नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

  • Home
  • India
  • Mumbai
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प The aim of the project is to enhance climate-resilience & profitability of smallholder farming system

महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येतो. हा हवामान अनुकूल शेती प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील हवामान बदलाची झळ बसलेल्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान-अनुकूलता वाढवणे आणि अल्प जमीन धारणा असलेल्यांचा नफा वाढवणे हा ना.दे.कृ.सं. प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रकल्पात समाविष्ट जिल्हे- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना

, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका. या जिल्ह्यांतील एकूण समाविष्ट निवडक गावे ५२२०. This is official page of the Maharashtra Project on Climate Resilient Agriculture- Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp.

16/05/2026

"हवामान अनुकूल तंत्रज्ञान पुस्तिका घडवतेय कृषी क्रांती"- श्री.कोळेकर .
बदलत्या हवामानासोबत जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अवलंब करावयाचे तंत्रज्ञान व त्या तंत्रांची सखोल माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने तयार केलेली "हवामान अनुकूल तंत्रज्ञान" ही माहिती पुस्तिका. याबद्दल अधिक माहिती देत आहेत कृषी विद्यावेत्ता तथा मृदा विज्ञान तज्ञ श्री विजय कोळेकर ...

07/05/2026

CRT मोहिमेला स्पर्धात्मक स्वरूप | शेतकऱ्यांसाठी मोठी संधी.! | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प...
अभिनंदन! अभिनंदन! सर्वांचे अभिनंदन!!🌱😌🌱
प्रकल्प जिल्हा, उपविभाग आणि गाव स्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, GKVS सदस्य आणि कृषीताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!! *🌱🌱💐🤓💐🌱🌱

आपण हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रुंद वरंबा (बेड) तयार करणे आणि टोकन पद्धतीने लागवड विषयी *दि. 20 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान प्रकल्पातील 313524 शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 6000 गावामध्ये 10054 प्रत्यक्षिकांचे यशस्वी आयोजन केलेले आहे 😱🫡!.
हे सर्व यश तुमच्या सर्वांच्या मेहनत व सहभागामुळे प्राप्त झाले आहे 🌱😌🌱

आता आपल्याला दुसऱ्या टप्प्यात दि. 4 ते 9 मे 2026 च्या बीज उगवण क्षमता, बीज प्रक्रिया प्रत्यक्षिके आणि सापळा पिकांच्या जनजागृती* कार्यक्रमद्वारे पुन्हा प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी, शेतकरी गट, माहिला बचत गट यांचे पर्यंत हवामान अनुकूल तंत्रज्ञान पोहोचवायचे आहे✌️*. याकरिता सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌱🤗🌱
चला तयार आहात ना मग

तसेच मा. प्रकल्प संचालक यांचे संकल्पनेतून क्षेत्रीय स्तरावर हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) या मोहिमेला स्पर्धात्मक स्वरूप देणार आहोत😱.
याकरिता आपण सर्वांनी या स्पर्धेत हिरारीने सहभागी व्हावे👍 आणि प्रकल्पतील प्रत्येक शेतकऱ्यांना या CRT पद्धतीचा अवलंब करण्यास 100% प्रोत्साहित करावे.🌱🤓🌱

यास्पर्धेतील यशस्वी समूह सहाय्यक आणि शेतकरी गट यांचा सन्मान मा. मंत्री (कृषि), मा. कार्यकारी अध्यक्ष (NDKSP), मा. सचिव (कृषि), मा. प्रकल्प संचालक (PMU, NDKSP) यांचे हस्ते मुंबई याठिकाणी होईल.🌱💐🌱

चला तर मग आपण सर्व मिळून ही मोहीम यशस्वी करूयात आणि शेतकरी आणि गावांना हवामान अनुकूल व समृद्ध बनवूयात! TEAM NDKSP, PMU

01/05/2026

Rural Development: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) टप्पा क्रमांक दोनमध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १३२ गावांमध...

बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.."जुळवून घेऊ ब...
01/05/2026

बहु असोत सुंदर संपन्न की महा... प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..

"जुळवून घेऊ बदलत्या हवामानाशी, मैत्री करूया नवनवीन तंत्राशी"

24/04/2026

🌱 20 ते 30 एप्रिल दरम्यान कमीत कमी मशागत साठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत जनजागृती व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे! 🚜
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन दिले जात आहे. 💧
कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कमीत कमी मशागत कशी उपयुक्त आहे हे जाणून घेण्याची ही उत्तम संधी! 🌾
चला, शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे टाकूया!

हवामान बदलाला सामोरे जाणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महत्...
23/04/2026

हवामान बदलाला सामोरे जाणे आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. संवर्धित शेतीला चालना देण्यासाठी IISS भोपाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांसाठी संशोधन सुरू होणार असून यासाठी मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला आहे.. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका मिनल करणवाल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणि, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, प्रकल्पाचे कृषिविद्या तथा मृदाविज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर, प्रकल्प अधिकारी स्मिता कणसे, अरुण जाधव व इतर उपस्थित होते.

🌱 “वृक्षच आहेत हरित वसुंधरेचा प्राण,करू त्यांचे संवर्धन, राखू पर्यावरणाची शान.” 🌱आपली वसुंधरा हीच आपली खरी संपत्ती आहे. ...
22/04/2026

🌱 “वृक्षच आहेत हरित वसुंधरेचा प्राण,
करू त्यांचे संवर्धन, राखू पर्यावरणाची शान.” 🌱
आपली वसुंधरा हीच आपली खरी संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला तर मग —
✅ जास्तीत जास्त वृक्ष लागवड करूया
✅ पाणी वाचवूया
✅ प्लास्टिकचा वापर कमी करूया
✅ स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण करूया
“आपली वसुंधरा, आपली जबाबदारी!” 🌿
CRT अभियानातून आपण एकत्र येऊन भूमातेचे आरोग्य जपूया आणि पुढील पिढीसाठी सुंदर, स्वच्छ आणि हिरवीगार पृथ्वी निर्माण करूया 🌏💚

21/04/2026

श्रीम.मिनल करनवाल,प्रकल्प संचालक.ना.दे.कृ.सं प्रकल्प यांनी CRT अभियानाबद्दल केले शेतकऱ्यांना आवाहन...

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो! 🌾🌾हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भात (तांदूळ) पिकाची अधिक उत्पादनक्षम आणि कमी खर्चिक शेती क...
20/04/2026

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो! 🌾🌾

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भात (तांदूळ) पिकाची अधिक उत्पादनक्षम आणि कमी खर्चिक शेती करण्यासाठी एक उत्तम संधी तुमच्यासाठी!

📢 ‘डिजिटल शेतीशाळा’ – सत्र ४
📅 दिनांक: २२ एप्रिल २०२६ (बुधवार)
⏰ वेळ: सायंकाळी ७:३० वाजता

या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत (भात पिकासाठी):
🌾 भाताची थेट पेरणी (DSR) पद्धत
🌾 श्री (SRI) पद्धत
🌾 टोकण पद्धत
🌾 भात लागवडीसाठी यांत्रिकी पद्धत

👨‍🌾 सर्व भात उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, FPO’s, SHG’s व कृषीप्रेमींनी आवर्जून सहभागी व्हा!

📍 स्थळ: आपल्या गावातच, मोबाईलवरून (ऑनलाईन)
📲 QR कोड स्कॅन करून लगेच सहभागी व्हा

👉 अधिक माहितीसाठी आपल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा.

आजच सहभागी व्हा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती अधिक फायदेशीर बनवा! 🌱🌾

18/04/2026

Parimal Singh appointed Agriculture Secretary: राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये दहा टक्क्यांहून अधिक वाटा उचलणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये सध्या स.....

Address

30 A/B Arcade, World Trade Center, Cuffe Parade
Mumbai
400005

Alerts

Be the first to know and let us send you an email when नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प:

Share