07/09/2025
डफा वर थाप कंठातून संघर्षशील व मुक्तीचे गाणी गाणारे शाहीर आजही तुरुंगात ....
कबीर कला मंचाचे तीन कलावंत कार्यकर्ते... सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप... सागर आणि रमेश यांना आज दिनांक सात सप्टेंबर रोजी अटक होऊन पाच वर्षे झालेली आहेत आणि आठ सप्टेंबर रोजी ज्योती जगताप यांना अटक होऊन पाच वर्षे होतील. 'जामीन हा नियम आणि जेल हा अपवाद' भीमा कोरेगाव- एल्गार परिषद आणि दिल्ली खटल्यामध्ये लागू होत नाही!
खटला अजून सुरू नाही तरीही तुरुंगात सडविण्याचा त्यांचा डाव आहे, ज्यांनी लेखक- वकील- प्राध्यापक-कलावंतां विरुद्ध खोटे पुरावे पेरलेले आहेत... मुक्तीचा स्वर -संगीत सर्वाधिक गरज असलेल्या काळात तुम्ही सारे कोठडीत आहात... आम्ही सारे तुमच्या मुक्तते साठी कटिबद्ध आहोत...
- समता कला मंच