10/10/2022
*सर्वसामान्यांच्या सरकारच्या अजेंड्यावर जुन्या पेन्शनचा विषय..!*
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार..!
______________________________________
*सियाह रात नहीं लेती नाम ढलने का...*
*यही तो वक़्त है सूरज तेरे निकलने का...*
*सहकाऱ्यांनो नमस्कार..!*
जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर आपली संघटना सातत्याने काम करत आहे. प्रत्येक आंदोलनाचे, मेळाव्याचे, संपाचे, उपोषणाचे, भेटी-गाठींचे थोडक्यात काय तर या प्रश्नावरील प्रत्येक चळवळीचे आपण साक्षीदार आहात. त्याचं अध्यायात शुक्रवारी ( ७ ऑक्टोबर) घेतलेल्या बैठक व भेटीची भर पडली.
*अ) आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी साहेब यांच्या समवेत अधिकृत बैठक :*
नुकतीच दिल्लीत *युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब* यांच्याशी आपल्या टीमने सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा *खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब* यांच्या पुढाकाराने व सोबतीने मंत्रालयात मा. मुख्यमंत्री साहेब यांचे *अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी साहेब* यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चा करण्यात आली होती.
त्याच अनुषंगाने परवा शुक्रवार दि. ०७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात *वित्त सचिव व संबंधित अधिकारी* यांच्या समवेत *मा. गगराणी साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी विविध राज्यांनी लागू केलेल्या पेन्शन बाबत चर्चा झाली. राजस्थान, छत्तीसगड, झारखंड यांनी घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास देखील केला जाणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. तसेच केंद्राची धोरणे, समिती अहवालाची सद्यस्थिती बाबत या बैठकीला राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनील दुधे, राज्य प्रसिध्दी प्रमुख संतोष देशपांडे व मी ( प्राजक्त झावरे पाटील) उपस्थित होतो.
*ब) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांची भेट :*
सकाळच्या सकारात्मक बैठकीनंतर *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब* यांची देखील संघटनेकडून भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये संघटनेकडून जुन्या पेन्शन प्रश्नांबाबत शासन उचलत असलेल्या पाऊलांबाबत आनंद व्यक्त करण्यात आला, तसेच हा प्रश्न या सरकारच्या काळात सुटेल अशी आशा व्यक्त करण्यात आली..! आपण स्वतः हा प्रश्न सोडवून महाराष्ट्रातील अधिकारी / कर्मचारी यांच्या हृदयावर राज्य करावे, अशी अपेक्षा यावेळी संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.
*सहकाऱ्यांनो,*
लवकरच संघटनेचे अधिवेशन घेण्याचे नियोजित आहे. तसेच त्या पूर्वी सभासद नोंदणी उपक्रम देखील जोरदारपणें राबविणे आत्यंतिक आवश्यक आहे. चला तर मग सगळी मरगळ झटकून कामाला लागूयात..! करून दाखवूयात..!
*जीत लेंगे हम..!*
*कायम आपलाच*
श्री. प्राजक्त झावरे पाटील
राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना..!______________________________________
Dr Shrikant Eknath Shinde