CPI Maharashtra

CPI Maharashtra भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे अधिकृत फेसबुक पेज सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्यासाठी कार्यरत असलेला श्रमिक जनतेचा पक्ष

दिल्लीत ‘बदलाव जरूरी है’ रॅलीसाठी CPI ची जोरदार तयारीरॅलीसाठी देशभरातून कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना१ सप्टेंबरला दिल्लीतील...
28/08/2026

दिल्लीत ‘बदलाव जरूरी है’ रॅलीसाठी CPI ची जोरदार तयारी

रॅलीसाठी देशभरातून कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना

१ सप्टेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार महासभा

महागाई, बेरोजगारी, MSP आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर CPI सरकारला घेरणार

नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न, शिक्षण-आरोग्य व्यवस्थेवरील संकट तसेच लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवरील दबावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) ‘बदलाव जरूरी है’ अभियानाला वेग दिला आहे. या अभियानाचा प्रमुख टप्पा म्हणून १ सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाची अर्थव्यवस्था वाढत्या दबावाखाली असून रोजगारनिर्मितीची मंद गती, वाढती महागाई आणि घटती क्रयशक्ती यामुळे सामान्य नागरिक अडचणीत आहेत. सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था कमकुवत होत असताना सामाजिक व आर्थिक विषमता वाढत आहे. शेतकऱ्यांना MSPची कायदेशीर हमी, कामगारांना रोजगाराची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांना रोजगार व परवडणारे शिक्षण मिळावे, या मागण्यांसाठी पक्षाने हे अभियान उभारले आहे.

६ ते १५ ऑगस्टदरम्यान देशभर पदयात्रा

‘बदलाव जरूरी है’ अभियान केवळ दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता देशभर नेण्यात आले. ६ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध राज्यांत पदयात्रांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी या पदयात्रा त्यानंतरही सुरू राहिल्या. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, MSP, कामगारांचे हक्क, निवडणूक सुधारणा आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचविण्यात आले.

या अभियानांतर्गत राजकीय प्रबोधनासाठी विविध पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आल्या आहेत. दलित, आदिवासी आणि इतर वंचित घटकांवरील भेदभाव, आदिवासींचे हक्क, जंगलांवरील कॉर्पोरेट हस्तक्षेप आदी विषयांवरील आणखी दोन प्रकाशनेही प्रसिद्ध केली जाणार असल्याचे CPI ने सांगितले.

रॅलीसाठी देशभरातून कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना

१ सप्टेंबरच्या रॅलीसाठी CPIच्या विविध राज्यांतील संघटनांनी तयारी सुरू केली असून युवक, विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी आणि लोकशाहीवादी घटक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, केरळ आणि तामिळनाडूमधून रॅलीसाठी बुक करण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाड्या रद्द झाल्याचा मुद्दाही CPI ने उपस्थित केला आहे. तसेच उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका CPI ने मांडली आहे.

लोकशाही, संघराज्यवाद आणि संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा

‘एक देश, एक निवडणूक’ आणि मतदारसंघ पुनर्रचनेसारख्या प्रस्तावांमुळे देशाच्या संघराज्यीय रचनेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा CPI ने केला आहे. संसदेला अधिक प्रभावी उत्तरदायित्वाची संस्था बनवणे, संघराज्यवाद मजबूत करणे, घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे आणि सार्वजनिक शिक्षण-आरोग्यात अधिक गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

“जनतेच्या आकांक्षा दडपता येणार नाहीत”

RSS-भाजप सरकार प्रचार, धार्मिक ध्रुवीकरण, भीती आणि संस्थात्मक दबावाच्या माध्यमातून जनतेच्या आकांक्षा दडपू शकत नाही, असा दावा CPI ने केला आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि लोकशाहीवादी घटकांच्या विविध मागण्या या व्यापक राजकीय बदलाच्या मागणीचा भाग असल्याचे पक्षाने म्हटले आहे. १ सप्टेंबरची रामलीला मैदानावरील रॅली ही जनतेच्या बदलाच्या मागणीची प्रभावी अभिव्यक्ती ठरेल, असा विश्वास CPI ने व्यक्त केला आहे.

28/08/2026

बदलाव जरुरी है!
१ सप्टेंबर दिल्ली चलो...

27/08/2026

बदलाव जरुरी है!
१ सप्टेंबर दिल्ली चलो...

बदलाव जरूरी है..मित्रांनो,भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) तर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘बदलाव ...
22/08/2026

बदलाव जरूरी है..

मित्रांनो,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) तर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘बदलाव जरूरी है’ महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, रोजगार, सार्वजनिक शिक्षण व आरोग्य व्यवस्था, महिलांसाठी आरक्षण, निवडणूक सुधारणा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य यांसाठी आता आपला आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. ब्रिटिश राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी आपण लढलो. आता RSS-BJP राजवटीविरोधात एकजूट होऊन लढण्याची वेळ आली आहे.

६ ते १५ ऑगस्टदरम्यान CPIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील शहरे आणि गावांमध्ये पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या पदयात्रांचा एकच संदेश होता; ‘बदलाव जरूरी है!’

एवढ्या मोठ्या अभियानासाठी आपल्यासारख्या जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे. आम्हाला कोणत्याही कॉर्पोरेट घराण्यांकडून आर्थिक मदत मिळत नाही. आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत, आपल्या मित्रांशी, कुटुंबीयांशी, सहकाऱ्यांशी आणि देशाचा मार्ग बदलण्याची गरज आहे असे मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधा. त्यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करा. त्यांना योगदान देण्याचे आवाहन करा.

आपले योगदान जनजागृती व मोबिलायझेशन, प्रसिद्धी, प्रकाशने, सोशल मीडिया, प्रवास तसेच महारॅलीच्या आयोजनासाठी उपयोगी ठरेल.

आपले प्रत्येक योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक योगदान या चळवळीला अधिक बळकट करते.

QR कोड स्कॅन करा आणि देणगी द्या

थेट देणगी देण्यासाठी :

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
Central Bank of India
Current A/c. No.: 1033004545
IFSC: CBIN0280306
शाखा : Press Area, New Delhi

ऑनलाईन देणगी : cpofindia.com/donate

हा संदेश शेअर करा.
आपल्या लोकांपर्यंत पोहोचा.
बदलाच्या या लढ्याचा एक भाग बना.

"अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ कर्मकांड, रुढी आणि परंपरांविरुद्ध लढणे नाही, तर माणसा- माणसांमधील अज्ञान, भीती आणि गैरस...
20/08/2026

"अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ कर्मकांड, रुढी आणि परंपरांविरुद्ध लढणे नाही, तर माणसा- माणसांमधील अज्ञान, भीती आणि गैरसमज दूर करणे आहे"

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!

AndhashraddhaNirmulanSamiti

19/08/2026

बदलाव जरूरी है... १ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या भव्य मोर्च्यात सामील व्हा, बदल घडवा!

Address

Raj Bhuvan, 314, SVP Road, Girgaon
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPI Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to CPI Maharashtra:

Shortcuts

Share