Krushi Mahotsav Nanded

Krushi Mahotsav Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krushi Mahotsav Nanded, Government Organization, Nanded.

03/06/2026

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

नांदेड दि. 2 जून :- नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या व्दिवार्षीक निवडणूक-2026 साठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे (भाप्रसे) यांचे 1 जून रोजी नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पाहणी केली.

त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी याप्रसंगी चर्चा केली. तसेच विविध निवडणूक कक्षासह, प्राप्त नामनिर्देशन अर्ज व मतदार यादीबाबत माहिती घेतली.

येथील स्नेहनगर शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात त्या थांबणार आहेत. नागरिकांना नांदेड विधान परिषदेच्‍या निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत 2 ते 4 जून , 12 ते 14 जून आणि 17 ते 22 जून 2026 या कालावधीत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्यांचा ई-मेल आयडी [email protected] आहे. त्यांचा संपर्क क्र. 9637228955 आहे.
00000

🌾🚜 *नांदेड जिल्हा- शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करीता आधुनिक व अंत्यंत सोपे पोर्टल* 🚜🌾नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांध...
02/06/2026

🌾🚜 *नांदेड जिल्हा- शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करीता आधुनिक व अंत्यंत सोपे पोर्टल* 🚜🌾

नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), उद्योजक आणि ग्रामीण उत्पादकांसाठी सुवर्णसंधी!

👉 आपल्या उत्पादनांची *थेट ऑनलाईन विक्री* सुरू करा
👉 स्वतःचा *डिजिटल स्टॉल* तयार करा
👉 वेबसाईट, डिजिटल आयडेंटिटी आणि संपर्क सुविधेद्वारे व्यापार वाढवा
👉 ग्राहकांपर्यंत थेट पोहोचा — *पूर्णपणे मोफत!*

📲 वेबसाईटवर जाऊन App डाउनलोड करा आणि आजच आपले ऑनलाईन स्टॉल सुरू करा :
🌐 https://nandedkrushimahotsav.in/

✨ “आपला माल – थेट ग्राहकांपर्यंत”
✨ “डिजिटल नांदेड जिल्हा दिशेने एक मोठे पाऊल”

नांदेड कृषी महोत्सव २०२६: शेतकरी स्टॉल, सेंद्रिय शेती उत्पादने, थेट ग्राहक विक्री, कृषी तंत्रज्ञान, आणि शेतकरी सक्...

29/03/2026

ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर पोहचविणे सक्तीचे- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

29/03/2026

I got over 100 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Suresh Kachawar, Manjusha Deshmukh, Subhash Rawangaonkar,...
29/03/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Suresh Kachawar, Manjusha Deshmukh, Subhash Rawangaonkar, Krish Chitmalwar, Pawansingh Bais, Gajanan Patil, Raju Mahajan, Maroti Patil Khade Dahikalambekar, Darshu Buktare, Anil Jondhale, Santosh B. Patil, Santosh Thalpate, Dnyandeep Sakhare, Swapnil Wadgaonkar, Sachin Thorat, Raju Bandewad, Pralhad Shinde, Shivaji Mupade, Dhananjay Malegaonkar, Ramesh Kademwar, Shyam Kadam Patil, Namdev Dhawale, Satish Bhosle, Rahul Waghmare, Deepak Lingayat, Suresh Apaswar, Gangadhar Bokare, Mahesh Hokarne, Vishnu Haldekar, Dinesh Manjramkar, Anuja Tehra, Sunita Parkanthe, Dhumale Parmeshwar, Arvind More, Madhav Gutte, Shyam Jadhav, Gajanan Khanpatte, Rakesh Parashar, Raju Kawale, Bhimrao Lone, Ravi Lathkar, Gajanan Kalyankar, Suresh More, Santosh Shinde, तेजाराम, Mahesh Mandade, Gajanan Deshmukh, Amol Jadhav Patil, Anura Mathpati, Ghanshyam Pandagale

29/03/2026

जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सीधारक व सेल्स ऑफिसर्स यांच्यासोबत बैठक संपन्न गॅस वितरकांना महत्वाचे निर्देश ; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड दि. 28 मार्च:- जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि गॅस एजन्सी धारकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गॅस वितरकांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि सूचना:

होम डिलिव्हरी बंधनकारक: सर्व गॅस एजन्सी धारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत

ग्राहकांना एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' देणे बंधनकारक आहे.तसेच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' साठी काही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्यातील खालील प्रमाणे निरीक्षण अधिकारी ( नायब तहसीलदार पुरवठा ) यांचेशी संपर्क करावा.

संपर्क मो.क्रं.:- नांदेड-७०३०७७३०४०, अर्धापूर-८८०५०६८९५४, मुखेड- ९३५६८०६४०५, धर्माबाद-९४२१८४१४४७,मुदखेड- ९४४५११२७८२,उमरी- ८८०५४४७८३७,बिलोली- ७६२०७७९७०६,लोहा-९६५७२२४०४२,हिमायतनगर- ८३०८०७३०८९, हदगांव-८८०५०६८९५४, कंधार-९८२३७५७३४५, माहूर-९४०३१८४४७३, किनवट-९८५०२९६०९६, भोकर- ९४२११८३६०२, देगलूर-९४२३८०५०६४,नायगांव- ७०५७००२८६५

एजन्सीवर गर्दी टाळा: ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीवर गर्दी करू नये. बुकिंग केल्यानंतर लवकरात लवकर सिलिंडर घरपोच मिळेल, अशी चोख व्यवस्था करण्याचे आदेश वितरकांना देण्यात आले आहेत.

ग्राहकांना आवाहन: जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गॅस एजन्सीवर गोंधळ न घालता संयम राखावा. आपण गॅस बुक केल्यानंतर तो आपल्या दारात पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. प्रशासनाच्या या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे.

घरबसल्या करा e-KYC:ज्या ग्राहकांची बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी गॅस एजन्सीवर जाण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरून खालील पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात:

मोबाईल ॲपद्वारे: १. सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून 'Aadhaar Face RD (Early Access)' हे ॲप डाऊनलोड करा.

त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करा:

* Indane: IndianOil ONE

* Bharat Gas: Hello BPCL

* HP Gas: HP Pay

या ॲपमधील 'Aadhaar e-KYC' पर्यायावर जाऊन आपला चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.

थेटलिंक: ग्राहक https://www.pmuy.gov.in/e-kyc.htmlया लिंकवर जाऊनही माहिती घेऊ शकतात.

तसेच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करतांना काही अडचण आल्यास आपण खालील कंपनीच्या सेल्स ऑफिसर यांचे संपर्क साधावा.

मनोजकुमार राणा, सेल्स ऑफिसर BPCL, मो.क्रं. 9130084746

जय सिंघ, सेल्स ऑफिसर IOCL, मो.क्रं. 9561366893

सचिनकुमार, सेल्स ऑफिसर HPCL, मो.क्रं. 9594820665

तरी जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यान्वित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000

23/03/2026
20/03/2026

🌿 *नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा २.०* 🌿
🚜 *"कृषी अवजारे बँक" स्थापनेसाठी अर्ज सुरू!*

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत *PoCRA टप्पा २.०* मध्ये
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी शेती अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी
👉 *“गावस्तरावरील कृषी अवजारे बँक”* हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

👩‍🌾 *महिला शेतकरी गटांना विशेष प्राधान्य!*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 *१. पात्रता निकष:*
✔️ MSRLM (उमेद) / माविम पुरस्कृत महिला बचत गट / गाव संघ पात्र
✔️ किमान *१० सदस्य* (वेगवेगळ्या कुटुंबातील) आवश्यक
❌ पूर्वी अवजारे बँक लाभ घेतलेले गट अपात्र
🎯 एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास *ऑनलाइन लॉटरी*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 *२. योजनेचे लाभ:*
✅ *६०% पर्यंत अनुदान* (कमाल ₹२४ लाख)
🏦 ₹२० लाखांपेक्षा जास्त प्रकल्पासाठी *७५% बँक कर्ज आवश्यक*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚙️ *३. उपलब्ध अवजारे:*
🚜 ट्रॅक्टर चलित अवजारे
🌱 BBF यंत्र
🌾 रोवणी / लावणी यंत्र
🍃 मल्चिंग मशीन
🚜 कंबाइन हार्वेस्टर
💦 फवारणी पंप व इतर अवजारे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌐 *४. अर्ज करण्याची पद्धत:*
👉 ऑनलाइन अर्ज करा:
🔗 https://dbtndksp.mahapocra.gov.in/

📅 *अंतिम तारीख:*
🔥 *५ एप्रिल २०२६* 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
📞 *अधिक माहितीसाठी:*
आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा
किंवा प्रकल्पाच्या संकेतस्थळाला भेट द्या

✍️ *प्रकल्प संचालक, आत्मा, नांदेड

Address

Nanded
431603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Mahotsav Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share