30/03/2026
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित साहेब ठाकरे ह्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 'पापरी व खंडाळी' या गावातील वादळी वारा तसेच गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या फळबागांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.
तसेच "मुख्यमंत्री दरबारी नक्कीच जाऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन" असा श्री. अमितसाहेब ठाकरे ह्यांनी यावेळी जगाच्या पोशिंद्याला शब्द दिला.
#शेतकऱ्यांचाकैवारी