Me Bhavsar

Directions

Me Bhavsar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Me Bhavsar, Social service, B/4, New Samadhan Dattaguru CHS SB Road Dadar Mumbai, Mumbai.

Yogesh Subhash Khemkar
Mumbai | Social Worker | Public Representative |
� Voice of the Common Man | Helping Hands for the Needy
� Connect with me for support, guidance, and social impact.

🏢 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा!मुंबईतील उपकरप्राप्त जुन्या इमारतींचे मालक, भाडेकरू आणि रहिवासी यांच्...
24/10/2026

🏢 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा!

मुंबईतील उपकरप्राप्त जुन्या इमारतींचे मालक, भाडेकरू आणि रहिवासी यांच्यात समन्वय नसल्यामुळे अनेक पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

📌 २० जुलैच्या कायदा दुरुस्तीनंतर इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या अधिकारांची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी रहिवाशांच्या जीविताची व सुरक्षिततेची कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यामुळे जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास वेगाने होऊन मुंबईतील नागरिकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि कायमस्वरूपी पुनर्वसन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

📢 मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा!

ही मागणी भारतीय जनता पार्टी, मुंबई – झोपडपट्टी मोर्चाचे महामंत्री योगेश सुभाष खेमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

📰 लोकमत – २४ ऑक्टोबर २०२६

#मुंबई #जुन्याइमारती #पुनर्विकास #धोकादायकइमारती #पुनर्वसन #रहिवाशांचीसुरक्षितता

🏠 मुंबईच्या पुनर्वसनाचा ‘महासंवाद’!मुंबईतल्या झोपडपट्ट्या कधी संपणार?आपल्या हक्काच्या घराचा प्रश्न — थेट प्रशासनाशी संवा...
23/10/2026

🏠 मुंबईच्या पुनर्वसनाचा ‘महासंवाद’!

मुंबईतल्या झोपडपट्ट्या कधी संपणार?

आपल्या हक्काच्या घराचा प्रश्न — थेट प्रशासनाशी संवाद!

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन, रखडलेले प्रकल्प, पुनर्वसन सदनिका, पात्रता, गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न, विकासकांशी संबंधित अडचणी आणि झोपडीधारकांच्या हक्कांबाबत थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी!

📢 TIME महाराष्ट्र प्रस्तुत – महासंवाद

या विशेष कार्यक्रमात झोपडीधारक, SRA गृहनिर्माण संस्था, रहिवासी संघटना, सामाजिक संस्था, नागरिक आणि पुनर्वसनाशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

🎙️ प्रमुख उपस्थिती

डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS)
मुख्य कार्यकारी अधिकारी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA)

📅 दिनांक: ३ नोव्हेंबर २०२६
🕓 वेळ: सायं. ४:०० वा.
📍 स्थळ: रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई

❓ तुमचा प्रश्न काय आहे?
🏠 हक्काच्या पुनर्वसन घराचा प्रश्न?
🏗️ रखडलेल्या SRA प्रकल्पाचा प्रश्न?
📄 पात्रता व कागदपत्रांचा प्रश्न?
🏢 गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न?
👨‍👩‍👧‍👦 पुनर्वसन प्रक्रियेबाबत संभ्रम?

तुमचा प्रश्न घेऊन या… उत्तर शोधण्यासाठी थेट संवाद साधा!

🤝 हा महासंवाद केवळ कार्यक्रम नाही; मुंबईतील पुनर्वसनाशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

👉 मुंबईतील सर्व झोपडीधारक, SRA गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, रहिवासी संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

📲 नोंदणी / अधिक माहितीसाठी QR Code स्कॅन करा:
https://qr2.me-qr.com/e6193ut3

🔄 हा संदेश जास्तीत जास्त झोपडीधारक आणि संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचवा.

#झोपडपट्टीपुनर्वसन #मुंबईपुनर्वसन #झोपडीधारक #पुनर्वसन #महासंवाद

21/10/2026
परळ येथील उड्डाण पूलाला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज उड्डाण पूल असे नांव आहे. पण हे बहुतेक नागरिकांना माहितच नव्हते का...
21/10/2026

परळ येथील उड्डाण पूलाला श्री संत शिरोमणी नामदेव महाराज उड्डाण पूल असे नांव आहे. पण हे बहुतेक नागरिकांना माहितच नव्हते कारण कुठेही सहज वाचता येईल असा बोर्ड नव्हता. त्याकरिता श्री योगेश खेमकर यांनी भावसार समाज विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून चार ते पाच वर्षे मुंबई महानगर पालिकेकडे पाठ पुरावा केला. त्या प्रयत्नांना यश मिळाले व आता पुलाच्या दोन्ही दर्शनी भागात सर्वांना सहज वाचता येईल असे नामदेव महाराजांचे नांव रंगवून घेतला. त्याकरिता योगेश खेमकर यांचे अभिनंदन.
जय भावसार मी भावसार

15/10/2026
29/09/2026

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ गिरगाव चौपाटी विसर्जन सोहळा 2026

29/09/2026

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ ,गिरगाव चौपाटी 2026

28/09/2026
🇮🇳 भारताचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत एक अविस्मरणीय सोनेरी क्षण! 🙏✨
09/09/2026

🇮🇳 भारताचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत एक अविस्मरणीय सोनेरी क्षण! 🙏✨

Address

B/4, New Samadhan Dattaguru CHS SB Road Dadar Mumbai
Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Me Bhavsar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category