16/04/2026
महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी सूचना
आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे साहेब व आदरणीय महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रोहीणीताई खडसे यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष या पदासाठी इच्छुक असलेल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज खालील विहित नमुन्यानुसार माझे ॲाफीस नं ५, तळमजला, नीलकंठ कॅार्नर,सेक्टर २, सानपाडा,नवी मुंबई सादर करावेत.
सदर अर्ज मंगळवार दिनांक २२/०४/२६ पर्यंत माझ्या वरील जनसंपर्क कार्यालयात, सीलबंद स्वरूपात श्री. अक्षय बोराडे यांच्याकडे जमा करावेत.
अर्जामध्ये खालील माहिती नमूद करावी:
1. अर्जदाराचे पूर्ण नाव
2. शैक्षणिक आहर्ता
3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किती वर्षांपासून कार्यरत आहेत
4. सध्या व पूर्वीची पदे (असल्यास)
5. लढवलेल्या निवडणुकांचा तपशील
6. महिला जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर संघटन बांधणीसाठी काय काम करणार याबाबत सुमारे १०० ओळींचे विवेचन
सर्व इच्छुकांनी वरीलप्रमाणे अर्ज वेळेत सादर करावेत.
आपला,
डॉ. मंगेश आमले
जिल्हाध्यक्ष
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Jayant Patil - जयंत पाटील Rohit Rajendra Pawar Adv Rohini Eknathrao Khadse Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले