका,प्रसार माध्यमे,शिव भक्त,आणि जनतेसाठी स्पष्ट करत आहे.
१) १९ फेब्रुवारी आपण महाराज यांची जयंती नाचून साजरी केली आता ६ जून राज्याभिषेक सोहळा वाचून साजरा करू या,हा एक संकल्प ..लोक प्रकल्प कसा होईल,ते बघू या.
२) आज रोजी महाराज यांच्या सारखे आपण सर्व क्षेत्रातील पारंगत नाही होऊ शकत,आपापल्या क्षेत्रातील मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे नक्कीच होऊ शकतो,हा आत्मविश्वास बनवू या.
३) तोच धागा पकडून,पद्मश्री श्री अच्युत पालव,हे सुलेखन मधील,सौ अभिलाषा म्हात्रे,अर्जुन पुरस्कार प्राप्त हया क्रीडा क्षेत्रातील,श्री प्रकाश बाविस्कर हे उद्योग क्षेत्रात एक बांधकाम व्यावसायिक,तर चौरंग प्रतिष्ठानचे,कला महर्षी श्री अशोक हांडे..हे सर्व मान्यवर त्या,त्या क्षेत्रातील छ्त्रपती नक्कीच आहेत,त्यांचा हात हा नवीन पिढीला बोट धरून चालवा इतका सक्षम आहे,तो लोकांना अवगत करू या.
४) शिव तुतारी प्रतिष्ठान,नवी मुंबई एकदा सोहळा केला,म्हणून थांबणार नाही आहे.वर्ष भर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,मराठी भाषा साठी कविता डॉट कॉम कडून विविध उपक्रम,मान्यवर कवी ,लेखक सोबतच गड किल्ले भेटी,मराठी माणूस ज्याने आपल्या गावाच्या नदीपार झेंडा रोवला,त्यांचे सत्कार आणि बरेच काही उपक्रम करणार आहे,हे शिव साक्ष जाहीर करू या.
५) आज समन्वय समिती मध्ये ५० संस्था आहेत,आमचं उद्दीष्ट आहे,जे विस्थापित आहेत,त्यांना प्रस्थपित करणे,ज्यांनी स्वतःला सिद्ध केले,त्यांना प्रसिद्ध करणे,गरीब आणि गरजू विद्यार्थी यांना आर्थिक पाठबळ ऊभे करणे.शिव तुतारी प्रतिष्ठान ने आज देखील कुठल्याच ५० संस्था कडून आर्थिक मदत न घेता,जी शिव विचार मानणारी मावळे आहेत,त्यांच्या आर्थिक पाठबळ वर हा उपक्रम आहे.
६) माझी धारणा आहे,शिवाजी हा जो अमृत शब्द अलंकार आहे,त्यात खूप मोठा अर्थ आहे शि..म्हणजे शिका, वा...म्हणजे वाचा,आणि जी... म्हणजे जिंका, हया श्वासावर हे सर्व नियोजन आहे.
७) राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा होणार म्हणजे होणारच,हे वचन देतो.या वर्षी देखील हजार लोकात,विष्णूदास भावे नाट्यगृहात,जसे अखंड हरिनाम सप्ताहात श्रीफळ उचले जाते,तसे श्रीफळ ताम्हण मध्ये ठेवून मी रसिकांना,मंडळांना सांगणार आहे,पुढील वर्षी आयोजन साठी शिव तुतारी प्रतिष्ठान सोबत..कोण ते श्रीफळ उचलून कार्यक्रम, करण्याचा पवित्र विडा उचलून..,महाराज यांचा धारकरी,वारकरी होणार आहे.
८) काही ही झाले तरी ..,हा सोहळा लोकांचा,अनेकांचा,लाखोंचा वर्षानुवर्ष राहील कुणाही एकाचा होणार नाही.मला हया वैचारिक राज्याभिषेक सोहळा साठी भाडोत्री रसिक नकोत,कुणी प्रायोजक यांना देखील साष्टांग दंडवत!
९) ही परंपरा, शिव राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची राज्य सरकार यांना,प्रत्येक जिल्हा,तालुका आणि ग्राम पंचायत पातळीवर वैचारिक रित्या साजरा करण्यासाठी आग्रह धरून निवेदन देण्यात येईल,यात यश येणारच,येणार,ही खात्री आहे.
१०) ..आणि, हो..,काही झालं तरी हा सोहळा शिव प्रेमींना गर्व वाटेल असाच होईल.तो समतोल राहील,तोल ना डावी,ना उजवी बाजूकडे झुकेल.राजमुद्रा डोळ्यासमोर ठेवून असेल.
चला,आम्ही तर निघालो, हया महाराज यांच्या या पवित्र कार्यासाठी,तुम्हीही साथ द्या,एक इतिहास घडतोय त्याचा हिस्सा बनून.. किस्सा व्हा!
जय जिजाऊ! जय शिवराय जय!
शंभुराजे!
तुमचा आपला शिव भक्त!,
प्रा.रवींद्र पाटील
अध्यक्ष,
शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई