30/06/2023
बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोमात , मनपा आरोग्य विभाग कोमात !!!!!
२६. ११.२०२१ पासून अपर आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली ९ तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत करूनही आजवर एकाही बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या दोन वर्षात कारवाई नाही- समिती बरखास्त करण्याची एनसीपी अर्बन सेलची मागणी . 🙏
बोगस डॉक्टरांनी अनेकदा चुकीचे उपचार केल्यामुळे रुग्णांच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आहे ,काही वेळा रुग्णांना कायमचे अपंगत्व येते तर रुग्णांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायीकांना हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी २६. ११.२०२१ पासून अपर आयुक्त यांचा अध्यक्षतेखाली ९ तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली तरीही आजवर एकाही बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर या दोन वर्षात एकही कारवाई नाही हि निष्क्रियता असून महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कवडीचाही गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या निष्क्रिय समितीला बरखास्त करून नवीन समिती गठीत करावी , अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत,अचानक तपासणीची धडक मोहीम राबवावी हि मागणी एन सी पी अर्बनसेल द्वारे मनपा चे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांना करण्यात आली आणि धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.