NWCMC

NWCMC Nanded Waghala City Municipal Corporation is Urban Local Body of Nanded City, in Maharashtra

महापालिकेत समृद्धी महामार्ग अंतर्गत वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट पुलाच्या कामाचा आढावा;महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच...
02/09/2026

महापालिकेत समृद्धी महामार्ग अंतर्गत वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट पुलाच्या कामाचा आढावा;
महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक संपन्न

समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात तयार होत असलेल्या वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यानच्या पुलाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेत दि.०२.०९.२०२६ रोजी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सदरील पुलाचे काम करत असताना घ्यावयाच्या विविध उपाययोजना आणि आवश्यक खबरदारीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

वाजेगाव ते बाफना टी-पॉइंट दरम्यान होणारा हा पूल शहराच्या दळणवळणाच्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, या पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू असताना स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुढाकार घेत या विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

01/09/2026

महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणाऱ्या ५४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या औचक तपासणीत कार्यालयीन वेळेत गैरहजर आढळलेल्या तब्बल ५४ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कार्यालयीन शिस्त व सेवेची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी वेळेचे पालन करणे सक्तीचे आहे. ज्यामध्ये वर्ग-३ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. तर वर्ग-४ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्तव्यावर असताना प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच वर्ग-४ संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या राष्ट्रीय गणवेशातच उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रशासकीय कामकाजात गतिशीलता आणण्यासाठी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अभिजित वायकोस यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष 'तपासणी पथक' गठीत करण्यात आले आहे. या पथकाने सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या विविध विभागांची औचक पाहणी केली. या तपासणी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून एकूण ५४ कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले. कार्यालयीन नियमांचे आणि शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व ५४ कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांना तात्काळ 'कारणे दाखवा' नोटीस जारी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या गैरशिस्तीबद्दल आणि नियमांच्या उल्लंघनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "तुमच्यावर शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये?" अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी यावर आपला लेखी खुलासा सादर करावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कडक प्रशासकीय व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांच्या सेवेला प्राधान्य: मनपा आयुक्त
महानगरपालिका हे नागरिकांना मूलभूत सेवा देणारे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लेट-लतीफी, गणवेश व ओळखपत्राबाबतचा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासकीय कामात पारदर्शकता, वेळ आणि शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या औचक तपासण्या यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कार्यरत शहर व वस्ती स्तर संघांच्या अध्यक्ष व सचिवांची महत्वपूर्ण बैठक...
24/08/2026

महापालिकेत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कार्यरत शहर व वस्ती स्तर संघांच्या अध्यक्ष व सचिवांची महत्वपूर्ण बैठक संपन्न!

नांदेड महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बाल कल्याण समितीच्या *सभापती सौ.सदिच्छा सोनी पाटील* यांच्या सूचनेवरून सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महापालिका मुख्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शहरामध्ये 'दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (DAY-NULM) अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व महिला शहर स्तर संघ आणि वस्ती स्तर संघांचे अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने लवकरच शहरात एक भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत मेळाव्याचे स्वरूप आणि कार्यक्रमाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि सेवांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'महिला मॉल' सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बचत गटांमधील महिलांच्या कौशल्यांना आणि ज्ञानाला वाव देण्यासाठी विशेष 'महिला बचत गट अभ्यास दौरा' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शहरात कामानिमित्त राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी 'काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह' सुरू करण्याबाबत विचारविनिमय झाला.

महापालिकेत सद्भावना दिवस साजराभारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा जयंती दिवस देशपातळीवर "राष्ट्रीय सद्भावना दिव...
21/08/2026

महापालिकेत सद्भावना दिवस साजरा

भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा जयंती दिवस देशपातळीवर "राष्ट्रीय सद्भावना दिवस" म्हणुन पाळला जातो. त्याअनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे दि.२०.०८.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत, स्थायी समिती सभागृह येथे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेची शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त नितीन गाढवे,उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, मुख्य लेखा परीक्षक आनंद ऐनवाड, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मनपातील विविध विभागा...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ८० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मनपातील विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना *"ऑफिसर ऑफ द मंथ आणि एम्पलोयी ऑफ द मंथ"* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराच्या माध्यमातून शहराच्या विकासात आणि नागरी सुविधा पुरवण्यात अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली. नगरचना, लेखा, आरोग्य, स्वच्छता, माहिती व तंत्रज्ञान, आणि प्रशासकीय विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली.पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना "ऑफिसर ऑफ द मंथ आणि एम्पलोयी ऑफ द मंथ" हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी ०३ वर्षापूर्वी करण्यात आली होती.

मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल "ऑफिसर ऑफ द ईयर" हा पुरस्कार *उपायुक्त स.अजितपालसिंग संधु* यांना प्रदान करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, विकास कामात येणाऱ्या अडथळे दूर करण्यासह शहर विद्रूपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बॅनरबाजीला रोखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून वेळेप्रसंगी कठोर भूमिका घेत तब्बल १५ गुन्हे दाखल करून अनधिकृत बॅनरबाजीवर आळा आणलेला आहे. तसेच शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी फ्री लेफ्ट या संकल्पनेतून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचे काम संधू यांनी केले , मागील वर्षभरातील या सर्व कामगिरीची नोंद घेऊन संधू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार *कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते* यांना प्रदान करण्यात आला तर एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील *वरिष्ठ लिपिक स.सतपालसिंग कोल्हापुरे* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच माहे जुन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार *क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे* यांना प्रदान करण्यात आला तर एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे जुन मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माहिती व तंत्रज्ञान विभागातील *कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर मंजू व्यास* आणि स्वच्छता विभागातील *स्वच्छता निरीक्षक प्रियंका एंगडे* यांची संयुक्तपणे निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्याचप्रमाणे माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार *वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मग्गिरवार* यांना प्रदान करण्यात आला तसेच एम्पलोयी ऑफ द मंथ साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लेखा विभागातील *वरिष्ठ लिपिक निलेश शातलवार* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन महापालिकेत साजरामहापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्नभारती...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन महापालिकेत साजरा

महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन दिनांक १५.०८.२०२६ रोजी सकाळी ८.०५ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली, ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगान व राज्यगीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली. याप्रसंगी महापौरांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खऱ्या अर्थाने देशाची सेवा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.तसेच मनपा आयुक्तांनी आपल्या संदेशात सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या या अमृतोत्तर सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर पालिकेची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना अधिक गतीने आणि पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी मनपाचे उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपभापती निरंजना लांडगे, गटनेता संदीपसिंग गाडीवाले, मसूद खान, प्रशांत इंगोले, साबेर चाऊस, माजी पदाधिकारी व सन्माननीय सदस्य,अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजीत वायकोस, नितीन गाढ़वे, स.अजितपालसिंघ संधु, गंगाधर ईरलोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगरचनाकार ओम लहाने, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकलीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, क्रीडा अधिकारी रमेश चौरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग,शिक्षण अधिकारी प्रवीणा मांदळे, उपअभियंता प्रकाश कांबळे, सतीश ढवळे, खुशाल कदम, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे,राजेश जाधव, गौतम कवडे, नागनाथ पतंगे, विठ्ठल तिडके व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, मालमत्ता व्यवस्थापक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनपाच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने करण्यात आले.

महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची बैठक संपन्न; शाळांची सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि 'विकसित भारत २०२४' सं...
14/08/2026

महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची बैठक संपन्न;

शाळांची सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि 'विकसित भारत २०२४' संकल्पनेवर भर

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती सौ.सदिच्छा सोनी पाटील व उपसभापती निरंजना लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता महापालिकेच्या मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीत मनपा शाळांचा कायापालट करणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि महिला-बालकांच्या आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत प्रारंभी दिनांक २८/०७/२०२६ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत पारित करण्यात आलेल्या विविध ठरावांच्या प्रगतीचा आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व शालेय मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांना मजबूत संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात किमान एक याप्रमाणे विशेष महिला व बाल आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेला पूरक ठरेल अशा पद्धतीने मनपा शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक ते सर्व सुधारात्मक बदल तातडीने केले जातील.

मनपाच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सुशोभीकरणाला प्राधान्य देण्यासाठी 'सुंदर शाळा, स्वच्छ शाळा' हा विशेष उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि शाळांचा परिसर आल्हाददायक करण्यासाठी सर्व मनपा शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाईल. या बैठकीत सभापती यांच्या मान्यतेने बैठकीत आयत्या वेळी आलेल्या इतरही काही स्थानिक व तातडीच्या विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीला समितीचे सन्माननीय सदस्य, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त गंगाधर ईरलोड, उपायुक्त तथा नगरसचिव स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, सहा.आयुक्त निलावती डावरे, भांडार अधिक्षक नागनाथ पतंगे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, प्रकल्प व्यवस्थापक चंद्रकांत कदम व प्रविण मगरे आदी उपस्थित होते.

मनपाच्या 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत दिमाखदार तिरंगा रॅली; हजारो विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने अवघे शहर राष्ट्रभक्तीच...
12/08/2026

मनपाच्या 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत दिमाखदार तिरंगा रॅली;

हजारो विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने अवघे शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाले!

• मनपा शाळांसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

• 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

• घरोघरी तिरंगा फडकवून राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासानिमित्त आणि केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि.१२.०८.२०२६ रोजी शहरात 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची एक अभूतपूर्व आणि भव्य तिरंगा रॅली अत्यंत उत्साही व देशबक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड शहरात निर्माण झालेला देशप्रेमाचा ज्वर आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद अद्वितीय असा होता.

आज सकाळी ठीक ८.०० वाजता शहरातील तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक या ठिकाणाहून या भव्य रॅलीला महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून अधिकृत सुरुवात केली. या प्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृह नेते ॲड महेश कनकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त गंगाधर ईरलोड, शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीच्या अग्रभागी महापौर, स.पदाधिकारी, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि एनसीसी व स्काऊट-गाईडचे पथक शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते. ही रॅली शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि निवासी भागातून मार्गस्थ झाली. रॅलीचा संपूर्ण मार्ग तिरंगामय झाला होता.

12/08/2026

'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत मनपाच्या वतीने उद्या भव्य 'तिरंगा बाईक रॅली' व सायंकाळी 'सांस्कृतिक कार्यक्रमांचे' आयोजन; नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान जपत नांदेड शहरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान अत्यंत उत्साहात राबवले जात आहे. या अभियानाचा मुख्य भाग म्हणून उद्या १३ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध राष्ट्रीय व देशभक्तीपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील वातावरण राष्ट्रभक्तीने प्रफुल्लित करण्यासाठी उद्या सकाळी ८.०० वाजता हडको बस स्टॉप ते तिरंगा ध्वज परिसर शासकीय तंत्र निकेतन या दरम्यान भव्य 'तिरंगा बाईक रॅली' काढण्यात येणार आहे. तर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम परिसर येथे विशेष 'सांस्कृतिक कार्यक्रमांचे' आयोजन करण्यात आले आहे.

तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातुन तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करणे आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पोहोचवणे हा मुख्य उद्देश असुन रॅलीमध्ये सहभागी होणारे सर्व नागरिक, तरुण आणि मनपाचे कर्मचारी आपल्या दुचाकीवर सन्मानाने तिरंगा ध्वज लावून सहभागी होणार आहेत. शहरातील सर्व दुचाकी धारकांनी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी हाती तिरंगा घेऊन या रॅलीची शोभा वाढवावी, असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी आणि 'वंदे मातरम' गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाईल.स्थानिक कलावंत आणि शालेय विद्यार्थ्यांद्वारे देशभक्तीपर गीते सादर केल्या जातील, या कार्यक्रमात सुध्दा सहभागी होण्याचे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

11/08/2026

नांदेडमध्ये उद्या 'हर घर तिरंगा' अभियानाचा भव्य जागर;

महानगरपालिकेच्या वतीने हजारो शालेय विद्यार्थ्यांची अभूतपूर्व 'तिरंगा रॅली'

महानगरपालिका प्रशासनाचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, देशभरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत "हर घर तिरंगा" अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून आणि राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' च्या १५० व्या वर्षानिमित्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने *उद्या, १२ ऑगस्ट २०२६* रोजी *सकाळी ठीक ८:३० वाजता* शहरातील शालेय विद्यार्थ्यांची एक भव्य आणि अभूतपूर्व 'तिरंगा रॅली' आयोजित करण्यात आली आहे. या भव्य रॅलीचे उद्घाटन *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून केले जाणार आहे.

या तिरंगा रॅलीचा प्रारंभ तिरंगा ध्वज परिसर, शासकीय तंत्रनिकेतन चौक येथुन सकाळी ८:३० वाजता होणार असुन रॅलीचा मार्ग: व्ही.आय.पी.रोड ➡️ आय.टी.आय. कॉर्नर ➡️ शिवाजी नगर ➡️ कलामंदिर ➡️ वजिराबाद चौक-महाविर चौक मार्गे रॅली पुढे मार्गस्थ होऊन शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे या रॅलीचा समारोप होईल. या देशप्रेमाच्या महाउत्सवात नांदेड शहरातील महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच खासगी व अनुदानित शाळांमधील हजारो विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, स्काऊट गाईडचे पथक आणि शिक्षक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.

*चौकट*
*मनपा आयुक्तांचे आवाहन*
"तिरंगा हा आपल्या देशाचा स्वाभिमान असुन या रॅलीच्या माध्यमातून आपण नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे आणि देशसेवेचे संस्कार रुजवत आहोत. त्यामुळे नांदेडमधील सर्व व्यापारी, तरुण, महिला आणि नागरिकांनी उद्या सकाळी या रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा."
- *डॉ.महेशकुमार डोईफोडे,आयुक्त,*

Address

Municipal Corporation Building
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when NWCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NWCMC:

Shortcuts

Share