Chaitanyabapu Deshmukh

Chaitanyabapu Deshmukh महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी

02/06/2026

*मतदार यादी SIR पडताळणी बाबत माहिती... {$s} 👇*

*"तीन वेळा संधी; अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार!"*
म्हणजे BLO तुमच्या घरी 3 वेळा येईल. त्या 3 वेळात तुम्ही भेटला नाहीत + फॉर्म भरला नाही तर यादीतून नाव कट होऊ शकतं.

*SIR म्हणजे काय?*
*SIR = Special Intensive Revision*. केंद्रीय निवडणूक आयोगाची मोहीम. मतदार यादीतले डुप्लिकेट/मयत/शिफ्ट झालेले मतदार काढून टाकायचे आणि नवीन पात्र लोकांची नावं टाकायची.

*Maharashtra मध्ये Time Table*
*तारीख काय होणार*
*20 ते 29 जून 2026* BLO लोकांचं प्रशिक्षण
*30 जून ते 29 जुलै 2026* BLO घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार
*5 ऑगस्ट 2026* कच्ची मतदार यादी प्रसिद्ध
*5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर* नाव नाही/चूक असेल तर दावा-हरकत दाखल करायची मुदत
*7 ऑक्टोबर 2026* अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

*तुम्हाला काय करावं लागेल?*
*Case 1: 2002 च्या यादीत नाव आहे*
→ फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्या. कागदपत्र नको.

*Case 2: 1 जुलै 1987 पूर्वी जन्म + यादीत नाव नाही*
→ जन्मतारीख + जन्मस्थळ पुरावा. खालच्या 11 पैकी 1 कागद द्या.

*Case 3: 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्म*
→ स्वतःचा + आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म पुरावा द्यावा लागेल.

*Case 4: 2 डिसेंबर 2004 नंतर जन्म*
→ स्वतःचा + आई-वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल.

*चालणारे 11 कागदपत्र कोणते?*
जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 10वी/12वी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन/घराचे कागद, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र, 1 जुलै 1987 पूर्वीचा बँक/पोस्टाचा पासबुक.

*घरी नसाल तर काय?*
BLO 3 वेळा येईल. भेटला नाहीत तर दारावर नोटीस चिकटवेल. त्यानंतरही संपर्क नाही झाला, तर फॉर्म भरण्याची संधी जाईल.

*लक्षात ठेवा 3 गोष्टी:*
1. *BLO आला की भेटा* - 3 संधी नंतर नाव कट होऊ शकतं.
2. *Online पण भरू शकता* - http://voters.eci.gov.in वर.
3. *2002 यादीत नाव असेल तर टेन्शन नाही* - फक्त सह्या द्या.


*मेरा बूथ मेरी जिम्मेदारी*

Voters' Services Portal

02/06/2026

*राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय*

▪️मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता.

▪️रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.

▪️हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.

भारतीय जनता पार्टीतील माझे सहकारी मित्र श्री Vithal Patil यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
02/06/2026

भारतीय जनता पार्टीतील माझे सहकारी मित्र श्री Vithal Patil यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

02/06/2026
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अध...
01/06/2026

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अध्यक्ष मा. श्री अमरनाथ राजूरकर यांनी आज आपले नामांकन पत्र माननीय जिल्हाधिकारी यांच्या समोर दाखल केले.

या प्रसंगी माझ्यासह नगरसेवक सुहास कल्याणकर, नगरसेवक संदिपसिंग गाडीवाले, श्रीशिवराज कदम कोळीकर उपस्थित होते.

तसेच यावेळी माननीय माजी मुख्यमंत्री खा मा. अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, नगरसेवक मा. किशोर स्वामी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मा. प्रवीण साले, नगरसेवक उमेश पोवळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करूया, हीच अपेक्षा!

नांदेडच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक विश्वासार्ह व निरभिड आवाज असलेल्या दैनिक प्रजावणीला आज चौसष्ट वर्षे पूर्ण होत अ...
01/06/2026

नांदेडच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक विश्वासार्ह व निरभिड आवाज असलेल्या दैनिक प्रजावणीला आज चौसष्ट वर्षे पूर्ण होत असून पासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

या प्रदीर्घ वाटचालीत दैनिक प्रजावणीने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सत्य, पारदर्शकता आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत लोकशाही बळकट करण्यासाठी या दैनिकाने मोलाचे योगदान दिले आहे.

आजच्या बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत निष्पक्ष आणि धैर्याने भूमिका मांडणाऱ्या माध्यमांची गरज अधिक अधोरेखित होते, आणि ही भूमिका दैनिक प्रजावणीने सातत्याने निभावली आहे.

या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक प्रजावणीचे संपादक तसेच संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

आपली ही निर्भीड पत्रकारितेची परंपरा अधिक सक्षम होऊन समाजहितासाठी कार्यरत राहो, हीच सदिच्छा.

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री अमरनाथ राजुरकर यांना भारतीय जनता पा...
31/05/2026

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री अमरनाथ राजुरकर यांना भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म देताना 💐💐
Shri Amarnath Rajurkar यांचे अभिनंदन

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील महाराष्ट्र...
31/05/2026

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६

भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी खालील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी हे नेतृत्व महत्त्वपूर्ण योगदान देईल, यात शंका नाही. सर्व उमेदवारांना यशस्वी घोडदौडीसाठी शुभेच्छा!

​ २०२६

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार आदरणीय श्री. बाळाजी कल्याणकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐ग...
31/05/2026

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार आदरणीय श्री. बाळाजी कल्याणकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐

गेल्या सात वर्षांपासून आपण अखंडपणे जनसेवेत कार्यरत राहून समाजातील प्रत्येक घटकासाठी निष्ठेने आणि समर्पणाने काम करत आहात. आपल्या नेतृत्वातून विकासाची नवी दिशा मिळत आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🙏

Only bjp
31/05/2026

Only bjp

Address

Sarafa Holi
Nanded
431604

Telephone

+919011001013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanyabapu Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chaitanyabapu Deshmukh:

Share