26/05/2026
माझ्यासारख्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांसाठी विलासराव देशमुख साहेब म्हणजे उमदं, शालीन, सर्वसमावेशक राजकारणाच चालतं बोलतं विद्यापीठ होतं. सर्वसामान्यांच्या गरजांची जाण ठेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे कुशल प्रशासक, राजकारणात राहून समाजकारण करण्यात अधिक समाधानी राहणारे मुत्सदी नेते, प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
मनमिळाऊ, हसतमुख व्यक्तिमत्वाच्या देशमुख साहेबांनी राज्याच्या कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात त्यांचं योगदान हे मोलाचं राहिलं आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन!
Amit V. Deshmukh Riteish Deshmukh Dhiraj Vilasrao Deshmukh