27/09/2026
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! 🌺🙏
वसंतस्मृती भाजपा नाशिक कार्यालय येथे विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या विसर्जन सोहळ्यास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी भाजपा पक्षाचे सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गणरायाच्या कृपेने नाशिकच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळो, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी व आरोग्य नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना! 🙏
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🚩🙏