Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

  • Home
  • India
  • Nanded
  • Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे प्रदेशाध्यक्ष (ओबीसी विभाग) राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र राज्य.
उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य.
91 मुखेड कंधार विधानसभा मतदार संघ.

YouTube search :Dr Yeshpal Bhinge
page : Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे

28/05/2026
📍पालघर आज कोकण दौऱ्याच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्य...
28/05/2026

📍पालघर
आज कोकण दौऱ्याच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने काँग्रेस ओबीसी चळवळ अधिक मजबूत व प्रभावी करण्याच्या उद्देशाने पालघर येथील काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये महत्वपूर्ण बैठक व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाची विचारधारा, सामाजिक न्यायाची भूमिका तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली. आगामी काळात गावपातळीपर्यंत काँग्रेसची ओबीसी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेमध्ये जाऊन पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यावर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सत्यम ठाकुर पालघर जि. अध्यक्ष,नितांत चव्हाण मा. नगराध्यक्ष,नरोत्तम पाटील मा. अध्यक्ष,मनोहर दांडेकर अध्यक्ष पालघर शहर,किरण अप्पा ओबीसी पालघर शहराध्यक्ष,दिपक पाटील ओबीसी पालघर तालुकाध्यक्ष,वर्षा ताई डहाणू अध्यक्ष,संपत पवार जव्हार अध्यक्ष,सुरेश काटे तलासरी,स्वप्निल ठाकूर,रासक भानुशाली माजी नगरसेवक,सूत्रसंचालक संदीप मेने व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. बैठकीदरम्यान संघटन मजबुती, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्ष विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Bhinge Yeshpal Harshwardhan Sapkal Vijay Wadettiwar Balasaheb Thorat Satej D. Patil Atul Londhe Hanumant Pawar Amit V. Deshmukh Ravindra Vasantrao Chavan Rahul Gandhi Indian

📍पालघर मुंबई येथे वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प...
28/05/2026

📍पालघर
मुंबई येथे वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात या आंदोलनातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे साहेब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून भाजप सरकारचा जोरदार निषेध नोंदविला. यावेळी बोलताना डॉ. भिंगे साहेब म्हणाले की, केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तात्काळ इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच भाजप सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेत असून सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील आणि इंधन दरवाढ मागे घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ओबीसी विभागाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Bhinge Yeshpal Harshwardhan Sapkal Balasaheb Thorat Rahul Gandhi Satej D. Patil Hanumant Pawar Atul Londhe Vijay Wadettiwar News18 Marathi TV9 Marathi CMOMaharashtra Indian National Congress - Mumbai

26/05/2026

#नांदेड
पेट्रोल,डिझेलच्या भाववाढ विरोधात आंदोलन.

Bhinge Yeshpal Indian National Congress - Maharashtra Rahul Gandhi Harshwardhan Sapkal Ravindra Vasantrao Chavan Vijay Wadettiwar News18 Marathi Atul Londhe

📍नागपूर इंधन टंचाई व सततच्या दरवाढी विरोधात ओबीसी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारींना निवेदन सादरनागपूर,दिनाक २६ मे केंद्र सर...
26/05/2026

📍नागपूर

इंधन टंचाई व सततच्या दरवाढी विरोधात ओबीसी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारींना निवेदन सादर

नागपूर,दिनाक २६ मे
केंद्र सरकारचे चुकीच्या आर्थिक धोरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सध्या देशभरात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडर सतत च्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार,व्यापारी, विद्यार्थी,तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
आपणास विनंती आहे की, केंद्र सरकार कडे आमच्या मागण्यांचे निवेदन पाठवून त्वरीत दरवाढ कमी करावी.
प्रमुख मागण्या
१) पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तत्काळ कपात करावी.
२) नागपूर जिल्हासह राज्यभरातील इंधन टंचाई त्वरित दूर करण्यात यावी.
३) सर्व पेट्रोल पंपावर सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा.
४) महागाई नियंत्रणकरिता केंद्र सरकार ने ठोस उपाय योजना कराव्यात.
५) सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व छोट्या व्यावसायिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीने घेण्यात यावे. बाबत आज दिनाक २६ मे २०२६ ल दुपारी ३.०० वाजता नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले शिष्मंडळामधे
मोरेश्वर भादे महासचिव, म.प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, श्री अजयजी हटेवार राष्ट्रीय समन्वयक ओबीसी विभाग ,श्री चंद्रकांत हिंगे महासचिव, म.प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग,श्रीमती विजयाताई धोटे महासचिव, म.प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, प्रशांत पवार कार्याध्यक्ष. नागपूर शहर ओबीसी विभाग,भूषण तल्हार कोषाध्यक्ष नागपूर शहर ओबीसी विभाग,प्रशांत आस्कर प्रवक्ता नागपूर शहर ओबीसी विभाग, सचिन निंबार्ते प्रदेश उपाध्यक्ष, अशोकजी निखाडे, माधवजी गावंडे दक्षिण नागपूर. अध्यक्ष, अरविंद क्षीरसागर कार्याध्यक्ष, मामा राऊत उपाध्यक्ष संतोष गोटफोडे महासचिव उपस्थित होते.

Bhinge Yeshpal Harshwardhan Sapkal Vijay Wadettiwar Nana Patole Moreshwar Bhade

📍नांदेड पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सतत होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महारा...
26/05/2026

📍नांदेड

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सतत होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, लघु व्यावसायिक तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांवर इंधन दरवाढीचा मोठा आर्थिक परिणाम होत असून महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
दरम्यान, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 29 मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व ओबीसी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे विविध आघाडी व विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bhinge Yeshpal Ravindra Vasantrao Chavan Harshwardhan Sapkal Balasaheb Thorat Rahul Gandhi Indian National Congress - Maharashtra Amit V. Deshmukh Vijay Wadettiwar Hanumant Pawar Atul Londhe

26/05/2026

सरकार हमसे डरती है,
पुलिस को आगे करती है!

26/05/2026
“महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे, सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे, द...
26/05/2026

“महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे, सर्वसामान्य जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कार्यशैली आजही असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी, शिक्षण, उद्योग, कला-संस्कृती आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. साधेपणा, संयम आणि जनसामान्यांशी असलेली नाळ हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख होती.

अशा लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!” 🙏

Bhinge Yeshpal Amit V. Deshmukh Harshwardhan Sapkal Satej D. Patil Ravindra Vasantrao Chavan Indian National Congress - Maharashtra News18 Marathi Balasaheb Thorat Rahul Gandhi

Address

Nanded
431601 TO 606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Yashpal Bhinge - डॉ. यशपाल भिंगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category