BJP for Navi Mumbai

BJP for Navi Mumbai India's National political Party, BJP, Navi Mumbai, Maharashtra. Twitter : https://twitter.com/Nav

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील साहेबांचे  नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज संपूर्ण नवी मु...
10/06/2021

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांसोबत " आता आमचा निर्धार ठाम " नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील साहेबांचे नाव या मागणीसह मानवी साखळी तयार करून एक लक्षवेधी आंदोलन केले . पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन करण्यात आलंय.

भाजप युवा नेते निशांत भगत यांनी वाशी मधील  ESIS रुग्णालय जंबो लसीकरण केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व विष्णुदासभावे नाट्यगृ...
21/05/2021

भाजप युवा नेते निशांत भगत यांनी वाशी मधील ESIS रुग्णालय जंबो लसीकरण केंद्र, नागरी आरोग्य केंद्र व विष्णुदासभावे नाट्यगृह या प्रमुख महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राला भेट दिली होती . भेटी दरम्यान
नवी मुंबई महानगरपालिका लस पुरवठा योग्य पद्धतीने न हाताळता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रबंध दिसून येत असल्याचे त्यांच्या समोर आले .
त्यांनी अशी मागणी केली की ,
महापालिकेच्या वतीने शहरातील उर्वरीत 45 वर्षावरील नागरिकांना मोफत लस द्यायायला सुरवात करावे व प्रलंबित लस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने विचार करावा.

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून देशातील दुसरा व राज्यातील पहिला असा ...
20/05/2021

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून देशातील दुसरा व राज्यातील पहिला असा नवी मुंबईतील महत्वाकांक्षी अशा मरिना प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे.

सीबीडी-बेलापूर सेक्टर 15 येथील भूखंड क्र.111A, अंदाजित क्षेत्रफळ 7.25 एकर जागेचा ताबा सिडकोने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला काही अटी व शर्तींवर मरिना प्रकल्पास देण्यात आला आहे. सदर प्रकल्पास लागणारी सी.आर.झेड.ची परवानगीही मिळाली असून सदर प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर काम हे मे. स्वस्तिक इन्फ्रा लॉजिक प्रा.लि. या कंपनीस देण्यात आले असून कंपनीने प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे सादर केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 30 प्रवासी बोटींसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार असून वेटिंग रूम, पार्किंग, अँपी थिएटर, गार्डन, जॉगिंग ट्रॅक अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.नियोजित मरिना प्रकल्पाच्या बाजूलाच 8 कोटी रुपये खर्चाने बेलापूर जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. सदर जेट्टीच्या माध्यमातून भाऊचा धक्का, मांडवा, एलिफंटा, करंजा अशा प्रवासी बोटींच्या फेऱ्या होणार आहेत.

नवी मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव सुरू होताच जुलै 2020मध्ये सर्वात आधी नवी मुंबई महापालिकेने कोरोनाची लस खरेदी करून ती सर्व...
20/05/2021

नवी मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव सुरू होताच जुलै 2020मध्ये सर्वात आधी नवी मुंबई महापालिकेने कोरोनाची लस खरेदी करून ती सर्व नवी मुंबईकरांना मोफत द्यावी, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली होती. कोरोना नियंत्रणातील लसीकरणाचे महत्व आता उमजल्यामुळे लोकनेते नाईक यांच्या सुचनेनुसार पालिकेने चार लाख लसींची खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया देताना लोकनेते नाईक यांनी नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लस खरेदी करून ती सर्व नवी मुंबईकरांना विनामुल्य द्यावी, या मागणीचा पुनरूच्चार केला आहे. आमदार नाईक यांची कोरोना नियंत्रण उपाययोजना संबधी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर मंगळवारी आढावा बैठक झाली. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक आदी उपस्थित होते.

Former Minister & Airoli MLA Ganesh Naik has given Rs. 1 Crore of his MLA funds for setting up an oxygen generation plant in Navi Mumbai. He has urged NMMC to also utilize additional MLA funds for buying COVID-19 vaccines. The discussions at NMMC with Commissioner Abhijit Bangar; saw MLA Ganesh Naik demanding immediate formation of a special task force that will procure needed medicines, build COVID Care Center, with pediatric expertise for procuring medicines, building COVID-19 care centers for kids with arrangement for parents staying close to kids. He also advised NMMC to create awareness about the third wave through advertisements in the city. The meeting was also attended by former MLA Sandeep Naik, former Mayor Jaywant Sutar, former Sudhakar Sonawane & former Mayor Sagar Naik.

Address

Navi Mumbai
400705

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP for Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP for Navi Mumbai:

Share