Dhammadip Lokhande

Dhammadip Lokhande अन्यायाचा मनू तुम्ही कितीही पसरवा
आमच्यातला #छत्रपती आणि #आंबेडकर कायम न्यायासाठी लढत राहील💙👑जयभीम!

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!   #शिवाजी_महाराज
03/04/2026

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

#शिवाजी_महाराज

सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी आणि नैतिक उत्थानासाठी असावा, असा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या सम्राट अशोकांना विनम्र अ...
26/03/2026

सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी आणि नैतिक उत्थानासाठी असावा, असा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन!

मानवासोबतच मुक्या प्राण्यांसाठीही दवाखाने उघडणारे, रस्ते, विहिरी आणि वृक्षारोपणासारखी लोक कल्याणकारी कामे करणारे ते पहिले ‘कल्याणकारी राजा’ होते. भारताच्या तिरंग्यावरील ‘अशोक चक्र’ हे त्यांच्याच गतिशील आणि न्यायपूर्ण विचारांचे प्रतीक आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रगतशील आणि न्यायप्रिय विचारांना उजाळा देऊया.

शांती, अहिंसा आणि मानवकल्याणाचा जयघोष करणाऱ्या सम्राट अशोक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


23 मार्च रोजी नागपुर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षासोबत एक संयुक्त मोर्चा आयोजित केला...
19/03/2026

23 मार्च रोजी नागपुर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षासोबत एक संयुक्त मोर्चा आयोजित केला आहे.

हा मोर्चा देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा मोर्चा आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम देशावर होत आहे.

आरएसएसच्या मुख्यालयावर नागपूर येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सामील व्हावे.

:इंजि. धम्मदीप लोखंडे , महासचिव , नागपूर शहर , वंचित बहुजन आघाडी

🗓 23 मार्च 2026
📍 आरएसएस मुख्यालय, नागपुर

ुख्यालय_पर_संयुक्त_मोर्चा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना श...
10/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. एवढंच नाही तर अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी महत्वाचं काम केले. त्या समाजसुधारक, समाजशिक्षिका तर होत्याच, पण कवयत्रीही होत्या. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन..!

सुख-दु:ख काही। स्वार्थपणा नाही,
परहित पाही। तोच थोर!!

- सावित्रीबाई फुले

#सावित्रीबाईफुले

सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!जागतिक महिला दिन हा स्त्रीच्या सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा आणि समानतेच्या ...
08/03/2026

सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक महिला दिन हा स्त्रीच्या सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा आणि समानतेच्या लढ्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने नवे इतिहास घडवले आहेत. शिक्षण, प्रशासन, विज्ञान, कला, राजकारण आणि सामाजिक परिवर्तन या सर्व क्षेत्रांत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडत महिलांना शिक्षण, हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांमुळे महिलांच्या हक्कांसाठी मजबूत कायदे आणि सामाजिक जागृती निर्माण झाली. या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी स्त्रियांच्या समानतेचा, सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा संकल्प करूया. शिक्षण, स्वातंत्र्य आणि संधी यामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक महिलेला प्रगतीची समान संधी मिळावी, यासाठी कोणताही भेदाभेद न करता स्त्री, पुरुष, पारलिंगी या सर्वांसोबत समान पातळीवर वर्तन आणि व्यवहार करावा असा आग्रह धरूया... स्त्री मुक्ती म्हणजेच समाजाची खरी प्रगती आहे. त्यामुळे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक_महिला_दिन ’sDay

#महिला
#दिन

05/02/2026

UGC नियमावली कायद्याच्या समर्थानार्थ SC ST OBC विद्यार्थ्यांचे आंदोलन
#उच्च_शिक्षणातील_जातिगत_भेदभाव_संपवा

UGC Equity Regulation 2026 च्या समर्थनार्थ नागपुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन; तरुण नेतृत्व पुढे
नागपूर
UGC Equity Regulation 2026 च्या समर्थनार्थ ऑल इंडिया SC, ST, OBC विद्यार्थी संघटनांच्या वतीने नागपूर येथे जोरदार आंदोलन व निवेदन सादर करण्यात आले. उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव, अन्याय आणि मानसिक छळाविरोधात हा लढा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाचे नेतृत्व अनिकेत कुत्तरमारे, अथांग करोडे, त्रिशरण सहारे, #धम्मदीप_लोखंडे, सिद्धार्थ बंसोड आणि श्रेयश डोंगरे यांनी केले. या तरुण नेतृत्वाने प्रशासनासमोर विद्यार्थ्यांच्या समस्या ठामपणे मांडत UGC Equity Regulation 2026 त्वरित अंमलात आणण्याची मागणी केली.
नेत्यांनी सांगितले की, भारतीय संविधान वास्तव समानतेचा पुरस्कार करते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वंचित घटकांना संरक्षण देणे ही राज्याची जबाबदारी आहे. मात्र आजही अनेक उच्च शिक्षण संस्थांमध्ये SC, ST, OBC विद्यार्थ्यांना जातीय अपमान, भेदभाव आणि अन्याय सहन करावा लागत आहे.
UGC Equity Regulation 2026 मुळे सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये Equity Cell आणि Anti-Discrimination Cell सक्तीचे होतील तसेच जातीय अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये Zero Tolerance Policy अंतर्गत कठोर कारवाई होईल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून, संविधान, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे स्पष्ट करत सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जय भीम | जय संविधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ‘प्रबुद्ध भारत’ हे केवळ एक पाक्षिक नसून, शोषित-वंचित समाजाच्या संघर्षाची वैचारिक ध...
04/02/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले ‘प्रबुद्ध भारत’ हे केवळ एक पाक्षिक नसून, शोषित-वंचित समाजाच्या संघर्षाची वैचारिक धार आहे. सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि विवेकनिष्ठ राजकारण यांची दिशा दाखवणारे हे मुखपत्र आजही आंबेडकरी चळवळीचा मजबूत वैचारिक आधारस्तंभ आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेवर उभे राहून समाजपरिवर्तनाची लढाई लढणाऱ्यासाठी प्रबुद्ध भारतने नेहमीच वैचारिक स्पष्टता आणि निर्भीड भूमिका दिली आहे. मनुवादी, जातीय आणि अन्यायकारक व्यवस्थेविरोधातील संघर्षात या मुखपत्राने कायमच जनतेचा आवाज बुलंद केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा ठाम विश्वास आहे की, राजकीय परिवर्तन हे वैचारिक परिवर्तनाशिवाय शक्य नाही. म्हणूनच प्रबुद्ध भारतसारखी वैचारिक साधने अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे.

या वर्धापन दिनानिमित्त, बाबासाहेबांच्या वैचारिक चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी, संविधानिक मूल्यांची लढाई मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या घराघरात आंबेडकरी विचार पोहोचवण्यासाठी प्रबुद्ध भारतला बळ देण्याचे काम फुले-शाहू-आंबेडकवाद्यांनी करावे.

प्रबुद्ध भारतच्या संपूर्ण टीम, वर्गणीदार, वाचक, देणगीदार आणि हितचिंतकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

#प्रबुद्ध_भारत

03/02/2026

मालची कुही येथील दलीत बोरकर कुटुंबावर अत्याचार प्रकरणी
आंबेडकरी जनता व वंचित बहुजन आघाडीचा जातीयवादी सरपंच व प्रशासना विरोधात 🔥 कुही तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा #ऐल्गार
बोरकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे! 💙🤍✊

#संत_रविदास_महाराज

संत शिरोममणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन     #संत_रविदास_महाराज
01/02/2026

संत शिरोममणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#संत_रविदास_महाराज

01/02/2026

आंबेडकरी जनता व वंचित बहुजन आघाडीचा जातीयवादी सरपंच व प्रशासना विरोधात 🔥 कुही तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा #ऐल्गार

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला 26 जानेवारी 1950 दिलेल्या संविधानातून केवळ लोकशाहीची रचन...
26/01/2026

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला 26 जानेवारी 1950 दिलेल्या संविधानातून केवळ लोकशाहीची रचना नाही, तर तिचा आत्मा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणली. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सवाचा नाही, तर आत्मचिंतनाचा दिवस आहे. आपण आपल्या अधिकारांसोबत कर्तव्ये निभावतो का, लोकशाही जगतो का, आणि अन्यायाविरोधात उभे राहतो का याचा विचार करण्याचा दिवस. संविधान हे सर्व नागरिकांचे संरक्षणकवच आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा खरा सन्मान म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात उतरवणे.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

#26जानेवारी #प्रजासत्ताक_दिन

13/01/2026

काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे
आम्ही नवीन नेता नाही तर नवा विचार आहोत , आमचं धैर्य फक्त सत्ता नाही तर परिवर्तन आहे...

नागपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026
प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार

इंजि. धम्मदीप ईश्वर लोखंडे - गट अ - अनुसूचित जाती
सौ. ममता नंदेश्वर रामटेके (उईके) - गट ब - अनुसूचित जमाती

यांच्या गॅस सिलेंडर या चुनाव चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा....

#वंचित #बहुजन #आघाडी #राजकारण

Address

Kamptee Road Nagpur
Nagpur
440026

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhammadip Lokhande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhammadip Lokhande:

Share