मल्हार फाउंडेशन

मल्हार फाउंडेशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मल्हार फाउंडेशन, Social service, Near by Chakreshwar Talao, Umrale Road, Nallasopara (w), Tal-Vasai, Dist./Palghar, Nala Sopara.

💥💥 आनंदाची बातमी...!! 💥💥वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा नगर, नालासोपारा (प.) येथील खुल्या रं...
07/07/2025

💥💥 आनंदाची बातमी...!! 💥💥

वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा नगर, नालासोपारा (प.) येथील खुल्या रंगमंचासमोरील उद्यानास मल्हार फौंडेशन, नालासोपारा (प.) व रिक्षा चालक बांधव नालासोपारा (प.) यांच्या मागणीनुसार विधापरिषदेचे सभापती मा.श्री. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान असे गौरवपूर्ण नाव देण्यात आले.

गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या पासून धनगर जमात वसई-विरार या परिसरात राहत आहे आणि योगायोग असा आहे की, हे वर्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वे जन्मशताब्दी-वर्ष असून आता आपणांस आपले हक्काचे ठिकाण मिळाले आहे.

यासाठी नालासोपारा विधानसभेचे विद्यमान आमदार मा.श्री. राजन नाईक साहेब, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मा. अनिलकुमार पवार साहेब, वसई-विरार महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मा.श्री. संजय हेरवडे साहेब आणि विधानपरिषद सभापती मा. राम शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा.श्री. उत्तम वाघमोडे साहेब तसेच मल्हार फौंडेशन, नालासोपारा (प.) तर्फे युवा नेते मा.श्री. आशिषराव सुळे साहेब, मार्गदर्शक मा.श्री. संतोष मदने साहेब, मा.श्री. रणजित सुळे आणि मा.श्री. कृष्णा सुळे यांच्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि आभार..!!

Ashish Sule Ranjit Jaywantrao Sule Krishna Sule Santosh Madane

नालासोपारा (प.) जिल्हा पालघर येथील वार्ड क्रमांक ५८ मधील उद्यानास "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान" असे नामक...
16/09/2023

नालासोपारा (प.) जिल्हा पालघर येथील वार्ड क्रमांक ५८ मधील उद्यानास "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान" असे नामकरण देण्याची मागणी मान्य.

आज नालासोपारा (प.) येथील वार्ड क्रमांक ५८ लक्ष्मी बेन छेड़ा नगर मधील उद्यानास "पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान" असे नामकरण देण्याची मागणी वसईचे आमदार लोकनेते मा.श्री. हितेंद्र ठाकुर साहेब यांनी मान्य करुन लवकरात लवकर त्या उद्यानास नाव दिले जाईल असे अश्वस्त केले.

तसेच आपली मूळ मागणी त्या उद्यानामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य-दिव्य स्मारक व्हावे या साठीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पूर्ण करण्याचे अश्वस्त केले.

तरी आपण सर्व धनगर समाजाच्या वतीने, मा.श्री.आ.हितेंद्र ठाकुर साहेब आणि मा.सभापती श्री.अतुलजी साळुंखे यांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.

उपस्थित सर्व समाज बांधवांचे मन:पूर्वक आभार..!!

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶मल्हार फाउंडेशन आयोजित, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वैचारिक जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गु...
09/07/2023

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
मल्हार फाउंडेशन आयोजित, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वैचारिक जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा.
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

नालासोपारा (रविवार, दि.२५ जून) :- मल्हार फाउंडेशन आयोजित, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी वैचारिक जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नालासोपारा येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. क्षितिज (दादा) ठाकुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसईचे नायब तहसिलदार मा.श्री. शशिकांत नाचन साहेब, प्रमुख वक्ते म्हणून लेखक मा.श्री. संतोष पिंगळे साहेब तसेच प्रमुख उपस्थित म्हणून वसई विरार महानगर पालिका विधी सल्लागार मा.श्री. दत्ता माने साहेब, शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतुक सेना उपाध्यक्ष मा.श्री.अनिल झोरे साहेब, मरहट्टी संशोधन मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. सुरेश महारणवर साहेब, मंत्रालयीन अधिकारी मा.श्री. भरत बिडे साहेब, क्राइम ब्रांच पोलिस अधिकारी मा.श्री. संतोष मदने साहेब, वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती मा.श्री. निलेश देशमुख साहेब, वसई विरार महानगर पालिकेचे माजी सभापती मा.श्री. अतुल साळुंखे साहेब, लेखक, संशोधक मा.श्री. सुमितराव लोखंडे साहेब, प्रसिद्ध डॉक्टर मा.श्री.धनराज बोरसे साहेब, माजी मुख्याध्यापक मा.श्री. हिम्मत नंदाळे सर हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संगणक अभियंता,मंत्रालय तसेच मल्हार फाउंडेशनचे सचिव मा.श्री.कृष्णा सुळे साहेब यांनी केले.

यावेळी विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांनी फोनद्वारे संवाद साधला आणि कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. क्षितिज दादा ठाकुर यांच्याकडे मल्हार फाउंडेशन तर्फे सर्व समाज बांधवानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावे समाजमंदिर मिळावे ही मागणी केली असता मा.आमदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा करण्यास संम्मती दर्शवली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री. संतोष पिंगळे सर यांनी धनगर समाजातील अपरिचित सुभेदारांचा इतिहास तसेच त्यांची उल्लेखनीय योगदान याबाबत सविस्तर सांगितले

या कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी कु.राहुल दाजी सोलंकर, मुंबई पोलिस कु.सविता यशवंत सुळे आणि डॉक्टर आदिती यशवंत सुळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच १० वी आणि १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच मा.श्री.डॉ. महादेव इरकर सर यांनी पी.एच.डी पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा मल्हार फाउंडेशन तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.

गेल्या ९ वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करीत आहोत परंतु २०१८ पासून आपण वैचारिक जयंती करण्याचे ठरविले तेव्हापासून आज म्हणजेच २०२३ पर्यंत आपण एक समाजाला वैचारिक, सामाजिक भावनेच्या माध्यमातून जोडले जात आहोत याचे आपल्या सर्वाना समाधान आहे.
खरतर, कालच्या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांच्या आणि समाजबांधवाच्या खुप चांगल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या यातच आपल्या सर्वांच्या मेहनतीचे यश आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.डॉ.महादेव इरकर सर आणि मा.श्री.विजय सुळे सर यांनी संयुक्त्यरित्या केले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि समाजबांधव यांचे मल्हार फाउंडेशन तर्फे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद..!!

🔶 मल्हार फाउंडेशन टीम 🔶

नालासोपारा विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार मा.श्री. क्षितिज दादा ठाकुर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🤝🎂
09/07/2023

नालासोपारा विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार मा.श्री. क्षितिज दादा ठाकुर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🤝🎂

काल रात्री अंबाजोगाई शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील आईसाहेबांच्या डिजिटल नेमप्लेटची काही समाजकंटकांनी तोडफ...
04/08/2022

काल रात्री अंबाजोगाई शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील आईसाहेबांच्या डिजिटल नेमप्लेटची काही समाजकंटकांनी तोडफोड केली.याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो.तसेच तेथील पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करतो.अहिल्याप्रेमी कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच पोलिस प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन करतो.

🌺🤝 मन:पूर्वक आभार!! 🤝🌺🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡        मल्हार फाउंडेशन (रजि.)      नालासोपारा (जि. पालघर)                   आयोजित, समा...
13/06/2022

🌺🤝 मन:पूर्वक आभार!! 🤝🌺

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
मल्हार फाउंडेशन (रजि.)
नालासोपारा (जि. पालघर)
आयोजित,
समाजपयोगी-जयंती सोहळा, किंजल वृद्धाश्रम,वसई येथे वृद्ध नागरिकांना भोजन, वैचारिक बैठक आणि सस्नेह भेट
🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
रविवार दिनांक १२ जून,२०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त, जयंती सोहळा व किंजल वृद्धाश्रम,वसई येथे वृद्ध नागरिकांना भोजन देऊन मोठ्या वैचारिक व नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी या वैचारिक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालघर जिल्ह्यातील नायब तहसीलदार मा. श्री. केशव तरंगे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विलास घुटुकडे (युवा उद्योजक), मा.श्री. संतोष मदने साहेब (लाचलूतपत प्रतिबंधक विभाग अधिकारी, ठाणे), मल्हार फाउंडेशनचे मार्गदर्शक/युवा उद्योजक मा.श्री. आशिष सुळे साहेब, किंजल वृद्धाश्रमचे अध्यक्ष मा.श्री. सुनील अनुसे सर, माजी मुख्याध्यापक मा.श्री. हिम्मत नंदाळे सर, मा.डॉ.वाघ साहेब आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. विजय सुळे सर हे सर्व मान्यवर उपस्थित हाेते.
आणि आपल्या समाजातील जुन्या पिढीतील एक सच्चा समाजसेवक, मार्गदर्शक मा.श्री. अशोक भाऊ सुळे, गोड आणि मृदू स्वभावाचे मा.श्री. नामदेव सुळे सर,हसतमुख व्यक्तीमत्व,युवा उद्योजक मा.श्री. महेंद्र सुळे साहेब आणि मा.मुख्याध्यापक मा. श्री. शिवाजी सुळे सर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पगुच्छ घालून अभिवादन करण्यात आले तसेच आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे मा.श्री. विलास घुटुकडे साहेब, मा.श्री. संतोष मदने साहेब आणि मा.श्री. नंदाळे सर यांनीही आपले सामाजिक आणि वैचारिक मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री. विजय सुळे सर यांनी त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर वैचारिक मार्गदर्शनाने केले. पालघर जिल्ह्यातील समस्त धनगर समाजाने एका चांगल्या उद्देशाने एक मजबूत वैचारिक बैठक निर्माण होण्यासाठी एकाच व्यासपीठावर बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले.. तसेच त्यांनी आपल्या समाजातील बांधवाना शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा याशिवाय आपल्याला पर्याय नाही असे प्रबोधन केले. खरंतर ज्यांच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण साजरी केला त्या किंजल वृद्धाश्रमचे अध्यक्ष मा. श्री. सुनील अनुसे सर यांनी मल्हार फाउंडेशनचे कौतुक आणि आभार मानले आणि थोडक्यात वृद्धाश्रमविषयी माहिती दिली आणि किंजल वृद्धाश्रममध्ये धनगर समाजातील हुशार, गरजू, होतकरू अशा एका विद्यार्थ्याला अभ्यासासाठी निशुल्क एक जागा देण्याचे जाहीर केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. केशव तरंगे साहेब यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून सदैव आपली समाजाप्रती कोणत्याही प्रकारची मदत करणार आहेत व ते सातत्याने करीत आहेत याचे दाखले दिले तसेच त्यांनी सामाजिक चळवळीतून आणि आपल्या वैचारिक भावनेतून आपण आपला समाज घडवला पाहिजे असे मार्गदर्शनपर विचार मांडले.
यावेळी एक विशेष उपस्थिती म्हणून किंजल वृद्धाश्रममधील सर्व आजी-आजोबा उपस्थित होते आणि आपल्या सर्वांचे भाग्य म्हणा किंवा नशीब म्हणा की, त्यामध्ये एक आजी अशा होत्या कि. त्यांनी पुणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते त्यांनी प्रेमाने आणि आपुलकीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि कार्यक्रमात ऊर्जा निर्माण झाली.
विशेष सत्कार मुंबई स्पेशल फोर्स वनचे अधिकारी मा.श्री. कृष्णा अनुसे यांचा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्हार फाउंडेशनचे सन्मानीय सचिव मा.श्री. कृष्णा सुळे सर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आपल्या गोड आणि मधुर, रसाळ भाषेत मांडनारे मा.श्री. महादेव इरकर यांनी केले.

यावेळी धनगर समाजातील मा.श्री. अमोल मदने साहेब, मा.श्री. पांडूरंग कृष्णा सुळे सर, मा.श्री. बाजीराव सुळे साहेब,नवनाथ भाऊ सोलंकर, युवा नेते मा.श्री. बाळू इरकर, मा.श्री.किरण झूराळे, मा.श्री.सागर घुटुकडे, मा.श्री. रोहन घुटुकडे, मा.श्री. दत्ता सुळे, मा.श्री.ओंकार बरकडे व इतर समाजबांधव उपस्थित होते.

मल्हार फाउंडेशनच्या वतीने मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष मा.श्री. रणजित सुळे तसेच पदाधिकारी मा.श्री. विनोद (बापू) दडस,मा.श्री.हेमंत सरगर, मा.श्री.तुषार हांडे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
पुन्हा एकदा आम्ही सर्व मल्हार फाउंडेशनच्या वतीने मान्यवर, सर्व समाजबांधव, किंजल वृद्धाश्रम ट्रस्ट यांचे मनपूर्वक जाहीर आभार आणि धन्यवाद...!!
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
जय अहिल्या ! जय मल्हार !!
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🌺🤝 सस्नेह निमंत्रण..!! 🤝🌺🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡        मल्हार फाउंडेशन (रजि.)      नालासोपारा (जि. पालघर)                   आयोजित, ...
03/06/2022

🌺🤝 सस्नेह निमंत्रण..!! 🤝🌺
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
मल्हार फाउंडेशन (रजि.)
नालासोपारा (जि. पालघर)
आयोजित,
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
समाजपयोगी - जयंती सोहळा
🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त, जयंती सोहळा व किंजल वृद्धाश्रम वसई येथे फळ-वाटप कार्यक्रम
🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
♦️कार्यक्रमाचे स्थळ :-*
⏸️ किंजल वृद्धाश्रम,अभंग भवन, उमेळेफाटा-नायगाव मार्ग, उमेळे, वसई (वेस्ट), ता. वसई, जि. पालघर
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
♦️ कार्यक्रमाची वेळ :-*
रविवार, दि. १२ जून,२०२२ रोजी संध्याकाळी ठीक ४.३० वाजता.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

संपर्क :-*
मा.श्री. आशिष सुळे साहेब - 9890743467
मा.श्री. सुनील अनुसे सर - 9270321910
मा. श्री. रणजित सुळे - 9552979864
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
आयोजक :-*
🔸 मल्हार फाउंडेशन (रजि.)नालासोपारा (जि. पालघर)
🔸 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, (पालघर जिल्हा.)
🔸 समस्त धनगर समाज, पालघर जिल्हा

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
जय अहिल्या ! जय मल्हार !!
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कुशल प्रशासक,आदर्श राज्यकर्त्या,राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!! #अहिल...
31/05/2022

कुशल प्रशासक,आदर्श राज्यकर्त्या,राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!!
#अहिल्यादेवी

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
18/12/2021

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

मुस्लिम आक्रमकांनी केलेल्या विध्वंसानंतर काशी विश्वनाथ मंदिर आणि आजूबाजूच्या मंदिरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ...
13/12/2021

मुस्लिम आक्रमकांनी केलेल्या विध्वंसानंतर काशी विश्वनाथ मंदिर आणि आजूबाजूच्या मंदिरांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पुन्हबांधणी केली...
त्यानंतर आज तब्बल 250 वर्षांनी काशी विश्वनाथ मंदिराचे सौंदर्यकरण होतेय...
यावेळी या देशाच्या महान राणींना अभिवादन करणं हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे...
कारण त्यावेळी त्यांनी भारतातील अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण केले नसते तर कदाचित आज दिसत असलेली ही हिंदूंची धार्मिक स्थळे आज अस्तिवात नसती....!!!

बाबा काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या शिवलिंगधारी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.... 🙏

काशीच्या विश्वेश्वर मुक्ततेचे कार्य सुरू झाले...!!
श्री शिवछत्रपतीचे स्वप्न पुर्ण झाले...!!

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर🚩

आज ११ डिसेंबर. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा याच दिवशी १७६७ साली राज्याभिषेक झाला. आज या ऐतिहासिक राज्याभिष...
11/12/2021

आज ११ डिसेंबर. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा याच दिवशी १७६७ साली राज्याभिषेक झाला. आज या ऐतिहासिक राज्याभिषेकाला २५४ वर्ष पूर्ण होत आहेत.

राज्याभिषेक दिन सोहोळ्याच्या अनंत शुभेच्छा!🙏

Address

Near By Chakreshwar Talao, Umrale Road, Nallasopara (w), Tal-Vasai, Dist./Palghar
Nala Sopara
401203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मल्हार फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category