14/01/2025
१४ जानेवारी #दिनविशेष
विदर्भातील जुनी व मोठी साहित्य संस्था आणि अखिल भारतीय #मराठी साहित्य महामंडळाची घटकसंस्था असणाऱ्या "विदर्भ साहित्य संघा"ची स्थापना अण्णासाहेब खापर्डे यांनी १४ जानेवारी १९२३ रोजी #अमरावती येथे केली.‘विदर्भविषय: सारस्वतीजन्मभू:’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. मार्च १९५० मध्ये संस्थेचे मुख्य कार्यालय नागपुरला स्थलांतरित. #मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास हे या संस्थेचे ध्येय आहे. संस्था दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करते. या संस्थेचे #युगवाणी हे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे.
#विदर्भसाहित्यसंघ