कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई

कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई कोहापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई

16/02/2026
ELDERTHON – “तू चाल पुढं” 2026 ❤️आज आपल्या ज्येष्ठांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं – उत्साहाला वयाची मर्यादा नसते!५०० + ज्येष...
16/02/2026

ELDERTHON – “तू चाल पुढं” 2026 ❤️

आज आपल्या ज्येष्ठांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं – उत्साहाला वयाची मर्यादा नसते!

५०० + ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग,
२००+ स्वयंसेवकांचे योगदान,
आणि सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन —

त्यांच्या प्रत्येक पावलामागे जिद्द, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद दिसत होती. हा फक्त वॉक नव्हता… तर प्रेरणेचा प्रवास होता🙏

🙏🏻 ऐरोलीतील गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा🙏🏻कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने ऐरोली विभागातील ग...
26/08/2025

🙏🏻 ऐरोलीतील गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा🙏🏻

कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने ऐरोली विभागातील गणेशभक्तांसाठी यंदा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजरा व चंदगडपर्यंत कोल्हापूरकरांना आपल्या गावी सहज, सुरक्षित आणि विनामूल्य प्रवास करता यावा यासाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभा खासदार मा. नरेश म्हस्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख श्री. सुरेश भिलारे व श्री. बंडू केणी यांच्या प्रयत्नांतून हाही उपक्रम शक्य झाला.

रविवारी सायंकाळी ऐरोली सेक्टर १० येथील डी मार्टजवळून खासदार मा. नरेश म्हस्के साहेब यांच्या हस्ते नारळ वाढवून व “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात बससेवा रवाना करण्यात आली.

या प्रसंगी कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. डी. एल. भादवणकर, कार्याध्यक्ष श्री. विशाल पाटील, सचिव श्री. प्रकाश तेजम, खजिनदार श्री. रणधीर पाटील, उपाध्यक्ष श्री. मारुती (माँटी) अर्धाळकर, सहखजिनदार श्री. अभिजित पुजारी तसेच मान्यवर कार्यकर्ते श्री. मारुती हातकर, श्री. गोविंद पाटील, श्री. सुहास शिंदे, श्री. उत्तम भादवणकर, श्री. संदीप पाटील, श्री. संदीप भिंबर आदी उपस्थित होते.

✨ कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई — समाजासाठी, सेवेसाठी आणि एकतेसाठी नेहमीच तत्पर 🙏🏻

🙏 कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई 🙏शालेय साहित्य वाटप उपक्रम – एक भावनिक अनुभव, एक सामाजिक बांधिलकी😍आमद...
03/07/2025

🙏 कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई 🙏
शालेय साहित्य वाटप उपक्रम – एक भावनिक अनुभव, एक सामाजिक बांधिलकी😍

आमदार मा. शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेतून चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा या तालुक्यांतील दुर्गम भागांमध्ये मागील ४ दिवसांत आमच्या संस्थेच्या आणि अंकुश सोनावणे मित्र मंडळ यांच्या वतीने अत्यंत गरजू व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेंसिली, दप्तर आणि इतर शालेय साहित्य यांचे वाटप चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांमध्ये करण्यात आले.

शिक्षणाची खरी सुरुवात ही अशा छोट्या गोष्टींपासूनच होते आणि हाच आमचा छोटासा पण खंबीर प्रयत्न आहे – विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा!

👀 लहानग्यांच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य, डोळ्यांमधली चमक आणि त्यांच्या छोट्याशा “धन्यवाद” मध्ये जो आत्मिक आनंद होता, तो शब्दात मांडता येणं कठीण आहे.

🌟 “शाळेच्या वस्तू” म्हणजे फक्त साहित्य नाही, तर त्या त्यांच्या स्वप्नांची सुरुवात आहे…

💫 संस्थेचे कार्य केवळ शालेय साहित्य वाटपापुरते मर्यादित नसून, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास या तीन महत्वाच्या दिशांनी सातत्याने पुढे चालले आहे.

🌾 आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांची कठोर मेहनत आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम शक्य झाला.

🟢 मुंबईत राहूनही आपल्या मातीशी नाळ जोडलेली ठेवत, गरजूंसाठी पुढाकार घेणं हेच कोल्हापूरकर संस्थेचं ब्रीद आहे.

🤝 आपला छोटासा हातभार या मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

ही केवळ वस्तूंची मदत नाही, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेलं बळ आहे… आणि या वाटचालीत तुम्हीही सहभागी व्हा, कारण छोटा हातभारही मोठं भविष्य घडवू शकतो!😍

Address

Airoli
Navi Mumbai
400708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category