05/03/2021
दोन पक्षी आहेत.! त्याबद्दल जरा सांगतो आज.! आणि हिंदूंना त्या दोन पक्ष्यांच्या बद्दलची जी माहिती आहे, त्यावरून खूप काही शिकण्यासारखं आहे.!
पक्षी क्रमांक एक : #डोडो.!
हा डोडो नावाचा पक्षी मॉरिशस आणि हिंदमहासागराच्या बाकी काही द्विपांवर बऱ्याच वर्षांपूर्वी सापडत होता.! तिथे त्यावेळी मनुष्यवस्ती बिलकुल नव्हती.!
हे डोडो तिथे आरामात रहायचे.! कारण त्या द्विपांवर त्यांची शिकार करणारे दुसरे कोणीच नव्हते.! त्यामुळे हळू हळू हा डोडो पक्षी आत्मरक्षा करणे आणि शत्रूवर आक्रमण करणे, हे अजिबात विसरून गेला.! नंतरच्या त्याच्या पिढ्यांना तर एकच उद्योग होता.! खाणे, पिणे, रिकामचोट फिरणे, आणि झोपणे.! बास.!
त्यांना जोरात पळाव लागत नव्हत.! कुणा शत्रूचा पाठलाग करावा लागत नव्हता, पंख असूनसुद्धा, क्षमता असूनसुद्धा उडण्याची आवश्यकताच पडत नव्हती.! त्यामुळे त्यांच्या पायाची हाडं ही हळू हळू दुबळी होत गेली.! आणि फक्त त्यांच्या गब्दुल शरीराचा भार संभाळण्याइतपतच त्यांच्या पायात जोर राहिला.!
सोळाव्या शतकाच्या सुरवातीला मॉरिशस मध्ये डच लोकांनी पहिले पाऊल ठेवले.! त्यांनी ह्या डोडोला बघितलं आणि प्रचंड आश्चर्यात पडले.! कारण खूप सहजगत्या ह्या पक्ष्याला ते पकडू शकत होते.! मग डच लोकांनी ह्या डोडोची शिकार करायला सुरुवात केली.!
ह्या डच लोकांनी त्यांच्यासोबत त्यांचे कुत्रे पण आणले होते.! आणि खूप सारे उंदीर ह्या डचांचे सोबती म्हणून त्या बेटावर गेले होते.! ह्या कुत्र्यांनी पण ह्या डोडोची शिकार करायला सुरुवात केली.! उंदीर डोडोची अंडी खाऊन टाकायचे.!
तरीपण हा डोडो पक्षी कधीच स्वतःच किंवा त्याच्या अंड्यांचं संरक्षण करायचा नाही.! कारण पिढ्यानपिढ्या त्याला आक्रमकतेची आवश्यकताच पडली नव्हती.! तो जीव वाचवून जोरात पळून जाणे किंवा हल्ला करणे हे साफ विसरूनच गेला होता.!
परिणाम असा झाला की सन १७१० पर्यन्त ह्या पृथ्वीतलावरून डोडो नामक पक्ष्याची प्रजाती संपूर्णपणे विलुप्त झाली.! आता ह्या पक्षाच्या दोन प्रतिकृती पेंढा भरून ठेवण्यात आल्या आहेत.! एक आहे ब्रिटनच्या रॉयल म्युझियम मध्ये आणि दुसरी आहे मॉरिशस युनिव्हर्सिटी मध्ये.!
आता पक्षी क्रमांक दोन : #केसोवरी.!
हे केसोवरी साहेब ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी ह्या प्रदेशात म्हणजे प्रशांत महासागर आणि कॅरेबियन समुद्र ह्यांच्यामधल्या अनेक बेटांवर वस्तीला असतात.! हा पक्षी शहामृग, इमू आणि डोडो ह्यांच्याच प्रजातीमधला आहे.!
ह्याला सुद्धा डोडोसारख्याच परिस्थितीमध्ये जगावं लागलं.! ह्यांची पण शिकार करणारे प्राणी होते, अगदी मनुष्यप्राण्यासकट.!
पण ह्यांच्या प्रत्येक पिढीने आलेल्या अनुभवांवरून स्वतःमध्ये प्रचंड आक्रमकता, संताप, अत्यंत धोकादायक हत्यार विकसित करून घेतले.! मनुष्य किंवा बाकी दुसरे प्राणी बघितल्यावर हा पक्षी फक्त स्वतःच संरक्षण करतो.! ती विचारधारणा त्याने त्याच्यात विकसित करून घेतलीये.!
आज परिस्थिती अशी आहे की ह्या पक्ष्याने मनुष्याला बघितलं की त्या मनुष्याच्या आयुष्याची दोरीच तुटली म्हणून समजा.! कारण हा त्या माणसाला पळवू पळवू त्याच्या पंजाने फाडून मारतो.! हा केसोवरी तशी ५० किलोमीटर वेगाने पळू शकतो.! ह्याच्या पंजाची नख ही ८ इंच लांब असतात आणि चांगली धारदार असतात.!
ह्यांनी अजून एका बाबतीत नैपुण्य मिळवलंय.! हे शत्रूवर झुंडीने आणि नियोजनपूर्वक हल्ला करतात.! ब्रिटीशांनी ह्या प्रदेशावर कबजा केला, तेंव्हा ते ह्यांची शिकार बंदुकीने करायचे, तेंव्हा दुसरीकडून ह्यांची एक झुंड त्या बंदूकधारी शिकाऱयांवर हल्ला चढवायची.!
आज परिस्थती अशी आहे की ह्या प्रदेशातल्या ज्या जंगलात ह्यांची वस्ती आहे, वावर आहे, तिथे धोक्याची सूचना देणारे मोठे मोठे फलक लावलेले आहेत.! कारण मनुष्याला बघितलं की हे पक्षी अनावर होऊन हल्लाच करतात.!
केसोवरी ही प्रजाती आज नष्ट झालेली नाही, उलट त्यांच्या नैसर्गिक वातावरणात ती प्रजाती वाढतीये.!
निसर्गाने घालून दिलेला नियम आहे हा.! जो निसर्ग अत्यंत कठोरतेने पाळतो पण.!
जी सजीव प्रजाती आपल्या पुढच्या पिढ्यांना मागच्या आणि वर्तमानातल्या अनुभवांवरून प्रतिकार करायला, स्व संरक्षण करायला शिकवत नाही, ती सजीव प्रजाती एका काळानंतर ह्या पृथ्वीतलावरून नष्ट होऊन जाते.!
आपल्या देशाचा लचका तोडून जो भाग शांतिदूताना दानात दिल्या गेला, त्या पापिस्तानात हिंदूंनी बांधलेल्या मोठ्या मोठ्या घरात, हवेल्यात आज तेच शांतिदूत मोठ्या दिमाखात रहातायत.!
काश्मीर मध्ये हिंदूंच्या घरांवर, जमिनींवर, मालमत्तेवर शांतिदूतांचाच कब्जा आहे.! केरळ मध्ये कासारगौडमध्ये सुद्धा हिंदूंच्या मालमत्तेवर ह्या शांतिदूतांचाच कब्जा आहे.!
ही फक्त काही उदाहरण आहेत, जिथून हिंदू नामशेष झालाय किंवा नामशेष होण्याच्या पातळीवर आहे.! बाकी हिंदुस्थानात अशी बरीच ठिकाण आहेत जिथे हीच परिस्थिती आहे ! सगळंच लिहीत बसलो, तर खूप मोठा लेख होईल.!
कधी शिकणार हिंदू.? कधी भोवतालच्या परिस्थितीच आकलन होणार हिंदूला.? कधी हे समजून घेऊन जातीपातीच्या चिखलातून बाहेर येऊन हिंदू एक होणार.?
आता तुम्हीच ठरवा हिंदूंनो, की सर्वधर्मसमभाव नावाच्या नशे मध्ये डोडो पक्षी व्हायचं का केसोवरी पक्षी व्हायचं.!
निर्णय तुमचा.!
लेख संकल्पना आणि फोटो : #जितेंद्र_प्रताप_सिंह
आनंद कुलकर्णी