18/07/2014
राज्यात पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला असून बळीराजा पाऊस न पडल्याने चिंतातूर आहे व जनावरांच्या चारा पाण्याची गंभीर समस्या आहे मराठवाडा आणि विदर्भात दिवसागणिक शेतकरी आत्महत्या करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु राज्य शासनाला यांचे काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही सध्याला विधानसभेची तयारी मात्र जोरात चालू आहे मोठ्या मोठ्या बैठका पार्ट्या वर हजारो रुपये उडवले जात आहेत पण शासनाला शेतकऱ्याला द्यायला मात्र पैसे नाहीत आता शेतकरी मित्राला खरी मदतीची गरज आहे मात्र शासन मात्र या कडे फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे यावर मात्र विरोधी पक्ष पण ठोस असा विरोध पण करताना दिसत नाही कधी संपणार हे कधी येणार बळीराजा चे दिवस मित्रानो हे आता आपल्याला माननीय मुखमंत्री साहेबा पर्यंत पोहचवायचे आहे तरी आपली मदत आवश्यक आहे तरी जास्तीत संखेने share करा आणि आपला जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला वाचाव्ण्याला मदत करा धन्यवाद