Crime Prevention Council & Investigation

Crime Prevention Council & Investigation Crime Prevention Council & Investigation public charitable trust founded on August 2013 in Delhi in

Crime Prevention Council and Investigation public charitable trust founded on 2nd august 2013 in Delhi in accordance with home ministry of affairs acts & rules with motive to serve the society at large by carry on the activities of crime prevention and includes all its related activities and all the basic needs of a person to lead a normal life at cost affordable to the general public of the socie

ty without any motive to make any profit or to have any other form of gain by doing so. The area of activities of the trust to do social welfare programs for needy and poor women & children’s and all the basic needs of a person to lead a normal life at costs affordable to the general public without any profit-making motive. Crime Prevention Council and Investigation is always trying to prevent crime from society, whenever we get information of any crime happened or would be happen anywhere our team members investigates and inform Police departments which helps to reduce crime level at certain level, also if any innocent in case we always try help to get out of it.

गुन्हा कोणताही असुदे,पण सतर्कता बाळगणे,तसेच योग्य माहितीचे ज्ञान असणे,केव्हाही चांगलेच. महाराष्ट्र पोलीस Nashik City Pol...
03/02/2026

गुन्हा कोणताही असुदे,
पण सतर्कता बाळगणे,
तसेच योग्य माहितीचे ज्ञान असणे,
केव्हाही चांगलेच.

महाराष्ट्र पोलीस
Nashik City Police Nashik Rural Police

22/11/2025

आपल्या महाराष्ट्रात मालेगाव सारखी दुर्दैवी घटना घडून संपूर्ण राज्यातील नागरिक व आई वडील आणि जिव्हाळा असणारे सर्व हळहळ व्यक्त करीत, मिळून आलेल्या नराधमाला फाशी व्हावी यासाठी आक्रोश करीत, पोलीस तसेच मा न्याय पालिकेला साकडं घालीत आहेत.

त्यास कठोर शिक्षा होईल यांत किंतु मात्र शंका नाही मात्र ती वेळेवर आणि तत्काळ व्हावी हाच आपला सर्वांचा आग्रह आहे. कारण या नंतर पून्हा कुठली यज्ञा बळी जाणार नाही याच साठी अट्टाहास आपल्या सर्वांचा.
#डोंगराळे #मालेगाव

या निमित्ताने पुढे काही अपरिहार्य घडू नये यासाठी काही पालकांना सूचना व विनम्र आवाहन..
१) आपली मुले अथवा मुली शाळा, कॉलेजला वेळवर जाऊन वेळेवर घरी परततात का?

२) आपली मुले अथवा मुली शाळेच्या अथवा शिकवणी च्या नावाखाली इतरत्र जॉगिंग ट्रेक, गार्डन, मंदिर परिसरात घरच्यांना माहीत नसलेल्या अनोळखी व्यक्ती सोबत फिरायला जाण्याची हिंमत कशी करतात?

३) आपली मुले आणि मुली शिकवणी सोडुन शहराच्या मध्यवर्ती भागातील जॉगिंग ट्रेक परिसरात सर्रास सकाळी 7 वाजे पासून रात्री 11 वाजे पर्यंत पालकांच्या डोळ्यात धूळफेक करीत असतात, याला जबाबदार कोण?

४) यात मुली देखील सर्रासपणे अश्लील चाळे करीत संबंधित मुलांचे मनोरंजन करताना आढळून येतात.

५) सदर बाबतीत पोलिसांची मदत घेतली तर उलट पोलिसांना कायदा शिकवितात. हाय कोर्टाचा आदेश आहे सार्वजनिक ठिकाणी बसण्यास कोणीही हरकत घेऊ शकत नाही.

६) या घटना बघता अनेक जॉगिंग ट्रेक परीसरात लव्ह जिहाद सारख्या प्रकारांनी मजल मारली आहे. समाजवादी संघटना जेवढी मदत करता येईल अथवा हे रोखता येईल त्याचा कायम प्रयत्न करीत असतात.

७) शाळा, कॉलेज, क्लासेस, फाउंडेशन आदी ठिकाणी मुले अथवा मुली येत जात असतील तर तेथील प्रशासनाने येण्याची व जाण्याची वेळ पालकांना कॉमन मेसेज स्वरूपात नित्य पाठविल्यास या अपप्रकारांना आळा घालणे शक्य होईल.

८) पालकांनी परवानगी दिल्यास जी मुले व मुली शाळा, कॉलेज, क्लासेस, फाउंडेशन सोडून इतरत्र पालकांना चुकवून अपप्रकार करतात त्यांचे छायाचित्र संकलन करून या CPCI च्या माध्यमातून जागृती करावी का?

या द्वारा संदेश एकच घ्यायचा आहे की पालकांना निदर्शनास आणून देऊन भविष्यात काही अपरिहार्य घटना होणे आधीच सावध होणेच मदत.

~जनहितार्थ
-CPCI

15/10/2025

“नाशिक जिल्हा - कायद्याचा बालेकिल्ला, गुन्हेगारांना नाही थारा!”

“गुन्हेगारांनो सावरा,
कायद्याचं राज्य आहे स्वतःला आवरा,
नाहीतर तुरुंगात मिळेल आसरा..!”

"समाजात जागृती,
कायद्याची भीती,
नागरिकांची खबरदारी,
सुरक्षित नाशिक आपली सर्वांची जबाबदारी.!”

नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांना खुद्द गृहमंत्री यांनी दिलेला आदेश आणि त्यातून नाशिक पोलिसांनी घेतलेला गुन्हेगारी रोखण्यासाठी रुद्रावतार, याला सर्व नाशिककर जनतेने पाठिंबा दिला आहे.

लवकरच संबंध नाशिक शहरातून नाशिक पोलिसांचे मनोबल वाढविण्यास #सुरक्षितनाशिक_भयमुक्तनाशिक या अनुशंगाने रॅली निघणार आहे.

Nashik City Police
Nashik Rural Police
Devendra Fadnavis
CMOMaharashtra

नाशिक शहरात गुन्हेगारी ला आळा घालन्यासाठी व नागरिकांना सुरक्षित राखण्यासाठी गृहविभागाची पोलीस यंत्रणा दिवस रात्र करडी नज...
13/10/2025

नाशिक शहरात गुन्हेगारी ला आळा घालन्यासाठी व नागरिकांना सुरक्षित राखण्यासाठी गृहविभागाची पोलीस यंत्रणा दिवस रात्र करडी नजर ठेवून आहे.

त्याचाच एक भाग नवीन नाशिक परिसरातील शालेय विदयार्थी यांना संरक्षण व शालेय आवारात फिरकणारे टवाळखोर यांना वचक बसवल्याने, पालकांनी मोकळा श्वास सोडला आहे.

या कर्तव्य दक्षते बद्दल पोलिस आयुक्त आणि संपूर्ण टीम यांचे अभिनंदन.!

#नाशिकजिल्हा_कायद्याचाबालेकिल्ला
Nashik City Police CMOMaharashtra Devendra Fadnavis Nashik Rural Police

13/10/2025

नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण पोलीस देखील गुन्हेगारी मोडून काढण्यास ऍक्शन मोडवर.....

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचा गुन्हेगारांना थेट इशारा !

यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे, गावठी दारू भट्या, अवैध उत्खनन, अपवाद असलेले खोट्या 376 करून लुबाडणूक करणारे इसम यांना कायद्याचा जरब बसणे आवश्यक आहे.
Nashik City Police
#कायद्यातराहाल_तरफायद्यातराहाल
Devendra Fadnavis CMOMaharashtra
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar

#कारवाई

11/10/2025

नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे "सुरक्षित नाशिक" व "भयमुक्त नाशिक" करिता तमाम नाशिककर जनतेला आवाहन...

ड्रग्ज माफिया, गॅंग माफिया, लँड माफिया, तसेच मदतीच्या नावाखाली ब्लॅक मेल करणारे, छेड काढणारे अशा सर्वांसाठी नाशिक पोलीस ठरणार कर्दनकाळ..!



Nashik City Police
Nashik Rural Police

CMOMaharashtra Devendra Fadnavis

कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल..! Nashik City Police Nashik Rural Police
09/10/2025

कायद्यात रहाल तर
फायद्यात रहाल..!

Nashik City Police Nashik Rural Police

09/10/2025

नाशिक पोलिसांना सलाम..!🙏🏻🙏🏻
सत्यमेव जयते..!
चला आपले नाशिक शहर पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त करूया.

नाशिक पोलिसांना सुरक्षित नाशिक साठी पाठिंबा देऊ या.!


Nashik City Police CMOMaharashtra

भयमुक्त नाशिकसाठी,नाशिक पोलिसांना जनतेचा जाहीर पाठिंबा…!आता काढा दंडा… सुरक्षित नाशिकसाठी हाच अजेंडा..!भयमुक्त नाशिक साठ...
09/10/2025

भयमुक्त नाशिकसाठी,
नाशिक पोलिसांना जनतेचा जाहीर पाठिंबा…!

आता काढा दंडा…
सुरक्षित नाशिकसाठी हाच अजेंडा..!

भयमुक्त नाशिक साठी ही वेळ नाही….
•राजकारण करण्याची
•पोलिसांच्या कर्तव्यावर टीका करण्याची
•गृहविभागावर टीका टिप्पणी करण्याची.

सुरक्षित नाशिक साठी ही वेळ आहे…..
•गुन्हेगार व गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्याना उध्वस्त करण्याची
•गुन्हेगाराना थरकाप होईल असा कठोर धडा शिकवण्याची
•गुन्हेगाराना वचक बसविण्यासाठी नाशिक पोलिसांना पाठिंबा देण्याची.

समस्त नाशिककर जनता सुरक्षित नाशिक करिता उत्स्फूर्त पणे नाशिक पोलीस आयुक्त व अधिकारी यांचे सोबत आहे.
~CPCI~

Nashik City Police
CMOMaharashtra Devendra Fadnavis

एक अभिनव उपक्रम...एक पाउल CPCI चे... सुरक्षित महाराष्ट्र - सुरक्षित नाशिक साठी.क्राइम प्रिवेंशन कौन्सिल & इन्वेस्टिगेशन ...
13/01/2025

एक अभिनव उपक्रम...
एक पाउल CPCI चे... सुरक्षित महाराष्ट्र - सुरक्षित नाशिक साठी.

क्राइम प्रिवेंशन कौन्सिल & इन्वेस्टिगेशन (CPCI) आणि नाशिक पोलिस संयुक्त विद्यमाने "सुरक्षित महाराष्ट्र - सुरक्षित नाशिक साठी" राज्यभर प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक व मालक यांना स्वतःच्या तसेच वाहन व प्रवासी सुरक्षेसोबत राष्ट्र सुरक्षित राखण्यासाठी कायद्यायचे पालन करीत मार्गक्रमण करण्यास समर्पित भाव मनी राखून संघटित झाले आहेत.

या द्वारा सर्व प्रवासी वाहन चालक - मालक प्रथम आपल्या वाहनाचे विमापत्र, प्रवासी परवाना, बैच बिल्ला, गणवेश, पीयूसी, वाहन फिटनेस, फ़ास्टटैग आदि बाबत नित्य गाम्भीर्याने लक्ष ठेवले पाहिजे.

याशिवाय वाहन चालक अथवा मालक यांचा मोठया रकमेचा विमा असणे आवश्यक आहे. कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर देश सुरक्षित यासाठी स्व-सुरक्षा देखील अवलंबिली पाहिजे असे CPCI चे प्रमुख प्रविण अलई यांनी सूचित केले.

क्राइम प्रिवेंशन कौन्सिल & इन्वेस्टिगेशन (CPCI) आणि नाशिक पोलिस संयुक्त विद्यमाने "सुरक्षित महाराष्ट्र - सुरक्षित नाशिक साठी" राज्यभर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर सांकेतिक चिन्ह लावून, सदर वाहन सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणारे तसेच सुरक्षित वाहतूक करीत प्रवासी सुरक्षा जोपासणारे आणि वेळ प्रसंगी CPCI च्या संपर्कात राहून आपल्या परिघात काही अपरिहार्य घटना घडत असेल अथवा घडविन्याबद्दल काही निदर्शानास येत असेल तर याबाबत ख़बरदारी घेत तत्काळ CPCI समुहास कळवून, आपण घेतलेल्या देश सेवेच्या व्रताचे पाइक व्हावे. आपली एक खबर देव देश आणि राष्ट्र सुरक्षे साठी अनमोल ठरू शकते. असे प्रतिपादन पोलिस आयुक्त ड़ॉ संदीप कर्णिक यांनी केले.

या अभिनव उपक्रमाचे मा पोलिस आयुक्त डॉ संदीप कर्णिक, सीपीसीआय प्रमुख श्री प्रविण अलई, पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राउत, श्री किरणकुमार चव्हाण, श्री चंद्रकांत खांडवी, श्री प्रशांत बच्छाव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुनील पवार, श्री सुभाष ढ़वळे, वाहतूक पोलिस अधिकारी श्री सुधाकर सुरडकर यांनी उपक्रमास शुभेच्छा देंत सर्व प्रवासी वाहन चालक मालक यांना मार्गदर्शन केले.
*~TeamCPCI*
Mob 7276818199
Nashik City Police Nashik Rural Police

पुन्हा एकदा पोलिसातील माणूस जागा आहे याची प्रचिती..पोलिस दादा... हाच खाकी चा वादा..!नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात बाळंत...
05/01/2025

पुन्हा एकदा पोलिसातील माणूस जागा आहे याची प्रचिती..
पोलिस दादा... हाच खाकी चा वादा..!

नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात बाळंतीण महिलेसोबत तीन दिवसांच्या तोंडओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेने माता - पित्याच्या डोळ्यांदेखत, बाळ सांभाळत असल्याचे भासवून जिल्हा शासकीय रुग्णालयातून पोबारा केला. शनिवारी ४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेने जिल्हा रुग्णालय तसेच नाशिक शहर प्रशासन चक्रावून गेले.

सुमन खान, बाळाची आई एकच टाहो फोडत होती कि,
ती महिला रुग्णालयातच भेटली होती. माझ्या ती ओळखीची नाही किंवा नातेवाइकेदखील नाही. माझ्या बाळाला खेळवत असताना ती म्हणाली, मी बाळाला बाहेर घेऊन जाते. तुमच्या पतीकडे बाळाला देऊन येते. असे सांगून बाळाला माझ्याकडून घेऊन गेली. माझे बाळ मला पुन्हा परत मिळावे, अशी मी हात जोडून सांगत असताना.

जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापन डॉ चारुदत्त शिंदे यांनी तत्काळ पोलिस अधिकारी यांना सर्व माहिती दिली. त्यावेळी पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, आणि क्राइम यूनिट-१ मधुकर कड़ यांचे पथक दाखल झाले.

तपासाची चक्रे जलद गतिने फिरू लागली सर्व स्तरातून माहिती व चौकशी संकलित करुण नाशिक पोलिस आणि क्राइम यूनिट-१ प्रचंड परिश्रम घेत अवघ्या काही तासात बाळाचा लावला शोध लावला आणि त्या आईला बाळ मिळवून दिले.

जिल्हा रुग्णालयाचे डॉ चारुदत्त शिंदे तसेच कर्मचारी यांनी तत्काळ पोलिस अधिकारी यांना गंभीर बाब कळविल्याने, क्राइम यूनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि पथकाने केलेल्या कामगिरीचे स्वागत आणि हॄदयापासुन अभिनंदन.!
~Cpci
Nashik City Police Nashik Rural Police Devendra Fadnavis
Girish Mahajan

निसर्गतः सुप्तावस्थेत असलेल्या  कलाकारांच्या कलांना वाव देण्यासाठी आपल्या हक्काचं एक मंच मिळावा या उद्देशाने  नृत्य, समू...
08/12/2024

निसर्गतः सुप्तावस्थेत असलेल्या कलाकारांच्या कलांना वाव देण्यासाठी आपल्या हक्काचं एक मंच मिळावा या उद्देशाने नृत्य, समूह नृत्य, गायन, कराओके या प्रकारात कलांकारासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या असता, महाराष्ट्रातील अनेक शहरातून कलाकारांची उपस्थिती लाभली.

यावेळी जनतेचा मित्र म्हणजे पोलीस मित्र यांच्यातही अनेक कला असतात. पंरतू जनतेचे व कायद्याच्या या रक्षकाची भुमिका पार पाडत असतांना, आपल्या कलेला तसेच सुप्त गुणाना वाव व वेळ देत प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न सी पी सी आय (क्राईम प्रिवेंशन कौंसिल & इन्वेस्टिगेशन,NGO) द्वारा करीत आहोत.

कारण या पोलिसांच्या भुमिकेत असतांना कायम मानसिक तणाव असतो, या आपल्या रक्षणार्थ कायम तत्पर असलेल्या मित्रांना तणावातून मुक्ती मिळेल व आपल्याकडून या पोलीस मित्रांना एक आनंदाचा क्षण देता यावां यासाठी देखील मोठा उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

यावेळी आपली उपस्थिती सह आयोजन झाल्याने नाशिक पोलिसांचे मनस्वी आभार.!

क्राइम प्रिवेंशन कौंसिल & इंवेस्टि.(CPCI)
Pravin Alai-

Address

Trimbak Road
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Crime Prevention Council & Investigation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category