साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन

  • Home
  • India
  • Nagpur
  • साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन This page is

मंदिरात गेला मांगहिंदुंनी फेडले त्याचे पांगब्राम्हणांचा दुधभाऊ तरी,कैसी तोडली रे त्याची टांग! मारुतीचा वंशज सांगतोतो विष...
15/09/2025

मंदिरात गेला मांग

हिंदुंनी फेडले त्याचे पांग

ब्राम्हणांचा दुधभाऊ तरी,

कैसी तोडली रे त्याची टांग!



मारुतीचा वंशज सांगतो

तो विष्णू,दास कुणाचा

तोऱ्यात मिरवतो,हिंदू म्हणोनी

मग आहे त्रास कुणाचा

हिंदू आहे,आता छाती ठोकून सांग!

मंदिरात गेला मांग.......



गणेश बैसला,घरी लक्ष्मी जेवली

आलेल्यांसमोर ऐसी शेखी मिरवली

पंचपक्वानांची पंगत मांडोनी

महापुरुषांची तू,मस्त जिरवली

सत्यनारायण उरकोनी,वामनां दिले दान!

तरी मंदिरात गेला मांग......



तू अंत्यंज आहे या चिखलातला

तरी मांगा तू बहकतोस रे कसा

तुझ्या स्पर्शाने बाटतो तो काळतोंड्या अजूनही

त्या गटारी लोळण्या जातो रे कसा

सोड पीने आता तरी,ही धर्माची भांग!

मंदिरात गेला मांग.......



शोषणाचा झेंडा,तू खांद्यावर मिरवणे

नित्य दिसे हे दृश्य

जातींच्या घोळक्यात शिरतां

तू बाटकां अस्पृश्य

वाघाचा वारसा,उशाखाली पोसला सर्प जबराण!

मंदिरात गेला मांग.....


सांगुनी गेलेत लोकशाहीर बात ताकदीची

धर्म हिंदुंचा, मुक्ती देत नाही

तो माणसांना माणुस मानत नाही

मी त्याला धर्मचं मानत नाही

बापाला सोडून तू इतरांना देतो रे मान!

म्हणोनी मंदिरात गेला मांग....



तुझ्याचं साठी ज्योती झिजला

सावित्री अंगावर आजही शेण झेलती

भीमरायाने महाल बांधला

वस्तादाची तलवार आजही तळपती

बनविण्या तुला पट्टीचा रे पैलवान!

मंदिरात कशाला हवा रे मांग

विकासाच्या व्दारी दिसू दे रे तुझी रांग!


*“राहि”*

ब्राम्हणी-कळमेश्वर-नागपूर

*८८०५९१७९२१*

*दि.०५ सप्टेंबर २०२५ ला नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातील आसेगावातील मारुती मंदिरात शिरूर गावातील रहिवासी प्रकाश टिकेकर आणि त्यांच्या मुलीला मंदिरात पूजा केल्यामुळे मारहाण केल्याच्या निषेधार्थ दोन शब्द!*

23/07/2025

तिकडचा गुजराती बनिया मुंबईत येऊन सोन्या-चांदीचा व्यापार करतो,मोटारी उडवितो आणि आम्ही इथं एकमेकांची डोकं उडवितो.
-लो.अण्णा भाऊ साठे

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज माझ्या "चल माणूस होऊया"(कवितासंग्रह) या पुस्तकाचे प...
04/08/2024

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज माझ्या "चल माणूस होऊया"(कवितासंग्रह) या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जन्मभूमी वाटेगाव येथे बार्टी संस्था आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली मा.ना.सुरेश भाऊ खाडे साहेब, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मा.राजरत्न आंबेडकर साहेब, आमदार सदाभाऊ खोत साहेब, आमच्या तालुक्याचे धडाकेबाज नेतृत्व आदरणीय निशिकांतदादा भोसले पाटील साहेब, आमदार सुमनताई पाटील, आदरणीय सावित्रीमाई साठे, जि.म.बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, मा.सचिन भाऊ साठे, सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी तृप्ती धोडमिसे, मा.सत्यजित भाऊ देशमुख साहेब, मा.सम्राट बाबा महाडिक साहेब, वाटेगावच्या लोकनियुक्त सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, राहुल दादा पाटील, प्रा.डॉ.मोहन लोंढे सर, प्रा.डॉ.सुकुमार आवळे सर, प्रा.सुकुमार कांबळे सर, हेमंत मुळीक, बार्टी संस्थेचे अधिकारी या सर्व मान्यवरांच्या तसेच महाराष्ट्रातील तमाम डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या उपस्थित अगदी उत्साहात पार पडला.

आपलाच
लेखक/कवी~सुरज साठे
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे
जन्मभूमी वाटेगाव
9370626619

Suresh Khade
Rajratna Ambedkar
Sadabhau Khot
Nishikant Patil
Samrat Mahadik
Satyajit Deshmukh

मर्दानी खेळ दांडपट्टा जोपासणारेमहान कलावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे..!!                              सुरज साठे वाटेगाव____...
22/07/2024

मर्दानी खेळ दांडपट्टा जोपासणारे
महान कलावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे..!!
सुरज साठे वाटेगाव
___________________________________
महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं मर्दानी खेळाच वरदान म्हणजे दांडपट्टा. अन् महाराष्ट्रातील कलेच वरदान म्हणजे हलगीवादन अन् या खेळाचे अन् कलेचे जादूगर म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे होते.

अण्णाभाऊंचा मुंबई ते वाटेगाव आणि वाटेगाव ते मुंबई हा प्रवास सारखा सुरूच असायचा अण्णाभाऊ दोन तीन महिन्यातून एकदा तरी वाटेगावला यायचेच आणि मुंबईला जाताना अनेक जिवंत कथा कादंबरीचे विषय घेऊन जायचे. पण ज्यावेळेला अण्णाभाऊ वाटेगावला यायचे त्यावेळी ते कधीच शांत बसत नव्हते सतत भटकत होते निरीक्षण करत होते आपले निरनिराळे छंद जोपासत होते. एकवेळ अण्णाभाऊ वाटेगावला आले होते त्यावेळी ते आणि त्यांचे काही सवंगडी मिरची तोडायला शेतात गेले होते. अण्णाभाऊंचे सवंगडी मिरच्या तोडत होते. पण अण्णाभाऊंना त्यावेळी हलगी वाजवण्याचा छंद जडला होता. आणि अण्णाभाऊ त्या शेतात मिरच्या तोडतच त्या मिरचीच्या झाडासोबत धा धा गीड गीड, ता ता गीड गीड हा एक हलगीचा बोल आहे. तो बोल अण्णाभाऊ वाजवत होते. त्यावर मिरच्या तोडणारे त्यांचे सवंगडी काय वाजतय म्हणून इकड तिकड बावरायला लागले नंतर त्यांचे लक्ष अण्णाभाऊंकडे गेले. त्यातला एक सवंगडी अण्णाभाऊंना म्हणाला --- अहो अण्णा आपण हिथ मिरच्या तोडायला आलोय आणि तुम्ही हलगीचा ठेका धरलाय. अण्णाभाऊंना एखाद्या गोष्टीचा नाद जडला की अण्णाभाऊ तात्पुरत सगळ काही विसरून त्याच नादात रमत होते. अण्णाभाऊंनी आपल जीवन कलेला बहाल केलं होत. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा फार छंद होता. आणि त्या शिकलेल्या गोष्टींमध्ये अण्णाभाऊ एकदम तरबेज होऊन जायचे.

पारंपारीक लेझिम दांडपट्टा या मर्दानी खेळाला नवजीवन देणारे अण्णाभाऊ साठे :-
महानायक वीर फकिरा राणोजी यांच्यापासून वाटेगावला दांडपट्टा या मर्दानी खेळाचा वारसा लाभला. परंतु फकिराच्या अटकेनंतर तो दांडपट्टा वाटेगावातून लुप्त झाला. व नंतर अण्णाभाऊ साठे यांनी त्या दांडपट्ट्याची माहिती घेऊन. ती दांडपट्ट्याची पारंपारिक कला जोपासली व या दांडट्ट्याच्या कलेला अण्णाभाऊंनी नवजीवन दिले.

अण्णाभाऊ आणि दांडपट्टा :-
अण्णाभाऊ साठे दांडपट्टा या खेळाचे वस्तादच होते. त्यांच्या खेळण्यात हरणासारखी चपळता होती. त्यातला एक फार सुंदर किस्सा म्हणजे अण्णाभाऊ, शंकर भाऊ आणि त्यांचे सवंगडी वारणेला दांडपट्टा खेळण्यासाठी गेले होते. वारणा गावातील ग्रामस्थ आणि गावचा पाटील पारावर बसून खेळ बघत होते. अण्णाभाऊ साठे हे मोठे हलगीसम्राट होते महाराष्ट्रात त्यांच्या हलगीला तोड नव्हती. खेळ रंगात आला होता. अण्णाभाऊंची हलगी वीज कडाडल्यासारखी कडकडत होती. अण्णाभाऊंनी हलगी वाजवत वाजवत हलगी वर फेकली आणि धोतराचा सोगा वर न खवता तशीच अण्णाभाऊंनी हवेत मागची उडी मारली. अण्णाभाऊंनी उडी मारल्याबरोबर त्या गावचा पाटील ताडकन उठला अन् म्हणाला माझ्या डोळ्याची पापणी लवस्तर ह्या माणसानं पाखरासारख अस काय केलं ते मला परत करून दाखवा.
अशी अण्णाभाऊं कडे पाखरासारखी चपळता होती. अजून एका कलेत अण्णाभाऊ फार पारंगत होते ती कला सहसा वाटेगावकरांशिवाय कोणालाच जमली नाही ती कला म्हणजे "अण्णाभाऊ दांडपट्ट्याची फेक करत असताना तोंडात दोरा आणि चार गोल मनी घेऊन दांडपट्ट्याची फेक करत अन् दांडपट्ट्याची फेक करतच तोंडातील ते मनी तोंडातली तोंडात जिभेने दोऱ्यात ओवत होते." असे एक ना अनेक आविष्कार अण्णाभाऊ साकारत असत.

अशीच अजून एक जिवंत कला जी कला अण्णाभाऊ आणि वाटेगावकरांशिवाय आजतागायत कोणालाही जमलेली नाही अन् खर बघायला गेलं तर अण्णाभाऊच त्या कलेचे शिल्पकार होते. ती कला म्हणजे एका मातीच्या मडक्यात पाणी भरून त्यात मासा सोडायचा अन् ते मडक कशाचा तरी आधार घेऊन नजरेच्या बरोबर समोर बांधायचं बांधायचं (दहीहंडी सारखं) व दांडपट्ट्याची फेक करत त्या दांडपट्ट्याने त्या मडक्यातील माशाच धड वेगळ करायचं अन् त्याचे दोन तुकडे करायचे. आजपर्यंत जगात कितीतरी महान योद्धे होऊन पण अशी कला आणि कौशल्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठे यांच्याकडेच होते.
अण्णाभाऊंनी हा दांडपट्ट्याचा खेळ आपल्या सवंगड्यांना देखील शिकवत होते ते ही या खेळात पटाईत होते.
त्यातील अण्णाभाऊंचे धाकटे बंधू शाहीर शंकर भाऊ हे हलगी वाजविण्यात फार तरबेज होते. टाटापुरी हलगी वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. दांडपट्टा खेळत असताना एक सहकारी डोक्यावर हाताने गोफण मिठी मारत होता अन् त्यातून शंकर भाऊ सशा सारखे उडी मारून निघून जात होते. अशी चपळता त्यांच्याकडे होती.
अण्णाभाऊंचे सवंगडी मारुती साठे हे दांडपट्टा खेळत असताना २० फूट उभ्या भिंतीवर सरळ कशाचा ही आधार न घेता वर चढत होते व तेथून उलटी उडी मारत होते पाखरासारखे चातुर्य त्यांच्या अंगात होते.
त्यामध्ये तुकाराम साठे हे देखील दांडपट्टा खेळातील मागची उडी, वलन उडी व दांडपट्ट्याच्या फेकीत फार तरबेज होते. दांडपट्ट्याची फेक करत असताना चार दिशेला चार तवे ठेऊन चौकोन करायचे अन् पायाला वस्तारा बांधून दांडपट्ट्याची फेक करत त्या तव्यात उडी मारत खेळायचे तवा हुकवायचा नाही.
अजून अलीकडच्या काळातील एक दोन तीन मानस त्यांच नाव अन् त्यांची कला या ठिकाणी आवरजून मांडण हे फार गरजेचं आहे. शिवा बाळू साठे अन् भिवा बळी साठे हे दोघेजण अलीकडच्या काळातील अतिशय चपळ अन् जबरदस्त खेळाडू म्हणून आज ही लोक त्यांची ख्याती गातात. या दोघांजवळील कला देखील तितकीच काळजाचा ठाव चुकवणारी होती. ती कला म्हणजे एका ओळीत प्रचंड मोठे असे सात बैल उभा करायचे अन् हातात दांडपट्टा घेऊन पळत येऊन त्या सात बैलांवरून वाघझ्याप मारून पलिकड जाऊन दांडपट्ट्याची फेक ते करत होते. त्यांच्यासारखी अद्भुत कला अन् कलाकार ना भूतो ना भविष्यती कोणी होणार नाही. तसेच शामु बंडू अन् लहू नाना साठे यांसारखे हलगीसम्राट जगपटलावरती कोणी होणार नाहीत भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लहू नाना साठे यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकली होती. या महान माणसांची हलगी नुसती वाजत नव्हती तर बोलत होती.

अण्णाभाऊंनी महानायक वीर फकिरांच्या नंतर वाटेगावातून नामशेष झालेली मर्दानी खेळ दांडपट्ट्याची कला पुन्हा जिवंत केली अन् आपल्या वाटेगावतील सर्व सवंगड्यांना दांडपट्टा शिकवून त्यांना या खेळात तरबेज बनवले होते. अन् आजदेखील अण्णाभाऊंच्या या मर्दानी खेळाचा वारसा वाटेगावकर अगदी दिमाखात अन् उत्साहात जोपासत आहे. कला ही रक्तात असावी लागते हे काय खोटं नाही अन् ही कला वाटेगावकरांच्या रक्तात भिनवण्याच महान कार्य हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे.
आज देखील या मर्दानी खेळाची परंपरा आम्ही वाटेगावकर जोपासत आहोत याचा अभिमान वाटतो.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महान कलावंताला अन् त्यांच्या कलेला मनाचा सलाम..!!

लेखक/कवी~सुरज साठे
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे
जन्मभूमी वाटेगाव
9370626619

07/07/2024

मुलाखत नक्की पहा..!!

जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून आपला गौरवशाली इतिहास सर्वदूर पोहोचेल..!!

धन्यवाद..!!

लेखक/कवी - सुरज साठे, वाटेगावकर
9370626619

*परभणी* शहरातील मांग समाजातील प्रसिद्ध व्यावसायिक *डाॅ.अनिल कांबळे* यांची अप्सरागणिक सौंदर्य लाभलेली कन्या *अबोली कांबळे...
23/10/2023

*परभणी* शहरातील मांग समाजातील प्रसिद्ध व्यावसायिक *डाॅ.अनिल कांबळे* यांची अप्सरागणिक सौंदर्य लाभलेली कन्या *अबोली कांबळे * या मातंग मुलीने नुकत्याच गुडगाव येथे पार पडलेली *Miss Queen of the World,India,2023* ही स्पर्धा जिंकून महाराष्ट्राच्या,समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.अबोली आणि तिच्या पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन.......
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
https://thegreatpageantcommunity.com/2023/10/21/queen-of-the-world-india-2023-bigger-better-grander/

मानवमुक्तीचा दाता           अण्णाभाऊ माझा..!!लेखक~सुरज साठे, वाटेगाव               9370626619लेख नक्की वाचा. व जास्तीत ज...
18/07/2023

मानवमुक्तीचा दाता
अण्णाभाऊ माझा..!!

लेखक~सुरज साठे, वाटेगाव
9370626619

लेख नक्की वाचा. व जास्तीत जास्त शेअर करा....

धन्यवाद..!!

11/05/2023
काही मातंग बांधवांच्या संस्थेमार्फत (जी आरएसएस भाजपच्या विचारसरणीस बांधील आहे) माजी राज्यपाल कोशारी साहेब यांच्या मार्फत...
29/03/2023

काही मातंग बांधवांच्या संस्थेमार्फत (जी आरएसएस भाजपच्या विचारसरणीस बांधील आहे) माजी राज्यपाल कोशारी साहेब यांच्या मार्फत विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना पुरस्कार वाटले गेले.. लाभार्थ्यांनी सुद्धा खूप आनंदाने मिरवले...
लाभार्थ्यांनो!हीच ती वेळ आहे, आपल्या मालकाचे ऋण फेडायची...
आरएसएस चे पोस्टर बॉय सावरकर खतरेमे है...
बोला की तुम्ही पण.... आम्हीं सारे.....

*मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील- श्री.एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री*लहुजी शक्ती सेना आयोजित आझाद मैदान...
27/03/2023

*मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील- श्री.एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री*
लहुजी शक्ती सेना आयोजित आझाद मैदान येथील मोर्चाची सरकारकडून दखल घेण्यात आली
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण क्रांती मोटार सायकल रॅली सबंध महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा जिल्ह्यातून तालुक्यातून मुंबई आझाद मैदान येथे दिनांक-24-03-2023 रोजी या आरक्षण क्रांती मोटरसायकल रॅलीचे महामोर्चात रूपांतर झाले या मोर्चात राज्यातील मातंग समाज खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मातंग समाजाच्या मागण्या संदर्भात लहुजी शक्ती सेना यावेळी प्रचंड आक्रमक झाली होती. *दिनांक 24 मार्च 2023 रोजी मोर्चा संपल्यानंतर दिनांक 25 मार्च 2023 रोजी मा.मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री दालनामध्ये संबंधित समितीच्या उपस्थितीत मातंग समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली. त्यानंतर लहुजी शक्ती सेनेचा शिष्ट मंडळ यामध्ये प्रामुख्याने सचिनभाऊ क्षीरसागर,युवक प्रदेशाध्यक्ष लहुजी शक्ती सेना बालाजीभाऊ गायकवाड,राज्य कार्यकारिणी सदस्य,बाळू भाऊ जाधव मुंबई प्रदेश लहुजी शक्ती सेना,भारतीताई कांबळे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते. सदरील शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मा.श्री. सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळर यांची भेट घेऊन मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्नांबाबत मिक्सर चर्चा केली माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एका महिन्याच्या आत संबंधित समित्यांना अहवाल मागून घेण्यासाठी सांगितले बार्टीच्या संचालक यांना बार्टीचा अहवाल सुद्धा पाठवण्यास सांगितला येणाऱ्या एका महिन्याच्या आत मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिले.*

Address

��
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य, विचार आणि परिवर्तन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category