14/01/2025
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*
दि 16 जानेवारी, 2025
*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव* यांच्या संयुक्त विद्यमाने *दिनांक 16 जानेवारी, 2025* रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन पदवी प्रधान सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले आहे.
सदर रोजगार मेळाव्यात 25+ कंपन्यांनी /उद्योजकांनी सुमारे 2500+ रिक्त पदे अधिसूचित केलेली आहेत.
या रोजगार मेळाव्यात भाग घेण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांना *ऑनलाइन अप्लाय* करावे व आपली शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, आधार कार्ड, बायो डेटा सह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा व आपल्या परिचितांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन *सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव* यांनी केले आहे.
Overview: The Government of Maharashtra has introduced the Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana, an initiative designed to provide internship opportunities to the unemployed youth of the state. This scheme aims to enhance the employability and skill set of young individuals, preparing them for...