Wanadongari Municipal Council

Wanadongari Municipal Council Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wanadongari Municipal Council, Government Organization, Wanadongari, Nagpur.

14/04/2026
वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक – १ व २ येथील मतदारांना   कळविण्यात येते कि, भारत निवडणुक आयोगामार्फत मत...
08/04/2026

वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक – १ व २ येथील मतदारांना कळविण्यात येते कि, भारत निवडणुक आयोगामार्फत मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण कालमर्यादित कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मतदार यादी शुद्धीकरणाकरिता प्रभाग क्रमांक १ व २ मधील मतदारांचे मतदार म्हणून SIR मॅपिंग करण्यासाठी उद्या, दिनांक- ०९/०४/२०२६ रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत माँ दुर्गा नगर येथील समाजभवन येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करिता प्रभाग क्रमांक १ व २ येथील मतदारांनी सदर शिबिरास उपस्थित राहून आपले SIR मॅपिंग करून घ्यावी, हि विनंती..

स्थळ :- प्रभाग क्रमांक – १ , श्री. दादाराव मुडे नगरसेवक यांच्या घराजवळील माँ
दुर्गा नगर येथील समाजभवन.

वेळ :- उद्या दिनांक ०९/०४/२०२६ रोजी सकाळी ९ ते १२

          #स्वच्छभारत #स्वच्छभारतअभियान #माझीवसुंधरा   #जनजागृती             #स्वच्छभारत
31/03/2026






#स्वच्छभारत
#स्वच्छभारतअभियान
#माझीवसुंधरा


#जनजागृती












#स्वच्छभारत






वानाडोंगरी ‘वेस्ट टू वंडर’ उपक्रमातून शून्य कचरा वॉर्ड कडे वाटचाल स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “शून्य कचरा वॉर्ड” साकार करण्...
30/03/2026

वानाडोंगरी ‘वेस्ट टू वंडर’ उपक्रमातून शून्य कचरा वॉर्ड कडे वाटचाल
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत “शून्य कचरा वॉर्ड” साकार करण्यासाठी वानाडोंगरी येथील मंगलमूर्ती कॉलनी, बावडे लेआउट (वॉर्ड ११) येथे “वेस्ट टू वंडर” हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. RRR (Reduce, Reuse, Recycle) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून कचऱ्याचा पुनर्वापर करून कलात्मक व उपयुक्त वस्तू तयार करण्याचा उत्कृष्ट प्रयत्न नागरिकांनी केला.
नगरपरिषद वानाडोंगरी, फीडबॅक फाउंडेशन आणि गोदरेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी श्रा. राहुल परिहार, स्वच्छता निरीक्षक विनय व्यास, शहर समन्वयक आचल चव्हाण तसेच इतर अधिकारी आणि फीडबॅक फाउंडेशनच्या सविता गजभिये आणि टीमने उपक्रमाला भेट देऊन पाहणी केली.
भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ साहित्य निर्मिती तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर याबाबत प्रात्यक्षिके सादर केली. कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी नागरिकांनी घेतलेली पुढाकार उल्लेखनीय ठरली.
या उपक्रमासाठी गणेशराव खोकरे, कृष्णाजी डवरे, धनराज धोंडे, कसनदास चव्हाण, रमेश वैद्य, यादवराव जयपूरकर आणि जयश्री भदाडे यांनी विशेष पुढाकार घेतला.
नागरिकांच्या उत्साही सहभागाचे कौतुक करत माननीय मुख्याधिकारी यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. “वेस्ट टू आर्ट, रोड ब्युटीफिकेशन” ही संकल्पना परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरत असून वानाडोंगरीला नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे. तसेच अशा प्रकारचे उपक्रम संपूर्ण वॉर्डमध्ये राबविण्याचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.





#स्वच्छभारत
#स्वच्छभारतअभियान
#माझीवसुंधरा


#जनजागृती












#स्वच्छभारत






स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत Solid Waste Management संदर्भातील चर्चासत्र दिनांक: १८ मे २०२५स्वच्छ भारत मिशन २.० तसेच Sol...
18/03/2026

स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत Solid Waste Management संदर्भातील चर्चासत्र
दिनांक: १८ मे २०२५
स्वच्छ भारत मिशन २.० तसेच Solid Waste Management अंतर्गत बालाजी समृद्धी अपार्टमेंट येथे दिनांक १८ ममार्च २०२6 रोजी एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सदर चर्चासत्र सोसायटीचे अध्यक्ष श्री. व्यंकट रमण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
सोसायटीला शून्य कचरा (Zero Waste) व आत्मनिर्भर तसेच Bulk Waste Generator म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या चर्चासत्राचा प्रमुख उद्देश होता.
सदर चर्चासत्रामध्ये खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
कचरा वर्गीकरण (ओला व सुका कचरा)
सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंध
ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती (Composting)
सॅनिटरी वेस्ट डिस्पोजल
हानिकारक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट
वरील सर्व उपक्रम राबविण्यासाठी सोसायटीतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहमती दर्शविली.
सदर चर्चासत्रामुळे सोसायटीमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, सोसायटीला आत्मनिर्भर व शून्य कचरा मॉडेल म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.





#स्वच्छभारत
#स्वच्छभारतअभियान
#माझीवसुंधरा


#जनजागृती












#स्वच्छभारत






वानाडोंगरी नगरपरिषद आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस स्वच्छता चॅम्पियन स्वच्छता कर्मचारी महिला कर्मचारी यांचे सत्कार करण्...
16/03/2026

वानाडोंगरी नगरपरिषद आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस स्वच्छता चॅम्पियन स्वच्छता कर्मचारी महिला कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आला महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत पण स्वच्छतेमध्ये महिला दिवसाच्या औचित्य साधून महिला कर्मचाऱ्यांचे माननीय नगराध्यक्ष सुनंदा ताई बागडे, उपाध्यक्ष चंदाताई अजमिरे व सर्व नगरसेविका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वच्छ समाज घडवण्यासाठी नारी नेतृत्व ही एक मोठी ताकद आहे. महिला घरात आणि समाजात स्वच्छतेच्या सवयी रुजवतात आणि लोकांना जागरूक करतात.

जर महिला पुढे येऊन नेतृत्व करतील, तर आपला समाज आणि शहर दोन्ही स्वच्छ आणि निरोगी बनू शकतात.

चला आपण सगळे मिळून संकल्प करूया —
स्वच्छता स्वीकारूया आणि समाज पुढे नेऊया.

25/01/2026

नगर परिषद वानाडोंगरी यांच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सादर आमंत्रण.

मा. श्रीमती सुनंदाताई चरणदास बागडे, नगराध्यक्ष, न. प. वानडोंगरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे

दिनांक: 26 जानेवारी 2026 सकाळी 08:20 वाजता

स्थळ: कार्यालय नगर परिषद वानाडोंगरी

Address

Wanadongari
Nagpur
441110

Telephone

+917385390704

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wanadongari Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share