BJP 4 Nanded City

BJP 4 Nanded City Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Nanded City Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

12/07/2026

महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही...!
मिसिंग लिंक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विरोधकांना खडसावले.

भारताला सुवर्णपदक!आशियाई U-23 अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने शानदार विजयाने मोहिमेची सुरुवात केली. मिश्र ४x४०० मी...
11/07/2026

भारताला सुवर्णपदक!

आशियाई U-23 अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने शानदार विजयाने मोहिमेची सुरुवात केली. मिश्र ४x४०० मीटर रिले स्पर्धेत भारताने यजमान चीनचा अवघ्या ०.१० सेकंदांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

अस्तिक प्रधान, संदरामोल साबू, सेतू मिश्रा आणि श्रावणी सचिन सांगळे यांच्या संघाने ३:१८.६४ वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले, तर चीनने ३:१८.७४ वेळेसह रौप्यपदक मिळवले.

या विजयासह २१ वर्षीय सेतू मिश्रा यांनी बिहारसाठी इतिहास रचला असून आंतरराष्ट्रीय अथेलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते बिहारचे पहिले खेळाडू ठरले आहेत.

10/07/2026

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे नवे पाऊल!
६० किमी पल्ल्याच्या 'पिनाका' लॉंग रेंज गायडेड रॉकेटची ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी संपन्न झाली. पूर्वनियोजित मार्गाने जात रॉकेटने लक्ष्यावर अचूक प्रहार केला असून, भारतीय संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी आहे.

10/07/2026

विठ्ठल नामाचा गजर आणि टाळांचा आवाज...

दरवर्षी पौष महिन्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा म्हणजे उत्तर महाराष्ट्राची मांदियाळी. ज्ञानेश्वर माऊलींचे आदिगुरु आणि थोरले बंधू असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्साहापासून ते ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या पुण्यतिथी सोहळ्यापर्यंतचा हा एक पवित्र प्रवास.

09/07/2026

मुंबई महापालिकेत आता AI क्रांती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुंबई महापालिकेत अत्याधुनिक AI प्रणाली लागू होणार असून, त्यानंतर ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विस्तारली जाणार आहे.
◆ १२ AI Agents २४x७ कार्यरत
◆ Human Interference कमी, पारदर्शक कारभार
◆ Compliance साठी AI चे मार्गदर्शन
◆ स्वयं तपासणी (Self-Audit) सुविधा
◆अधिक सोपी, सुसंगत आणि जलद प्रक्रिया
◆ अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा
तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक, स्मार्ट आणि लोकाभिमुख प्रशासन !

भारताच्या जागतिक गौरवात आणखी एक मानाचा तुरा! माननीय पंतप्रधान Narendra Modi जींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बि...
09/07/2026

भारताच्या जागतिक गौरवात आणखी एक मानाचा तुरा! माननीय पंतप्रधान Narendra Modi जींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बितांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ या सन्मानाने गौरवण्यात आले.

हा १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.

09/07/2026

विद्यार्थ्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला व नेतृत्वाला नवी दिशा देणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला स्थापना दिनाच्या आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Heartiest greetings on the Foundation Day of the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) and National Students’ Day!
As the world’s largest student organisation, ABVP continues to empower young minds, nurture leadership, and inspire generations of students towards meaningful contribution and nation-building.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
#अखिल_भारतीय_विद्यार्थी_परिषद

09/07/2026

तपस्वी लोकप्रतिनिधी, अभ्यासू संसदपटू आणि कुशल संघटक स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन त्यांनी वंचितांच्या कल्याणासाठी अनेक चळवळी उभारल्या. तसेच राजकिय क्षेत्रात असूनही आयुष्यभर नैतिक मूल्ये कसोशीने जोपासली. त्यांचे चरित्र लोकसेवेच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.

ठाणे जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत अत्यंत परखडपणे मांडले. त्यांच्या याच जनसेवेमुळे आणि कर्तृत्वामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे.

अशा या महान जननायकाला आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थानाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

[ Ram Bhau Mhalgi, Inspiration To Nation, Ideal Leader, Nation First, Tribute, Visionary Leader, Nation Above All, Bharatiya Jansangh, BJP4India ]

09/07/2026

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेला नवी दिशा!

नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नर्मदा नदीचे पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय झाला.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

या निर्णयामुळे पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळण्यास, सिंचन क्षमता वाढण्यास आणि राज्याच्या जलसुरक्षेला बळकटी मिळेल.

08/07/2026

मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचा अपमान केला तर सोडणार नाही. - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Nanded City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share