29/05/2026
📍भव्य हल्लाबोल मोर्चा, सातारा
आज सातारा जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, युवकांचे प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असे गंभीर मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान आज सातार्यात झालेला हा हल्लाबोल मोर्चा वादळी ठरला. बेरोजगारी, महागाई, नीटची पेपरफुटी, शेतकऱ्यांवरच्या अन्यायाविरोधात तमाम सातारकर आज मैदानात दाखल झाले होते. जनतेचा आक्रोश त्यांच्यापुढील समस्यांचा साक्ष देत होता.
सरकारचा अन्याय आणि अत्याचार आता सहन करायचा नाही तर आता मैदानात उभं राहून लढायचं आणि जिंकायचं देखील !
#भव्य_हल्लाबोल_मोर्चा
#सातारा_मोर्चा
#जनआंदोलन