राजरत्न ग्रंथालय

राजरत्न ग्रंथालय देवसिंगा (नळ) ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद

*राजरत्न परिवाराच्या वतीने राजरत्न ग्रंथालयाच्या 5 व्या वर्धापनदिना निमीत्त शालेय स्पर्धा परीक्षेचे आयोजन*माजी विरोधी पक...
24/09/2023

*राजरत्न परिवाराच्या वतीने राजरत्न ग्रंथालयाच्या 5 व्या वर्धापनदिना निमीत्त शालेय स्पर्धा परीक्षेचे आयोजन*
माजी विरोधी पक्षनेते तथा मा.शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख राजअहमद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शालेय वयातच स्पर्धा परीक्षा आकलन व्हावे व भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राजरत्न ग्रंथालयाच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त राजरत्न परिवार आयोजित " शालेय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन " कार्यक्रमास आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल राजरत्न परिवाराकडून आभार.
या ऐतिहासिक प्रसंगी नुकत्याच नवनियुक्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विश्वजित गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक संतोष भाट, राज्यकर विक्रीकर निरीक्षक महेश सुरवसे उपस्थित होते.PSI विश्वजित गायकवाड यांनी आपल्या मनोगतात स्वतःचा या क्षेत्रातील अनुभव तसेच विद्यार्थ्या साठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील असलेल्या संधी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
"जी गोष्ट मला मिळाली नाही ती येणाऱ्या पिढ्यांना मिळावी" हा एकच उद्देश ठेवून मोसीम पठाण व राजरत्न परिवाराने राज अहमद पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन आयोजित केले.
राजरत्न ग्रंथालयाच्या " शालेय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा" यास ग्रामीण भागातील विविध गावातील ७ प्रशालेच्या तब्बल ४७२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी मोठा गट प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक (इयत्ता ८वी ते १० वी) आणि लहान गट प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक (इयत्ता ५ वी ते ७ वी) असे दोन गटांचे विभाजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये,
*मोठा गट विजेते (इयत्ता ८वी ते १०वी) (प्रश्न ५०: गुण १००):-
१) प्रथम क्रमांक :- कु.भुवनेश्वरी सुशांत महिंद्रकर
[गुण :- ७०/१००]
२) द्वितीय क्रमांक:- कु. शताक्षी उमाकांत राजमाने
[गुण :- ६२.५/१००]
३)
१} तृतीय क्रमांक:- चि.सुमित शाहूराज दंडगुले
[गुण:- ५५/१००]
२} तृतीय क्रमांक:- चि.वैभव दयानंद महाबोले
[गुण:- ५५/१००]
३} तृतीय क्रमांक:- शेखर परमेश्वर गामाजी
[गुण:- ५५/१००]

*लहान गट विजेते (इयत्ता ५वी ते ७वी)(प्रश्न २५: गुण ५०) :-
१) प्रथम क्रमांक:- चि.इम्रान महिबुब नदाफ
[गुण :- ४५/५०]
२) द्वितीय क्रमांक:- चि.आशिष मल्लिनाथ मोरडे
[गुण :- ४३.२५/५०]
३) तृतीय क्रमांक:- चि.विशाल शशिकांत व्हंड्राव
[गुण :- ४०/५०]

पुन्हा एकदा राजरत्न ग्रंथालयाच्या "शालेय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षे"मध्ये सहभाग नोंदवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मनापासून आभार तसेच सर्व प्रशालेचे शिक्षक व उपस्थित अधिकारी यांचेही आभार.त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राजरत्न परिवाराकडून शुभेच्छा.✨🌼
#सुसंस्कारातून_परिपूर्णतेकडे

You are invited ✨💫
20/09/2023

You are invited ✨💫

16/09/2023

यशस्वी वाटचालीची 5 वर्षे संपन्न ✨💐
#राजरत्न_ग्रंथालयाचा_5_वा_वर्धापन_दिन

#सुसंस्कारातून_परिपूर्णतेकडे

 #विनम्र_अभिवादन #जयभीम
06/12/2022

#विनम्र_अभिवादन
#जयभीम

गोविंद पानसरे कोण आहेत?अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत,हे आपले ...
18/08/2022

गोविंद पानसरे कोण आहेत?

अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत,हे आपले दुर्दैवशिवाजी कोण होता..? या पुस्तिकेचे लेखक गोविंद पंढरीनाथ पानसरे यांच्यावर हल्ला करणारे तुम्हीच का गोविंद पानसरे...? असे जेव्हा विचारतात, तेव्हा महाराष्ट्रातील एका प्रबोधक वारकऱ्यावरील हल्ल्याचा कोणत्या शब्दांत निषेध करावा, हेच कळत नाही. शिवाजी विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या सागरमाळ परिसरात पानसरे यांचे घर आहे. रोज नित्यनेमाने ते विद्यापीठाच्या परिसरात सकाळी फिरायला जातात. तेथून परतताना दोन तरुण समोर आले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कोण हा गोविंद पानसरे..? की ज्याला ठार मारावे, त्याने जिवंत राहू नये, असे कोणाला वाटत असेल? काही वर्षांपूर्वी पानसरे यांनीच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली, ती रयतेच्या बाजूने होती. ती समतेचा विचार मांडणारी होती. ती गोविंद पानसरेंची नव्हती तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमी स्वराज्याच्या स्वप्नामध्ये दडलेली होती. ती फक्त गोविंद पानसरे यांनी उलगडून दाखविली. त्यावेळेपासून अलीकडच्या नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणापर्यंत गोविंद पानसरे यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत.दोन वर्षांपूर्वी पानसरे यांना कोल्हापुरात शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या माणसाने हा पुरस्कार स्वीकारताना कोणता संकल्प केला असेल? पुढील दोन वर्षांत किमान शंभर व्याख्याने शाहू महाराज कोण होते, या विषयावर देणार आणि तोही केवळ युवकांच्या समोरच मांडणार, असा संकल्प होता. त्यापैकी ७५ व्याख्याने नुकतीच पूर्ण झाली आहेत. नव्या पिढीला शाहू महाराजांच्या विचारांची ओळख व्हावी, इतिहास समजावा इतकी माफक अपेक्षा करून आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये घडलेल्या क्रांतिकारी घटनांची नोंद घेत नव्या पिढीला इतिहास सांगणे हा गुन्हा आहे का? तो पानसरे यांनी केला आहे का?सात वर्षांपूर्वी त्यांचा अमृत महोत्सव झाला. राजकीय पुढाऱ्यांच्या प्रमाणेच त्यांचाही भव्यदिव्य सत्कार करायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी त्यास ठाम नकार दिला. त्यांनी बजावले की, माझ्या सत्कार समारंभावर होणाऱ्या खर्चाचे पैसे निधी म्हणून जमा करा. त्यातून मला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेत मानाचे स्थान असलेल्या कोल्हापूरच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकायचा आहे. त्यातूनच ‘यांनी घडविले कोल्हापूर’ अशी चरित्रग्रंथमाला प्रकाशित करायला सुरुवात केली. कोल्हापूरच्या मातीमध्ये असंख्य माणसं घडली, ज्यांनी समाज घडविला, कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आणि नव्या पिढीला मार्गदर्शक ठरले. अशा जवळपास दोन डझन व्यक्तींची चरित्रे लिहून घेतली, ती प्रकाशित केली. आपला अमृत महोत्सवी वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करणारा हाच तो गोविंद पंढरीनाथ पानसरे.हिंदू-मुस्लीम वादाचा अन्वयार्थ लावणे असो की काश्मीरचा प्रश्न असो, मंडल आयोगाचा वाद असो की रामजन्मभूमीचा वाद असो, किंवा अगदी कोल्हापूरच्या टोलचा विषय असो. त्याची चिकित्सा करून संशोधन, अभ्यास, चर्चा करून सामान्य माणसाला कळेल, अशा पुस्तिकेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला. कोल्हापुरातल्या हातगाड्यावर भाजी विकणाऱ्यांचे प्रश्न किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या यावर ते नेहमीच अभ्यासपूर्ण बोलत राहिले. हे सर्व आपण करायचे का नाही, असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहत आहे. आजवर त्यांनी विचार, चिंतन, मनन, अभ्यास, संशोधन, लिखाण, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद याद्वारेच असंख्य विषयावर वाद-प्रतिवाद केला आहे. त्यांनी केव्हाही जाळपोळ, हाणामारी याचे समर्थन केले नाही. अशा अहिंसेच्या मार्गाने आणि प्रबोधनाच्या वाटेने जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यावेत, हे आपले दुर्दैव आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य दिले आहे. ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणी दिला?
- वसंत भोसले(लोकमत)

#राजरत्नग्रंथालय

 #शिवराज्याभिषेक सोहळा #6जून
06/06/2022

#शिवराज्याभिषेक सोहळा
#6जून

रॉय, मानवेंद्रनाथ : (२१ मार्च १८८७ ‒ २५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. ...
04/06/2022

रॉय, मानवेंद्रनाथ : (२१ मार्च १८८७ ‒ २५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. कलकत्त्या(कोलकाता)जवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव नरेन (नरेंद्र) व आडनाव भट्टाचार्य. मानवेंद्रनाथ रॉय हे त्यांनी नंतर (१९१६) धारण केलेले नाव. त्यांचे वडील संस्कृतचे शिक्षक होते. कोडालिया येथे स्थायिक झाल्यावर ते मंदिराचे मुख्य पुजारी म्हणूनही काम पाहत असत. शालेय शिक्षण पूर्ण करून कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असतानाच नरेन सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळीत ओढले गेले. त्यांच्या विरुद्ध तीन-चार खटले झाले. ‘हौरा कॉन्स्पीरसी केस’ हा त्यांच्याविरुद्ध दाखला करण्यात आलेला प्रसिद्ध खटला. त्यामध्ये आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली (१९११). शस्त्रखरेदीसाठी पैसे हवेत, म्हणून नरेनने दरोडे घालण्यास १९०६ पासून सुरुवात केली होती.

पहिले जागतिक महायुद्ध १९१४ साली सुरू झाले. इंग्रजी राज्य उलथून पाडण्याची ही उत्तम संधी होती. त्या वेळी क्रांतीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांत नरेन आणि त्यांचे सहकारी यांचा प्रमुख भाग होता. या कामी जर्मनीची मदत व्हावी, यासाठी क्रांतिकारकांचे प्रयत्न बरेच दिवस चालू होते. या मदतीबद्दल जर्मन प्रतिनिधींना भेटून योजना आखण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नरेन भट्टाचार्य यांची निवड झाली. त्यांनी शस्त्रास्त्रे व दारूगोळा पाठविण्याची एक योजना आखली. त्या योजनेप्रमाणे दारूगोळ्याने भरलेले एक गलबत बंगालमध्ये यावयाचे होते. परंतु ते गलबत येऊ शकले नाही व नंतर ती योजनाच संपूर्णपणे बारगळली. या कामासाठी नरेन यांना इंडोनेशिया, चीन वगैरे देशांचा १९१५-१६ साली दोन वेळा दौरा करावा लागला. दुसऱ्या वेळी सगळे कारस्थान फसल्यामुळे नरेन एकदा जे परदेशी गेले, ते १९३१ सालापर्यंत परत आले नाहीत.

दुसऱ्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १९१६ साली त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय असे आपले नामांतर केले. यानंतर त्यांच्या विचारांतही परिवर्तन झाले आणि ते साम्यवादी क्रांतीच्या दिशेकडे वळले. तथापि त्यांचा सशस्त्र क्रांतिकारक गटांशी व कार्याशी संबंध पूर्णतः तुटला नाही. ज्या जर्मन लष्करी अधिकाऱ्यांशी शस्त्रांच्या मदतीबद्दल त्यांची बोलणी झाली होती, त्यांच्यापैकी एकाने मेक्सिकोमध्ये त्यांची भेट घेतली व शस्त्रपुरवठ्याबद्दल पुन्हा बोलणी सुरू केली. शस्त्रे प्रत्यक्षपणे मिळाली नाहीत; पण त्या निमित्ताने बराच जर्मन पैसा रॉय यांच्या हातात पडला. त्या पैशाचा रॉय यांनी नंतर साम्यवादी क्रांतिकार्यासाठी मेक्सिकोमध्ये व जर्मनीमध्ये उपयोग केला.

रॉय १९१६ नंतर अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को आणि न्यूयॉर्क या दोन शहरी राहिले. तेथे त्यांनी भारतीय प्रश्नांचा आणि समाजवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास चालू ठेवला. मात्र क्रांतिकारक साम्यवादच रॉय यांच्या मनाला अधिक पटला व रुचला.

त्या सुमारास साम्यवादाचा प्रचार अमेरिकेत सुरू झाला होता. १९१७ मधील रशियन राज्यक्रांतीमुळे त्याला खूपच जोर चढला होता. रॉयसारखा कर्तृत्ववान तरुण नेता मिळाल्यामुळे तेथील साम्यवादी कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. न्यूयॉर्कमध्ये असताना रॉय यांना हिंदू−जर्मन कटाच्या खटल्यातील आरोपी म्हणून एक रात्र तुरुंगात काढावी लागली. पण काही तासांनीच त्यांची जामिनावर सुटका झाली. खटला उभा राहण्यापूर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी अमेरिका सोडली आणि ते मेक्सिकोमध्ये दाखल झाले.

मेक्सिकोमधील रॉय यांचे जीवन महत्त्वाच्या घटनांनी भरलेले आहे. तेथे ते जुलै १९१७ पासून नोव्हेंबर १९१९ पर्यंत होते. त्या कालावधीत त्यांनी त्या देशाच्या राजकारणात भाग घेतला. १९१८ साली त्यांनी मेक्सिकन समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९१९ मध्ये त्यांनी त्या पक्षाचे साम्यवादी पक्षांत रूपांतर केले. रशियाबाहेर स्थापना झालेला असा तो पहिलाच साम्यवादी पक्ष होता. मेक्सिकोत रॉय यांची रशियन क्रांतीचा एक पुढारी बरड्येन याच्याशी गाठ पडली. दोघे उत्तम मित्र झाले. लेनिनला रॉयची माहिती झाली ती बरड्येनमार्फतच. बरड्येननेच नंतर रॉय यांना मॉस्को येथे भरणाऱ्या साम्यवादी चळवळीच्या जागतिक परिषदेला हजर राहण्याचे लेनिनचे आमंत्रण दिले. रॉय यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर १९१९ मध्ये मेस्किको सोडले.

यूरोपमधील साम्यवादी क्रांतिकारक चळवळीचा भर १९२० च्या सुमारास ओसरला होता आणि लेनिनसारखे पुढारी यूरोपबाहेरील देशांकडे आपले लक्ष वळवत होते. त्यांचे लक्ष मुख्यत्वेकरून भारत व चीन या देशांकडे होते. त्यांच्या दृष्टीने रॉय यांचे साम्यवादी चळवळीतील पदार्पण सूचक व आनंददायी होते.

साम्यवादी चळवळीत रॉय यांची प्रगती मोठ्या वेगाने झाली. साम्यवादी चळवळीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला रॉय हे प्रथम हजर राहिले ते १९२० साली. ती त्या संघटनेची दुसरी जागतिक परिषद होती. मेक्सिकोचे प्रतिनिधी म्हणून ते त्या परिषदेला हजर राहिले. त्या परिषदेत रॉय यांची लेनिनशी पहिली गाठ पडली. त्या परिषदेतच त्यांचा लेनिनशी भारतासारख्या वासाहतिक देशांतील साम्यवादी पक्षाचे कार्य, या विषयावर वाद झाला. या विषयावर एक प्रबंध तयार केला होता. तो लेनिनने रॉय यांचे मत अजमावण्यासाठी म्हणून त्यांना परिषद सुरू होण्यापूर्वीच वाचायला दिला होता. हा रॉय यांचा मोठा सन्मान होता. चर्चेमध्ये रॉय यांची विद्वत्ता आणि वादकौशल्य लेनिनच्या व इतर जागतिक कीर्तीच्या साम्यवादी पुढाऱ्यांच्या नजरेत भरले आणि त्यामुळे लवकरच त्यांना साम्यवादी पुढाऱ्यांच्या पहिल्या रांगेत स्थान मिळाले. आंतरराष्ट्रीय साम्यवादी संघटनेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांवर रॉय यांची नेमणूक झाली.

ताश्कंद येथे रॉय यांनी १९२० साली भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मात्र वाढला नाही. पुढे रॉय यांच्या प्रोत्साहनामुळे भारतातच १९२५ मध्ये नवीन साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. रॉय हे पहिल्यापासूनच त्या पक्षाचे मार्गदर्शक व पुढारी होते.

आंतराष्ट्रीय साम्यवादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कॉमरेड रॉय १९२७ सालच्या सुरुवातीस चीनला गेले. त्या वेळी चीनमधील क्रांतियुद्ध नाजुक अवस्थेत होते. क्वोमिंतांगमधील उजव्या पक्षांचा जोर वाढला होता आणि ते साम्यवादी पक्षाला विरोध करीत होते. या वेळी साम्यवादी पक्ष आणि क्वोमिंतांग यांच्यामधील युतीचा फेरविचार करणे आवश्यक होते; रॉय यांच्या मतानुसार क्वोमिंतांगबरोबर केलेली युती हा एक डावपेचाचा प्रश्न होता. रॉय यांचे हे म्हणणे आंतरराष्ट्रीय संघटनेला पटले होते; तथापि सारी साम्यवादी यंत्रणा बरड्येन यांच्यसारख्या वयोवृद्ध पुढाऱ्यांच्या हातांत होती; त्यामुळे रॉय यांना काही करता आले नाही.

क्रांतीची घसरगुंडी चालूच होती. ती घसरण रॉय यांना थांबवता आली नाही. अखेर क्वोमिंतांगने साम्यवाद्यांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. त्यात हजारो साम्यवाद्यांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. त्यात हजारो साम्यवाद्यांची आहुती पडली. रॉय यांनाही चीन सोडणे भाग पडले. ते मॉस्कोला परत गेले. पण तिथेही त्यांना फार दिवस राहता आले नाही. चीनमधील अपयशाची सारी जबाबदारी साम्यवादी पुढारी रॉय यांच्यावर टाकून मोकळे झाले; पण तो त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. रॉय यांच्याजवळ बरेच अस्सल कागद होते. ते त्यांनी दोन पुस्तकांच्या रुपाने जगापुढे ठेवले आहेत. त्यांचे पहिले पुस्तक रेव्हलूशन अँड काउंटर-रेव्हलूशन इन चायना (१९३०). त्यामध्ये अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यानिशी रॉय यांनी चिनी क्रांतीचा इतिहास कथन केला आहे. दुसरे पुस्तक माय एक्सपीरिअन्सेस इन चायना (१९३३; १९४५). हे रॉय यांनी तुरुंगात असताना १९३२ साली लिहिलेले पुस्तक. यांखेरीज आता तिसरेही एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याचे नाव एम्. एन्. रोय्स मिशन टू चायना असे असून ते रॉय १९२७ मध्ये चीनमध्ये असताना केलेल्या भाषणांच्या उताऱ्यांवर आधारलेले आहे. हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. न्यू ओरिएंटेशन (१९४६), बियाँड कम्युनिझम (१९४७), न्यू ह्यूमॅनिझम (१९४७), इंडियाज मेसेज (१९५०), रॅडिकल ह्यूमॅनिझम (१९५२), रीझन, रोमँटिसिझम अँड रेव्हलूशन (२ खंड, १९५२, १९५५) इ. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या ग्रंथांची संख्या सत्तरांवर भरते.

आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीतील रॉय यांची ही वाढती प्रतिष्ठा काही मंडळींना खुपू लागली. त्यामुळे नंतर संघटनेत रॉय यांच्याविरुद्ध कट झाले. त्यांनी रॉय यांच्या चीनमधील अपयशाचा फायदा घेऊन पुढाऱ्यांच्या मनात रॉय यांच्याविरुद्ध विष कालवले. १९२८ साली सहावी जागतिक साम्यवादी परिषद भरून अतिजहाल धोरणाचा अंमल करण्याचे ठरले आणि मग मवाळ, क्रांतिविरोधी असा शिक्का मारून रॉय यांना साम्यवादी संघटनेतून बाहेर काढण्यात आले; पण रॉय यांना ते एक आव्हान आहे असे वाटले.

साम्यवादी पक्षातील मतभेद आणि वैमनस्ये १९२७-२८ पासून वाढतच होती. ती केवळ भारतापुरती किंवा भारतीय पक्षापुरती मर्यादित नव्हती. १९२८ मध्ये जागतिक सामयवादी पक्षाची जी सहावी परिषद झाली, त्या परिषदेमध्ये या मतभेदांचा स्फोट झाला. बऱ्याचशा जुन्या कार्यकर्त्यांच्या मताविरुद्ध सहाव्या परिषदेने अतिजहाल मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. त्या वेळी समाजवादी पक्ष व इतर संस्था यांच्याशी शत्रुत्वाने वागण्याचे ठरले आणि त्या संस्थांमधील संयुक्त आघाडीचे (United Front) काम बंद करण्यात आले. तसेच त्या संस्थांबरोबरही सगळे संबंध तोडून टाकण्याची आज्ञा सर्व साम्यवादी कार्यकर्त्यांना देण्यात आली. या धोरणामुळे यूरोपमध्ये आणि इतरत्र वाढणाऱ्या फॅसिस्ट शक्तींना परिणामकारक विरोध करता आला नाही. रॉय यांनी या धोरणाला पहिल्यापासूनच विरोध केला होता. काँग्रेसशी सहकार्य करूनच साम्यवादी पक्षाने आपले कार्य व बळ वाढवावे, अशी त्याची सूचना होती. या सूचनेचा अव्हेर झाला आणि राष्ट्रीय काँग्रेसमधील पुरोगामी शक्तींशीदेखील शत्रुत्वाने वागावे, असा आदेश सर्व साम्यवादी कार्यकर्त्यांना देण्यात आला. रॉय यांनी या धोरणाविरुद्ध आपले मत स्पष्टपणे जाहीर केले. त्यासंबंधी त्यांनी काही लेखदेखील लिहिले. त्यामुळेच १९२९ साली त्यांची साम्यवादी पक्षातून हकालपट्टी झाली. साम्यवादी पक्षाने काँग्रेसविरुद्ध आघाडी उभारली आणि तिच्या सर्व कार्यक्रमांना विरोध सुरू केला.

भारतामध्ये आपल्याला परत पाठवावे असा त्यांनी साम्यवादी पुढाऱ्यांशी बरेच दिवस आग्रह धरला; पण तो स्वीकरण्यात आला नाही. १९३० च्या अखेरीस गुप्त रीतीने ते भारतात येऊन दाखल झाले. त्यानंतर सहा महिने ते भारतामध्ये गुप्तपणे राहिले. या अवधीत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घेतल्या. पं. जवाहरलाल नेहरूंकडे तर ते दोन-तीन दिवस मुक्कामाला होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी संयुक्त प्रांताचा दोन-तीन वेळा दौराही केला होता.

रॉय भारतात परत आले ते आपल्या विचारसरणीनुसार कार्य करण्याच्या उद्देशाने. काँग्रेसची १९३० ची असहकाराची चळवळ त्या वेळी मंदावत आली होती आणि विशेषेकरून तरुण मंडळीत औदासिन्य पसरले होते. म. गांधींजवळ खादी आणि ग्रामोद्योग यांखेरीज दुसरा कार्यक्रम नव्हता. रॉय यांनी त्या वेळी काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि स्वातंत्र्याचा लढा वाढविण्याचा कार्यक्रम जनतेसमोर ठेवला. त्या कार्यक्रमाचा पुरस्कार करण्यासाठी म्हणून जनतेची संघटना हवी होती. ती निर्माण करण्यासाठी रॉय यांनी या सुमारास आपली काँग्रेस अंतर्गत अशी ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन’ या नावाची संस्था १९३१ मध्ये स्थापन केली. तिचे काम हळूहळू देशभर वाढत होते.

रॉय यांच्या या उद्योगांची पोलीसांनी शहानिशा सुरू केली. त्यांच्यावर पूर्वीचे कानपूर खटला व मीरत खटला यासंबंधीचे आरोप होतेच. त्या निमित्ताने पोलीस सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेत होते. २१ जुलै १९३१ रोजी अखेर पोलिसांना यश आले. रॉय यांना मुंबई येथे भायखळा भागात अटक झाली. नंतर त्यांना कानपूर येथे नेण्यात आले. तेथेच तो खटला चालला व त्यामध्ये रॉय यानां १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. पुढे अपीलात ती शिक्षा ६ वर्षांवर आणण्यात आली. तुरुंगातील हा काळ रॉय यांनी अभ्यासात घालविला. त्याचप्रमाणे तुरुंगाबाहेरील सहकाऱ्यांना ते वेळोवेळी मार्गदर्शनपर आणि विवेचनात्मक संदेश गुप्तपणे पाठवत असत.

रॉय यांची नोव्हेंबर १९३६ मध्ये तुरुंगातून मुक्तक्ता झाली. त्यांचे सहकारी व काँग्रेस पुढारी यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रॉय हे ताबडतोब आपल्या कार्याला लागले. अगोदर विचार करून ठरल्याप्रमाणे, रॉय यांनी ताबडतोब काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश त्यांनी पं. नेहरूंच्या सल्ल्याप्रमाणे संयुक्त प्रांतात केला. पं नेहरूंच्या मदतीमुळे रॉय यांची ताबडतोब फैजपूर काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून व प्रांतिक काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाचे सभासद म्हणून निवड झाली. रॉय यांचे राजकीय सहकारी याच सुमारास काँग्रेसचे सभासद बनून आपले कार्य करत होते. त्या सर्वांचा मिळून एक ‘रॉय गट’ स्थापना झाला. काँग्रेस कार्यप्रवण व सामर्थ्यशाली बनवावी तसेच काँग्रेसने शेतकरी-कामकऱ्यांशी व सामान्य जनतेशी एकरूपता साधावी, असा रॉय व त्यांचे सहकारी यांचा प्रयत्न होता.

दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ साली सुरू झाले. हे युद्ध फॅसिझमविरोधी आहे, म्हणून त्याला भारतीय जनतेने मदत करावी व त्या बाबतीत सरकारशी सहकार्य करावे, अशी रॉय यांची भूमिका होती. १ सप्टेंबर १९४० रोजी रॉय यांनी युद्धसहकार्याबद्दलचे मोठे निदर्शन केले. त्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली.

त्यानंतर रॉय यांनी आपला स्वतःचा ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ हा पक्ष १९४० मध्ये स्थापन केला.

युद्धकाळात या पक्षाने लोकविरोधकाला न जुमानता युद्धसहकार्याचे धोरण स्वीकारले आणि त्याप्रमाणे काम केले. युद्धसहकार्य हे साधाऱणपणे लोकांनाही पसंत नव्हते आणि म्हणून युद्धकाळात रॉय यांची लोकप्रियता बरीच खालावली. वर्तमानपत्रांतून त्यांच्याविरुद्ध प्रचार झाला, त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध काही ठिकाणी दगडफेक, चिखलफेकदेखील झाली. या सर्व प्रकारांमुळे विचलित न होता रॉय यांनी आपले निश्चित केलेले धोरण तसेच चालू ठेवले.

रॉय यांचे तात्त्विक चिंतन-मनन चालू होतेच. राजकीय पक्ष जनतेच्या हातामध्ये सत्ता जाण्याच्या कामी साहाय्यभूत होत नाहीत, असे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी १९४८ मध्ये आपला पक्ष विसर्जित केला. जनतेमध्ये वैचारिक जागृती निर्माण करणाच्या प्रयत्नास त्यांनी स्वतःला वाहून घेतले.

तुरुंगवासातील हालअपेष्टांमुळे रॉय यांची प्रकृती १९३६ पासूनच बिघडली होती. नंतरच्या धावपळीत ती अधिकच बिघडली. ती आटोक्याबाहेर गेली नाही, याचे मुख्य कारण, त्यांची पत्नी एलन रॉय यांनी केलेली त्यांची शुश्रूषा. १९३८ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. रॉय साम्यवादी पक्षात होते, तेव्हापासूनच्या त्या सहकारी होत्या.

रॉय यांनी १९४६ मध्ये बावीस सूत्रांच्या स्वरूपात आपला नवमानवतावाद मांडला. मानवी प्रकृतीची घडण, तिच्यात समाविष्ट असलेल्या मूलभूत शक्ती आणि प्रेरणा तसेच मानवाची समग्र परिस्थिती यांच्या सम्यक आकलनावर नवमानवतावाद आधारलेला आहे. पक्षविसर्जनानंतर जनतेची जागृती करणे आणि तिची संघटना बांधणे हे कार्य रॉय आमरण चालू ठेवले . ‘रॅडिकल ह्यूमॅनिस्ट चळवळ’ या नावाने त्यांचे हे कार्य नावारूपास आले. त्यांच्या मृत्यूनंतरही ही चळवळ टिकून आहे.

संस्कारक्षम वयात रॉय यांच्या विचारांवर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद वगैरेंच्या विचारांचा खूप प्रभाव होता. ऐन तारुण्यात संन्यासमार्गाचा स्वीकार करण्याचाही विचार त्यांनी केला होता; परंतु नंतर सशस्त्र क्रांतिमार्गाकडे ते वळले. पुढे तोही मार्ग टाकून त्यांनी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत कार्य केले. साम्यवादाच्या स्वीकारानंतरही त्यांचे आत्मपरीक्षण व तत्त्वचिंतन चालूच राहिले. यातूनच साम्यवादामधील उणिवाही त्यांना दिसून आल्या आणि साम्यवादानंतरचा मार्ग म्हणून त्यांनी नवमानवतावादाचा पुरस्कार केला.

रॉय यांच्या तात्त्विक प्रवासाचे तीन टप्पे सांगता येतील. पैकी पहिला टप्पा राष्ट्रवाद. राष्ट्रवादाने प्रेरित होऊन ते शस्त्रास्त्रे आणण्याच्या कटात सहभागी झाले. दुसऱ्या टप्प्यावर संघर्षाची मुळे लक्षात येऊन ते मार्क्सवादी झाले. मार्क्सवाद व साम्यवाद जो तत्त्वविचार आणि आचार सांगतात, तो पटल्याने त्यांनी रशियाबाहेरील पहिली कम्युनिस्ट पार्टी मेक्सिकोत काढली. संघर्ष मुळात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ मधील नसून विविध देशांमधील हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असा आहे. मात्र तिसऱ्या निर्णायक टप्प्यावर ते विशिष्ट चौकटीतून बाहेर पडले. त्यांना संघर्षावरील उतारा मिळाला, तो ‘क्रांतिकारी मानववादा’त. बावीसकलमी नवमानवतावाद (New Humanism) किंवा क्रांतिकारी मानववाद (Radical Humanism) हा मानवतावादातून वेगळा आहे. करुणा, दया, सेवाभाव, प्रेम, त्याग, समर्पण, सोशीकता, समंजसपणा, बंधु-भगिनीभाव, सहानुभूती, अनुकंपा या गोष्टी मानवतावादाला अभिप्रेत असतात, तर मानववादाला अपेक्षित असणारी मूल्यचौकट अत्यंत निराळी आहे.

रॉय यांना अभिप्रेत असणारा मानववाद ईश्वराला वा विश्वाला केंद्रस्थानी मानत नाही; धर्म, आत्मा, परमात्मा, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, पुनर्जन्म, कर्मविपाक मानत नाही. केंद्रस्थानी ईश्वर मानला की, माणसाला गौण स्थान मिळते. ईश्वर सार्वभौम मानला की, मनुष्य दुबळा, पापभिरू व भावुक होतो. प्रतिकारक्षमता गमावतो. विवेक जातो. मुळात माणूस पापी नाही नि दिव्यही नाही. तो विवेकी, विचारी, नीतिमान, बुद्धिमान, सृजनशील, सहकारप्रिय आणि स्वतंत्र आहे. त्याने समाजहितासाठी त्याग, समर्पण वगैरे करावयाची गरज नाही. गरज आहे ती पूर्ण विचारांती विवेकी कृती करण्याची; कारण त्याच्या कृतीतून मूल्ये निर्धारित होतात. मूल्ये काही आयती मिळत नाहीत. कुणी कुणास देत नाही, शिकवत नाही. ती कृतींद्वारा घडतात. विवेकी नीतिमान मनुष्य जी कृती करतो, ती समाजहिताची असते. त्यातून समाजकल्याण साधले जाते. समता, सत्तेचे विकेंद्रीकरण, मूल्याधिष्ठित राजकारण व सत्यान्वेषण शक्य होते ते रॉय यांच्या मते नव-मानववादामुळे. व्यक्तीला प्रतिष्ठा लाभते. मार्क्सला अपेक्षित असणारा जडवाद रॉय यांनाही मान्य आहे; परंतु त्यातील ऐतिहासिकता व त्यातून येणारी अपरिहार्य पुनरावृत्ती त्यांना मान्य नाही. म्हणजे असे की मार्क्सप्रमाणेच रॉयही जडवादी आहेत. वैज्ञानिक युगाला साजेसे भौतिकवादी, इहवादी तत्त्वज्ञान त्यांना मान्य आहे; पण ‘इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे’ हे मार्क्सचे म्हणणे त्यांना पटणारे नाही. प्रत्येक विचारी, विवेकी माणसात युगप्रवर्तक शक्ती असते. इतिहासाला वेगळे वळण देण्याची क्षमता असते. परिस्थितीला विलक्षण रीतीने हाताळण्याचे सामर्थ्य असते. इतिहास निर्माण करण्याची ताकद बुद्ध, सॉक्रेटिस, रुसो, मार्क्स, गांधी अशा व्यक्तींमध्ये होती; म्हणून व्यक्तिमाहात्म्य रॉय अधोरेखित करतात. सत्यान्वेषण आणि स्वातंत्र्याची आस असलेल्या व्यक्ती प्रसंगी चुका करतील; पण त्यातूनच इतिहास निर्माण होण्याची ग्वाही नव-मानववाद देतो. तर्कनिष्ठता, बुद्धिप्रामाण्य व विचारांपेक्षा कृतीला किंवा कृतिप्रवणतेला प्राधान्य असलेल्या मानववादाला जडवाद स्वीकारार्ह वाटतो. रॉय यांच्या म्हणण्याप्रमाणे, जगाला भारताकडून आध्यात्मिकतेचे धडे घेण्याची गरज नाही. ती आध्यात्मिकता, त्यातून येणारा परमानंद पाश्चिमात्य संस्कृतीला माहीत आहे. त्यातच गुंतून न राहता तिने भव्य, उन्नत, विकसित सृष्टी उभारली आहे. भारतानेच आपला प्राचीन संस्कृतीचा जडवादी वारसा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी १९४६ मध्ये ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’ची स्थापना केली; परंतु पक्षांतर्गत वादविवाद, सत्तास्पर्धा व राजकारण यांमुळे अपेक्षित परिणाम साधण्याची शक्यता धूसर झाल्यावर १९४८ मध्ये ती बरखास्त करून क्रांतिकारी मानववादी चळवळ (Radical Humanist Movement) सुरू केली. त्यांनी इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन व मेक्सिकन भाषांत विपुल लेखन केले.

डेहराडून येथे त्यांचे निधन झाले.

#मानवेंद्रणाथ_रॉय

#राजरत्नग्रंथालय

Address

Devasinga Nal TQ Tuljapur DIST Osmanabad
Naldurg
413603

Telephone

+917775808007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजरत्न ग्रंथालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to राजरत्न ग्रंथालय:

Share

Category