Adv. Nitin Thakare

Directions

Adv. Nitin Thakare सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य' सुसंस्कृतता आणि माणुसकी यासाठी जीवन माझे !

शब्दांशिवायही संवाद घडतो… कारण मनापर्यंत पोहोचण्यासाठी आवाजाची गरज नसते. सांकेतिक भाषा ही केवळ हातांच्या खुणांची भाषा ना...
23/09/2026

शब्दांशिवायही संवाद घडतो… कारण मनापर्यंत पोहोचण्यासाठी आवाजाची गरज नसते. सांकेतिक भाषा ही केवळ हातांच्या खुणांची भाषा नाही; ती भावना, विचार आणि माणसांना एकमेकांशी जोडणारा संवादाचा सेतू आहे. जागतिक सांकेतिक भाषा दिनानिमित्त सर्व कर्णबधिर बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

22/09/2026

होरायझन स्कूलच्या बांधकामावरील आरोपांना वार्षिक सर्वसाधारण सभेत ॲड. नितीन ठाकरे यांचे सडेतोड उत्तर — “एक इंचही बांधकाम अनधिकृत नाही; आणि अनधिकृत निघालं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. संस्थेचा सभासद असताना वैयक्तिक आकसातून संस्थेविरुद्ध तक्रारी करणे योग्य नाही.”

22/09/2026

११२ वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या देणगीतून सुरू झालेलं उदाजी वसतिगृह… आणि आज त्याच परिसरात उभं राहिलेलं १३ मजली वसतिगृह — मविप्रच्या नव्या उंचीची पायाभरणी…

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. ग्रामीण, बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार...
22/09/2026

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. ग्रामीण, बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांनी ‘रयत शिक्षण संस्था’ उभी केली आणि ‘कमवा व शिका’ या विचारातून स्वावलंबी शिक्षणाची दिशा दिली. ज्ञान केवळ काहींच्या हातात न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा ध्यास होता. महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

21/09/2026

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांची ऐतिहासिक घोषणा!

20/09/2026

आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून मराठा विद्या प्रसारक समाजात लोकशाही नव्याने रुजल्याचा विश्वास दृढ झाला. सभासदांचा आवाज, सहभाग आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा हीच मविप्रची खरी ताकद आहे. लोकशाहीच्या या लढ्यात, या प्रवासात विश्वासाने साथ देणाऱ्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक जाहीर आभार! आपल्या साथीनेच ही वाटचाल पुढे जाणार आहे. जय मविप्र!

20/09/2026

मराठा विद्याप्रसारक समाज सभासद बांधवांचे जाहीर आभार

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. संस्थेच्या पुढील वाटचाली...
19/09/2026

मविप्र समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. संस्थेच्या पुढील वाटचालीत आपल्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व सभासदांना आग्रहाचे निमंत्रण! 🙏

Address

Nashik
422002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Nitin Thakare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category