MNS Adhikrut

MNS Adhikrut महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम.
(4)

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Maharashtra Navnirman Sena is committed to raising the status of Maharashtra State, its people and the Marathi language to resplendent glory.

23/08/2026
मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याचा तपशील..!महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी अभियान व कॉलेज युनि...
23/08/2026

मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याचा तपशील..!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी अभियान व कॉलेज युनिट उद्घाटन.

सोमवार, दिनांक २४.८.२०२६

📍 छत्रपती संभाजीनगर

श्री. राजीव जावळीकर
९६७३९०१११६

1️⃣ सकाळी ११.३० वा.

वसंतराव नाईक महाविद्यालय, सिडको, छ. संभाजीनगर
(छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा)
(युनिट उद्घाटन)

2️⃣ दुपारी १२.३० वा.

हायटेक महाविद्यालय, बजाजनगर, छ. संभाजीनगर
(छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा)

3️⃣ दुपारी ०१.३० वा.

सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगपुरा, छ. संभाजीनगर
(छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा)

4️⃣ दुपारी ०२.०० वा.

एमजीएम कॅम्पस - जे.एन.ई.सी. इंजिनिअरिंग महाविद्यालय, सिडको, छ. संभाजीनगर
(छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा)

22/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते श्री. गजानन काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे बेताल प्रवक्ते नवनाथ बन यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा उत्तम समाचार घेतला.

21/08/2026

साठे कॉलेज, मुंबई येथे नोंदणी केंद्रावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी एबीव्हीपीच्या काही कार्यकर्त्यांनी उपस्थित मुलींना खेचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी योग्य तो प्रसाद दिला.

या घटनेनंतर साठे कॉलेजचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते अमित राजसाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंज या पक्ष कार्यालयात आले. यावेळी अमित राजसाहेब ठाकरे यांनी, “मुलींवर हात टाकणारे मार खाणारच! तुम्ही जे केलं ते योग्यच केलं,” असे स्पष्ट सांगत कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

एबीव्हीपी ज्या पक्षाशी संबंधित आहे, त्या पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा एबीव्हीपीने आपली ताकद आणि वेळ शाळा-महाविद्यालयांमधील समस्या सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वापरायला हवी, अशी भूमिका मा. अमित राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी मांडली.

सत्ताधाऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन, पैसे फेकून, सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवता येते पण सत्ता स्वतःच्या फायद्या पलीकडे...
21/08/2026

सत्ताधाऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन, पैसे फेकून, सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवता येते पण सत्ता स्वतःच्या फायद्या पलीकडे जाऊन, लोकांच्या हितासाठी राबवता येत नाही. आजच्या वर्तमानपत्रांतल्या या चार प्रतिनिधीक बातम्या. पुणे-ठाणे-नाशिक-नवी मुंबई इथे लोकं खड्ड्यांनी बेजार आहेत, जीव गमावत आहेत आणि सत्ताधारी ज्यांची जबाबदारी चांगले रस्ते देण्याची आहे, ते प्रशासनावर खापर फोडत आहेत. सत्ता राबवता येत नाही तर तिचा अट्टहास का ?

21/08/2026

पुणे शहराच्या बेसुमार वाढीबद्दल नियोजन शून्यत्ते बद्दल केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी बोलले. अर्थात त्यांचा पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना हे शहर अधिक घसरत गेलं हे सोयीस्करपणे विसरलं गेलं. पण पुण्याची जी अवस्था झाली आहे त्याबद्दल राजसाहेब गेली अनेक वर्ष किंवा दशकं म्हणलं तरी चालेल पोटतिडकीने बोलत आहेत. अशी आस्था असणाऱ्या व्यक्तीच्या हाती जेंव्हा या शहराची, राज्याची सत्ता येईल तेंव्हाच हे चित्र बदलेल. अन्यथा सत्ताधारी कायम पुणेकरांच्या दुःखावर फुंकर घालण्या ऐवजी मीठ चोळत राहणार.


21/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील केळकर कॉलेज (मुलुंड विधानसभा), श्रीराम कॉलेज (भांडुप विधानसभा), विकास कॉलेज ( विक्रोळी विधानसभा) राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज (घाटकोपर प. विधानसभा), सोमय्या कॉलेज (घाटकोपर पूर्व विधानसभा) आणि नारायण गुरु कॉलेज ( छ. शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा) येथे विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियान २०२६ तसेच महाविद्यालयीन युनिटचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

चमकोगिरीसाठी रुग्णांच्या आयुष्याशी खेळ!शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी सुरक्षित साधनांचा वापर न करता रुग्ण...
20/08/2026

चमकोगिरीसाठी रुग्णांच्या आयुष्याशी खेळ!

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी सुरक्षित साधनांचा वापर न करता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडिओ कॉल केला. अशी जाहिरातबाजी करताना एकदाही सामान्य रुग्णांच्या जीवाची चिंता मंत्री महोदयांना वाटली नाही का? सध्याच्या सरकार मध्ये संवेदनशीलतेचा अभाव आहे , हे दिसून येते.

Address

Maharashtra NavNirman Sena, 2nd Floor, Matoshri Towers, Padmabai Thakkar Marg, Shivaji Park, Mahim
Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share