Rachana Hospital & Research Centre

Rachana Hospital & Research Centre This is a private page

23/10/2022
I liked this factual post
23/10/2022

I liked this factual post

ड्रग्ज घेणारा- रोज रात्री पार्ट्यी झोडणारा- परदेशात जाऊन मजा मारणारा बिनडोक माणूस ५२व्या वर्षी एवढा तंदुरुस्त, एवढा तगडा, एवढा एनर्जेटिक, एवढा 'कुल' कसा असू शकतो?

नको त्या सवयी असणारा माणूस दररोज तीस किलोमीटर कसा चालू शकतो?
सलग दीड महिना असा माणूस रोज लोकांमध्ये कसा असू शकतो?
ना मेकअप, ना खोटारडेपणा. ना भपका, ना इमेज मॅनेजमेंट...
हा माणूस अखंड कसा चालतो आहे?
प्रेमाने कसा बोलतो आहे? तर्कशुद्ध संवाद कसा करतो आहे? सर्व वयाचे, सर्व स्तरातले लोक वेड्यासारखे त्याच्याभोवती गराडा का घालत आहेत?

एखादा सुखासीन, सरंजामी, आळशी, व्यसनी, निर्बुद्ध, क्रूर माणूस हे करू शकतो?

बाकी सोडा.
'कुजबुज कॅम्पेन' करून माणसांना बदनाम करण्याची, त्यांना आयुष्यातनं उठवण्याची, माणूसच्या माणूस मारून टाकण्याची ही पद्धत लक्षात घ्या.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सुरू असतं.
तुमच्या अवतीभवतीही सुरू असतं.
आपल्या नकळत आपणही त्यांच्या अजेंड्याचे बळी ठरतो.
अशी किती माणसं संपवली गेली असतील आजवर, त्याची गणती नाही. काही वाचली, पण खूप सारी संपून गेली.

तुमच्या-माझ्यासमोर असणा-या जिवंत माणसाचं जे असं करू शकतात, त्यांनी इतिहासाचं काय केलं असेल? सगळी क्षमता आणि सत्ता त्यांच्याच हातात होती, तेव्हा त्यांनी इतिहास किती विपर्यस्त रंगवला असेल! तेव्हा ना 'फॅक्ट चेक'ची सोय ना सामान्यांच्या हातात कोणती साधनं.

आज ते सद्दाम आणि उद्दाम रूपात मुद्दाम कोणाला रंगवू शकतात. 'बापू'ला बदनाम करणारे आजही कोणाचा 'पप्पू' करू शकतात!

तेव्हा तर काय काय झालं असेल?

असो.
ही पोस्ट कोणाच्या बाजूनं नाही.
असेलच तर, तुमच्या बाजूने आहे.
तुमचे डोळे उघडण्यासाठी आहे.

सगळ्या बाजूंनी कुजबुज करून, चुकीची माहिती सर्वदूर पसरवून, खोटे आभास करून, 'फोटोशॉप' करून जे निर्माण केलं जातंय, ते ओळखलं पाहिजे.
शिक्षण आणि माध्यमांवर पूर्वी ज्यांची अनभिषिक्त सत्ता होती, तेच आज या 'व्हाट्सॲप विद्यापीठा'चेही कुलपती आहेत.

म्हणून जागं झालं पाहिजे.
आपल्या धडावर आपलंच डोकं पाहिजे.
एवढंच.

© संजय आवटे.

- Sunjay Awate

Visit Rachana Hospital & Research Centre Butibori, now to experience a totally new renovated look & all departments incl...
28/10/2021

Visit Rachana Hospital & Research Centre Butibori, now to experience a totally new renovated look & all departments including Operation Theatre added with ultramodern equipment s like C arm , Latest Anasthesia machine & so on.

22/06/2021

In addition to computer operations, she has to work as Receptionists at the front desk at our Hospital

Address

P-26, MIDC Main Road, Butibori, Dist: Nagpur
Nagpur
441122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rachana Hospital & Research Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rachana Hospital & Research Centre:

Share