22/01/2026
*टाकळी वतपाळ येथे एनएसएस शिबिराचे थाटात उद्घाटन*
टाकळी वतपाळ (ता. नांदुरा) :
ग्रामपंचायत टाकळी वतपाळ येथे मलकापूर येथील दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष शिबिराचे उद्घाटन आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन नांदुरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. भरत हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला टाकळी वतपाळचे सरपंच श्री. राम पांडव, उपसरपंच श्री. सदानंद तायडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शुभम महाकाळ, मुख्याध्यापक श्री. बी. आर. दांडगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. मिराबाई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गजानन गव्हाळे, संतोष धामोडे, गजानन गोरे, सुनील बगे, मोहन वसतकार, किशोर पांडव, ज्ञानदेव सुशिर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भिमराव तायडे, कैलास पडोळकर, भागवत उज्जैनकर, निर्मल बगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नांदुरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हिवाळे साहेब विस्तार अधिकारी श्री. खोदरे साहेब, महाविद्यालयीचे प्राचार्य दीक्षित सर पत्रकार श्री. संतोष तायडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
उपस्थित मान्यवरांनी एनएसएस शिबिराच्या उपक्रमांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिरांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उद्घाटन समारंभाने एनएसएस शिबिराची औपचारिक सुरुवात झाली.