14/06/2026
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हरित उपक्रम, कांजूरमार्ग पूर्व येथे ५८ वृक्षांचे वृक्षारोपण, मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून ५,००० सीड बॉम्बचे वितरण*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या lवाढदिवसानिमित्त त्यांच्या lपर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रोळी विधानसभेतील प्रभाग क्रमांक ११७ चे शाखाध्यक्ष प्रथमेश धुरी यांनी कांजूरमार्ग येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाला मनसेचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मनोज चव्हाण प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत एकूण ५८ वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याच वेळी ५,००० सीड बॉम्बचे वितरण हा विशेष उपक्रम श्री. मनोज चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून राबविण्यात आला. आगामी एका महिन्यात हे सीड बॉम्ब विविध ठिकाणी वितरित करण्यात येणार असून, पावसाळ्याच्या काळात ते नैसर्गिकरीत्या रुजून मोठ्या प्रमाणावर नवीन झाडे उगवण्यास मदत करतील. कमी खर्चात आणि लोकसहभागातून हरित क्षेत्र वाढविण्याचा हा प्रभावी उपक्रम मानला जात आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांपुरते कार्यक्रम न मर्यादित ठेवता पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. स्थानिक नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षलागवड तसेच सीड बॉम्ब मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे येत्या काळात अनेक ठिकाणी नैसर्गिकरीत्या वृक्षांची वाढ होऊन पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनाला महत्त्वाची चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
MNS Adhikrut Manoj Chavan