काही तरी कर मुंबईकर

काही तरी कर मुंबईकर काही तरी कर मुंबईकर ✊
Digital Civic Awareness Platform
राजकीय घडामोडी | मुंबईचा इतिहास
माहिती • विश्लेषण • जबाबदारी
DM for collaboration
📍Mumbai

30/04/2026

माणसाने समुद्रासारखं असावं - भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, तरीही अथांग.

💙✨💙

जगभरात सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ActionAid या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींशी आज संव...
06/03/2026

जगभरात सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ActionAid या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींशी आज संवाद साधण्याची संधी मिळाली.

मुंबई शहरात महिला सक्षमीकरण, कामगार हक्क, शिक्षण, शहरी गरिबी, तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करताना येणाऱ्या आव्हानांवर आणि त्यावरच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, संधी आणि सन्मान पोहोचवण्यासाठी विविध संस्था, कार्यकर्ते आणि धोरणकर्ते एकत्र येऊन काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित झाली. अशा संवादातून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने नवे विचार आणि सहकार्याची दारे उघडतात.

टिप: ८ मार्च रोजी पहिला episode inside story marathi youtube channel वर upload करण्यात येणार आहे.

UrbanIssues HumanRights SocialWork GrassrootsChange MumbaiCity DevelopmentDialogue

नगरिकांच्या आरोग्यासाठी ‘फिट मुंबई’’उपक्रमशहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या ...
26/02/2026

नगरिकांच्या आरोग्यासाठी ‘फिट मुंबई’’उपक्रम

शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये फिट मुंबई हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.






MumbaiFitness
FitIndia
HealthForAll
NagrikanchyaAarogyasathi
MumbaiUpdates
MumbaiNews
ActiveMumbai
YogaDayEveryday
RunForHealth
CycleForHealth
MumbaiCity
PublicHealth
HealthyLifestyle
MumbaiLocal
KahiTarKarMumbaikar

मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरू होणार; प्रवाशांना मोठा दिलासामुंबई आणि नाशिक दरम्यान लवकरच लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची ...
25/02/2026

मुंबई ते नाशिक लोकल सेवा सुरू होणार; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई आणि नाशिक दरम्यान लवकरच लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दररोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नियमित आणि स्वस्त पर्यायाची मागणी सातत्याने केली जात होती.

नवीन लोकल सेवेच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः कल्याण, कसारा, इगतपुरी या भागातील प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक, फेऱ्या आणि भाडे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

#मुंबईनाशिकलोकल
#प्रवाशांनादिलासा
#रेल्वेबातमी

#लोकलसेवा
MaharashtraNews

18/02/2026

मुंबई: मुंबईतील मानखुर्द-चेंबूर (अणुशक्ती नगर) परिसरात वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलकडून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या मालवाहू गाड्या आणि डंपर चालकांकडून अनधिकृतपणे पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, याचे थेट चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?
मानखुर्द आणि चेंबूरला जोडणाऱ्या अणुशक्ती नगर परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची आणि डंपरची ये-जा असते. या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वाहन चालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याची तक्रार वारंवार येत होती.
या अनधिकृत वसुलीचा पर्दाफाश करण्यासाठी युनूस शेख (विभागाध्यक्ष, भाजप ट्रान्सपोर्ट सेल) यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी व्हिडिओ स्वतः चित्रित केला आहे, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी मालवाहू गाड्यांच्या चालकांशी आर्थिक देवाणघेवाण करताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराचा 'ऑन कॅमेरा' पुरावा
युनूस शेख यांनी काढलेल्या या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. "सामान्य वाहन चालकांना आणि ट्रान्सपोर्टर्सना नाहक त्रास देऊन अशा प्रकारे पैशांची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे आहे," असे शेख यांनी यावेळी नमूद केले.. काही तरी कर मुंबईकर



#काहीतरीकरमुंबईकर

03/07/2025

"काही तरी कर मुंबईकर" ही मोहिम म्हणजे मुंबई शहरातील वाढत्या नागरी समस्या आणि त्यावरील युवकांचा सक्रिय सहभाग हाच या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असूनही येथे अनेक सामाजिक, पर्यावरणीय आणि नागरी अडचणींचा सामना करावा लागतो — जसे की कचऱ्याचे व्यवस्थापन, ट्रॅफिक जाम, पाणीटंचाई, अस्वच्छता, झोपडपट्ट्यांमधील परिस्थिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधांची कमतरता आणि महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न. या पार्श्वभूमीवर, "काही तरी कर मुंबईकर" ही मोहीम युवकांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेचा उद्देश फक्त तक्रार न करता समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाय शोधणे आणि ‘स्वतः बदल व्हा’ या तत्त्वानुसार कृतीशील नेतृत्व उभे करणे हा आहे. या अभियानातून एक सकारात्मक संदेश दिला जातो — की "आपले शहर आपली जबाबदारी", आणि मुंबईच्या भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने काहीतरी सकारात्मक पाऊल उचललेच पाहिजे.

या मोहिमेच्या माध्यमातून युवकांनी एक नवीन आशावाद निर्माण केला असून मुंबईतील बदलाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला आहे. कारण, बदल फक्त बोलण्याने नव्हे, तर कृतीने घडतो — आणि तोच "काही तरी कर मुंबईकर" या मोहिमेचा खरा पाया आहे.

टीप : तुमच्या विभागातील समस्यांचे फोटो तुम्ही आम्हाला आमच्या INBOX मध्ये पाठू शकता आणि आपणास या अभियानाचा भाग होण्याची इच्छा असल्यास आम्हाला तुमचा नंबर INBOX मध्ये SEND करा

#काहीतरीकरमुंबईकर
#आपलेंसहरआपलीजबाबदारी







Address

Chembur
Mumbai
400071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काही तरी कर मुंबईकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category