22/08/2026
*शाळेऐवजी पोहायला गेले; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!*
मॉडर्न बेकरी परिसरातील पाण्याच्या टाकीत बुडून हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा
मुंबई : ज्या वयात चिमुकल्यांच्या हातात शाळेची दप्तरं आणि पुस्तकं असायला हवी होती, त्या वयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन निष्पाप मुलांचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. *मॉडर्न बेकरी परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे*.
घटनेची माहिती मिळताच *सौ. मनीषा रविंद्र वायकर* यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी *श्री. ज्ञानेश्वर सहदेव सावंत, व सौ प्रियंका आंबोळकर* हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
दोन चिमुकल्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणी मुलांचा प्रवेश रोखण्यासाठी *सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कठोर करण्याची गरज* पुन्हा अधोरेखित झाली आहे.
*निष्पाप बालजीव गमावण्याची ही वेदना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे*. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण परिसर सहभागी आहे. 🙏 #जोगेश्वरी