MyNmc

MyNmc Official Page for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram and Twitter for daily updates.
(1)

For Any queries please call on Nmc helplines +917030300300

06/09/2026

सुरक्षित रस्ते, सुखकर नाशिककर!

पावसामुळे रस्त्यावर साचलेला चिखल हटवून अपघात टाळण्यासाठी NMC कडून हाय-प्रेशर वॉशिंग मोहीम सुरू आहे. नागरिकांची सुरक्षितता हीच मनपाची प्राथमिकता आहे.

नागरिकांनीही सहकार्य करावे आणि वाहने वेगावर नियंत्रण ठेवून चालवावीत.

नाशिक मनपा शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांना शिक्षक दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रा...
06/09/2026

नाशिक मनपा शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांना शिक्षक दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही संपूर्ण नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

आपल्या ज्ञानदानातून आणि समर्पित सेवेतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या कुंदाताईंच्या या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावणारा आहे.

कुंदाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

सार्वजनिक गणेशोत्सव २०२६  नियोजन विशेष बैठक नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात आणि शांतत...
06/09/2026

सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ नियोजन विशेष बैठक

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख, पदाधिकारी आणि नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून आपले अमूल्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

शिक्षण संवादातून डिजिटल पर्वाचा शुभारंभ!शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्याचे मा. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या...
06/09/2026

शिक्षण संवादातून डिजिटल पर्वाचा शुभारंभ!

शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्याचे मा. शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक महानगरपालिका शिक्षकांचा विशेष ‘शिक्षण संवाद’ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मा. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या शुभहस्ते महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अधिकृत pageचे उद्घाटन करण्यात आले. या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून मनपा शाळांमधील अभिनव उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य आता अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

मा. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि मा. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी शिक्षकांशी संवाद साधत त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव केला. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम आणि संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांचा सन्मान… शिक्षणाचा विस्तार… अन् डिजिटल नाशिकच्या दिशेने नवी सुरुवात!

06/09/2026

उंची कितीही असो… NMCची सुरक्षा पोहोचणारच!

नाशिक अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे तब्बल ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचणारी अत्याधुनिक ‘एरियल लॅडर प्लॅटफॉर्म’!

• ९० मीटर उंचीपर्यंत पोहोच
• ३० मीटर आउटरिच
• ५०० किलो क्षमतेची केज
• प्रतिमिनिट ३८०० लिटर पाणीफेक
• ३६०° फिरण्याची क्षमता

उंच इमारतींमधील आग आणि आपत्कालीन परिस्थितीत वेगवान मदत व प्रभावी बचावकार्य करण्यासाठी नाशिक आता अधिक सक्षम, अधिक सज्ज!

High-Rise Nashik, High-Tech Safety!

नाशिकच्या सर्जनशील परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या तरुणाईसाठी भविष्यातील रोजगाराची नवी दालने खुली करण्यासा...
05/09/2026

नाशिकच्या सर्जनशील परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या तरुणाईसाठी भविष्यातील रोजगाराची नवी दालने खुली करण्यासाठी IICT चे CEO डॉ. विश्वास देवोस्कर यांची भेट महापौर मा. हिमगौरी आहेर-आडके व मनपा आयुक्त मा. मनिषा खत्री यांनी घेतली.

यावेळी दादासाहेब फाळके यांच्या कलाभूमीत IICT सारख्या नामांकित संस्थेला आमंत्रित करून नाशिकला डिजिटल इनोव्हेशन आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचे मुख्य केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आपल्या शहरातील तरुणांना जागतिक दर्जाच्या संधी मिळवून देणे मागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

भारताचे थोर तत्त्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
05/09/2026

भारताचे थोर तत्त्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!


डेंग्यू-मलेरियाविरोधात नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये!घराघरांत सर्वेक्षण, पाणीसाठ्यांची तपासणी आणि जोखमीच्या ठिकाणी त...
04/09/2026

डेंग्यू-मलेरियाविरोधात नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये!

घराघरांत सर्वेक्षण, पाणीसाठ्यांची तपासणी आणि जोखमीच्या ठिकाणी त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा ‘ड्राय डे’ पाळून घर व परिसरात पाणी साचू देऊ नये. तुमची छोटी कृती, संपूर्ण कुटुंबाची मोठी सुरक्षा!

रस्ता सुरक्षित, गैरसमज दूर!अंबड येथील ट्रक अडकण्याच्या घटनेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना — ट्रक मुख्य रस्त्यावर नव्हे, ...
04/09/2026

रस्ता सुरक्षित, गैरसमज दूर!

अंबड येथील ट्रक अडकण्याच्या घटनेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करताना — ट्रक मुख्य रस्त्यावर नव्हे, तर रस्त्याच्या कडील SIDE SHOULDER भागात अडकला आहे. मुख्य रस्त्याच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

पाणीपुरवठा पाइपलाइन मुख्य रस्त्याखाली न टाकता रस्त्याच्या कडील पट्ट्यात टाकण्यात येत आहे.
ट्रक जात असताना मुख्य रस्त्याला कोणतीही हानी झालेली नाही.
SIDE SHOULDER पुनर्स्थापनेचे काम सुरू असताना ट्रक अडकला असून, सुमारे १.५ किमी भागाची पुनर्स्थापना करण्यात येत आहे.
हे काम ७ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, काम पूर्ण झाल्यानंतर SIDE SHOULDER पूर्ववत करण्यात येईल.

नाशिक महानगरपालिका — सुरक्षित, सुस्थितीत आणि सक्षम रस्त्यांसाठी कटिबद्ध! नाशिक महानगरपालिका⁠

Address

Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road
Nashik
422002

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+917030300300

Alerts

Be the first to know and let us send you an email when MyNmc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MyNmc:

Shortcuts

Share