15/09/2025
प्रेस नोट
नागपूर :
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी स्वाभिमान बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर द्वारा संचालित ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने साहित्य वितरण शिबिराचे आयोजन योगी अरविंद नगर आदर्श नवदुर्गा बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या समाज भवनात करण्यात आले.
या शिबिरामध्ये सुमारे 146 ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला. लाभार्थ्यांना व्हीलचेअर, वॉकर आदी रुग्णोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
शिबिराला भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर अध्यक्ष श्री. दयाशंकरजी तिवारी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक श्री. अभिषेकजी मिश्रा विशेष उपस्थित राहून लाभार्थ्यांचे मनोबल वाढविले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. जीवनजी तायवाडे, सचिव श्री. अतुल बावणे, उपाध्यक्ष श्री. राजूजी साळवे, तसेच इतर पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते श्री. पवनजी किरपाने व प्रज्वल मंगल गौतम सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई खानोरकर यांच्या सक्रिय प्रयत्नामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.