दान पावलं हो- Daan Pawala Ho

दान पावलं हो- Daan Pawala Ho Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from दान पावलं हो- Daan Pawala Ho, Social service, Trimurti nagar, Nagpur.

दि.12/02/25 रोजी N.K.P. Salve Institute of Medical sciences & Research Centre and Lata Mangeshkar Hospital Nagpur (वानाड...
13/02/2025

दि.12/02/25 रोजी N.K.P. Salve Institute of Medical sciences & Research Centre and Lata Mangeshkar Hospital Nagpur (वानाडोंगरी) येथे आमचा दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित देहदान अवयवदान नेत्रदानावर आधारित जनजागृती पर भारुड दानं पावलं हो चा प्रयोग सादर झाला ,MBBS प्रथम वर्षाचे 200 विद्यार्थी म्हणजे भावी डॉक्टर कार्यक्रमाला उपस्थित होते
भावी डॉक्टरांनी कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला समजून घेतला कार्यक्रमाला hospital चे vice Dean डॉ.ठोंबरे anatomy विभाग प्रमुख डॉ. दिपाली ओमकार, डॉ.भरत ठाकरे ,डॉ. राजेश डेहनकर, आणि इतर डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम अतिशय छान पार पडला कार्यक्रमाला अभिप्राय देताना डॉ. ओमकार म्हणाल्या 🌺🌺🌺 कार्यक्रम सहज सोप्या भाषेत असल्यामुळे तो सामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडतो सामाजिक परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या कार्यक्रमात आहे 🌺🌺🌺
असे अभिप्राय मिळाले की वेगळीच उर्जा मिळते आपण योग्य वाटेने जात आहोत हा आनंद मिळतो धन्यवाद ओमकार मॅडम हा आमचा 93 वा कार्यक्रम होता
लवकरच 100 चा टप्पा गाठणार......
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शाळ, कॉलेज, योग वर्ग,जेष्ठ नागरिक मंडळ,मंदिर वृद्धाश्रम जे जिथे कार्यक्रमासाठी बोलावतील तिथे आम्ही जाऊन कार्यक्रम सादर करतो या कार्यक्रमात आम्ही शाळेतील आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांचा समाविष्ट करतो शाळा शाळा मध्ये हा कार्यक्रम सादर होऊन बालवयातच हे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले तर भावी पिढी नक्कीच या विषयावर विचार करेल असे आम्हाला वाटते
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

28 जून 2024 रेणूका मंदिर सेंट्रल एवेन्यू रोड नागपूर येथे  6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडे...
06/07/2024

28 जून 2024 रेणूका मंदिर सेंट्रल एवेन्यू रोड नागपूर येथे 6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान, अवयवदान,नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा दहावा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला 20 जेष्ठ नागरिक उपस्थित होते
15 जेष्ठ नागरिकांनी देहदानाचे फार्म भरून दिले

19 जून 2024 दुबे ले आऊट योगवर्ग  नागपूर येथे सकाळी  6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहय...
06/07/2024

19 जून 2024 दुबे ले आऊट योगवर्ग नागपूर येथे सकाळी 6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान, अवयवदान,नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला 32 जेष्ठ नागरिक उपस्थित होते
32जेष्ठ नागरिकांनी देहदानाचे फार्म भरून दिले योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख श्री सातपुते व श्री वामनराव बावनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले
कार्यक्रमात सहभागी सौ.अनघा वेखंडे,शोभि बावनकर, वनिता मुंगेलवार, संगीता शेंडे,श्री अरूण वेखंडे

दि. 19 एप्रिल 2024 गांधी नगर  कार्पोरेट कालनी नागपूर येथे  5.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंड...
06/07/2024

दि. 19 एप्रिल 2024 गांधी नगर कार्पोरेट कालनी नागपूर येथे 5.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान, अवयवदान,नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला 40 जेष्ठ नागरिक उपस्थित होते
40 जेष्ठ नागरिकांनी देहदानाचे फार्म भरून दिले
महीला मंडळी नी कार्यक्रमाचे औचित्य साधत चैत्र गौर हळदकुंकू कार्यक्रम माचे आयोजन केले होते त्यामुळे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महीला वर्ग उपस्थित होता
ठाकुर सरांनी विचार मांडले त्या हे कार्य अतिशय सुप्त असून काळाची गरज आहे ही चळवळ यशस्वी करण्यासाठी आवाहन केले

दान पावलं फाउंडेशननिर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान अवयवदान नेत्रदानावर आधारित भारुड दान पावलं दिनांक 12 एप...
01/07/2024

दान पावलं फाउंडेशननिर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान अवयवदान नेत्रदानावर आधारित भारुड दान पावलं दिनांक 12 एप्रिल 2024 ला नागपूर मध्यवर्ती कारागृह मध्ये सादर झाला या कार्यक्रमाला 300 बंदीवान उपस्थित होते

दान पावलं फाउंडेशन निर्मित दीपस्वी फाउंडेशन सहयोगीत बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईजअसोसिएशन धंतोली नागपूर येथे 24 मार्च 2024...
26/06/2024

दान पावलं फाउंडेशन निर्मित दीपस्वी फाउंडेशन सहयोगीत बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईजअसोसिएशन धंतोली नागपूर येथे 24 मार्च 2024 ला देहदान अवयव दान नेत्रदानावर आधारित जनजागृती पर भारुड दान पावल हो चे सादरीकरण झालं

12 मार्च 2024 नागपूर दूरदर्शन ने सह्याद्री वाहिनीसाठी आमचा दान पावलं हो फाउंडेशन निर्मित दिपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत...
26/06/2024

12 मार्च 2024 नागपूर दूरदर्शन ने सह्याद्री वाहिनीसाठी आमचा दान पावलं हो फाउंडेशन निर्मित दिपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत नेत्रदान अवयवदान देहदानावर आधारित भारुड दान पावलं हो या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी कार्यक्रम घेतला मोल देहदानाचे या शीर्षकांतर्गत.....
शूटिंग नागपूरला झालं पण प्रसारण सह्याद्री वाहिनी मुंबईवरून झालं धन्यवाद पाठराबे मॅडम धन्यवाद सह्याद्री वाहिनी...

आज शनिवार दि. 10 मार्च 2024 महालक्ष्मी मंदिर योगवर्ग मनीष नगर नागपूर येथे सकाळी  6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मि...
26/06/2024

आज शनिवार दि. 10 मार्च 2024 महालक्ष्मी मंदिर योगवर्ग मनीष नगर नागपूर येथे सकाळी 6.30वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान, अवयवदान,नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा दहावा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला 35 जेष्ठ नागरिक उपस्थित होते
35जेष्ठ नागरिकांनी देहदानाचे फार्म भरून दिले योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख श्री किशोर वरंभे, श्री लांबे काका सह 35 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप करतांना एडवोकेट नंदिनी थेटे यांनी विशेषत्वाने असे मत मांडले की नेत्रदान अवयव दान देह दानावर आधारित दान पावलं भारुडांच्या सादरी करणं इतक प्रभावी होत की देहदान अवयवदान नेत्रदान करण्यासाठी आम्ही संभ्रमित होतो एक प्रकारची आमच्या मनात भीती होती या भारुडाच्या सादरीकरणातनं ती भीती नष्ट झाली आम्ही देहदान अवयवदान नेत्रदान करण्यासाठी फार्म भरणार आहोत श्री किशोर वरंबे श्री लांबे काका एडवोकेट नंदिनी थेटे ताई यासह कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे खूप खूप आभारी आहे

7 मार्च 2024 चंद्रपूरला रोटरी क्लब तर्फे चंद्रपूरच्या आजाद गार्डन मध्ये दान पावलं हो फाउंडेशन निर्मित दीपस्वी युनिटी फाउ...
26/06/2024

7 मार्च 2024 चंद्रपूरला रोटरी क्लब तर्फे चंद्रपूरच्या आजाद गार्डन मध्ये दान पावलं हो फाउंडेशन निर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगी नेत्रदान अवयव दान देह दान या कार्यक्रमाचे सादरीकरण सकाळी साडेसहा वाजता सुरू झाले आठ वाजता कार्यक्रम संपला कार्यक्रमाला साडेचारशे ते पाचशे लोक उपस्थित होते कार्यक्रम अतिशय छान झाला योग वर्गात आलेले सर्व योगी कार्यक्रमात सहभागी झाले लोकांच्या असे प्रतिक्रिया होते की आमच्या मनात अवयव दाना बद्दलची धास्ती किंवा भीती होती ती तुमच्या या कार्यक्रमातन नाहीशी झाली. आता आम्ही अवयव दान देहदान नेत्रदान करायला तयार आहोत धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी कलाकार सौ अनघा अरुण वेखंडे, सौ नीलिमा शिरीष देशपांडे, सौ शोभा वामनराव बावनकर, सौ वैशाली वासुदेव चरपे, सौ वनिता मुंगेलवार,रेखा भारद्वाज,वैशाली जोशी श्री अरुण वेखंडे,
सौ अबोली कुलकर्णी सहभागी होते

01/03/2024

आज गुरुवार दि. 28 फेब्रुवारी 2024 ला आजी-आजोबा पार्क दीनदयाल नगर (स्वावलंबी नगर)
नागपूर येथील जेष्ठ नागरिक मंडळ येथे दुपारी 4 वाजता दानं पावलं हो फाउंडेशन निर्मित,दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान, अवयवदान,नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा नववा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला 45 जेष्ठ नागरिक उपस्थित होते
40 जेष्ठ नागरिकांनी देहदानाचे फार्म भरून दिले
जेष्ठ नागरिक मंडळाच्या प्रमुख ज्योती ताई शेंबेकर यांनी विदेश सहकार्य केलं कार्यक्रमाचा समारोप करतांना जेष्ठ नागरिकांनी

आनंद या जीवनाचा,सुगंधा परी दरवळावा

हे गीत गाऊन आणि विचार व्यक्त करू कार्यक्रमाची पावती दिली..

आज दि.27 फेब्रुवारी 2024 ला सायं. 7 वाजता श्री निकेतन कला वाणिज्य महाविद्यालय तुळशीबाग रोड नागपूर द्वारा  राष्ट्रीय सेवा...
01/03/2024

आज दि.27 फेब्रुवारी 2024 ला सायं. 7 वाजता श्री निकेतन कला वाणिज्य महाविद्यालय तुळशीबाग रोड नागपूर द्वारा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उमरेड रोड चांपा गावांमध्ये पंचायत समिती उमरेड ,पंचायत भवन परसोडी जिल्हा नागपूर येथे शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात दान पावलं हो फाउंडेशन निर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन सहयोगीत देहदान अवयवदान नेत्रदानावर आधारित भारूड “दान पावलं हो “चा आठवा प्रयोग संपन्न झाला प्रयोगाला श्रीनिकेतन कला वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि गावातले प्रतिष्ठित व्यक्ती गट ग्रामपंचायत सदस्य गावाचे सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला जवळपास 30 लोकांनी देहदानाचे फॉर्म भरून दिले
कार्यक्रमाचा समारोप करताना कार्यक्रम अधिकारी यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली आणि अशा जनजागृती पर कार्यक्रमाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले आणि आमच्या या समाज कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या
सर्वांचे खूप खूप धन्यवाद

दानं पावलं हो ची वृत्तपत्रांनी घेतलेली दखलं
25/02/2024

दानं पावलं हो ची वृत्तपत्रांनी घेतलेली दखलं

Address

Trimurti Nagar
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दान पावलं हो- Daan Pawala Ho posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category