18/11/2014
आपल्या लक्षात आणू इच्छितो कि, अमित राज ठाकरे व उर्वशी राज ठाकरे यांची कुठल्याही प्रकारची फेसबुक ट्विटर, आदी सोशल नेटवर्किंग संदर्भातील अकाऊंट्स नाहीत.. याअगोदरसुध्दा डिसेंबर २०१२ ला सायबर क्राईम ब्रांच, मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती.
अमित ठाकरे व उर्वशी ठाकरे यांच्या नावे सोशल नेटवर्किंगवर खोटी अकाउंट्स उघडून कोणीतरी लोकांमध्ये संभ्रम व दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत...
यासंदर्भात काल दि.१७/११/२०१४ रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास मुंबई पोलीस सायबर क्राईम ब्रांचला त्वरीत कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले असुन कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी...
- सचिन मारुती मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राजगड मुख्यालय...